डायनिंग चेयर upcycling, स्वच्छता

Submitted by वत्सला on 30 August, 2021 - 19:55

आमच्याकडे 12 वर्षांपूर्वी घेतलेला dining table आहे. अजूनही व्यवस्थित आहे त्यामुळे एव्हढ्यात तो टाकून नवीन घ्यायची इच्छा नाही. कारण टाकला तर तो उगाचच टिपमध्ये जाऊन वाया जाणार. (सध्या नवीन migrants/students/work visa वर येणारे लोकं नगण्य असल्याने कोणाला देताही येत नाहीये. म्हणजे तो टाकला तर टिपमध्ये जाणार म्हणून टाकवत नाही.)

त्याच्या खुर्च्यांचे कुशन्स जरा खराब झाले आहेत आणि आम्हाला त्या वापरण्याचा कंटाळा आला आहे. डिसेंबर महिन्यात जेव्हा कडक उन्हाळा असतो तेव्हा ते स्वच्छ करता येतात पण आता कंटाळा आला आहे तेच ते रंग बघून. ते कुशन्स non removable आहेत. म्हणजे चेयरला चिकटवलेले आहेत. त्यामुळे नवीन कुशन्स बसवणे किंवा कुशन्सना नवीन कव्हर्स घालणे शक्य नाही. कदाचित मला ऍमेझॉन वगैरे साइटवर योग्य ते कव्हर्स सापडत नसावेत.

तर अशा जुन्या कुशन्स चे अपसायकलिंग कसे करावे? की ते कुशन्स काढून नवीन कुशन्स घालणे हाच पर्याय आहे? इथे वारंवार सुरू असलेल्या lockdowns मुळे हे काम करायला कोणी येऊ शकणार नाही त्यामुळे घरीच करावे लागेल.

तुमच्यापैकी कोणी असे काम केले आहे का? काही मार्गदर्शन करू शकाल का?

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती2, ही बघितली पण त्यासाठी seats removable हवीत. आमच्याकडे कुशन्स खुर्चीला चिकटवलेली आहेत.

आमच्याकडे कुशन्स खुर्चीला चिकटवलेली आहेत.>> वत्सला, त्यातली काही तशा प्रकारच्या खुर्च्यांसाठीही आहेत.

वत्सला, माझा हि हाच प्रॉब्लेम होता, ब्लॅक leather चेअर बघून कंटाळा आला होता मी ऍमेझॉन वरून कव्हर्स मागवले आधी ब्राउन आणि मग अजून एक सेट ऑफ ६, लिंक दिली आहे streachable आहे फक्त अटकवायचे चेअर ला खूप छान transformation होते,विडिओ आहे ऍमेझॉन वर तो बघा.

मी घराचा colour डार्क ब्राउन एक वॉल आणि बाकी ivory आहेत म्हणून दोघी ब्राउन colurs घेतले. १० डे returnable आहेत तर मागवुन try करून पहा नाही आवडले तर रिटर्न ऑपशन आहेच

https://www.amazon.in/dp/B08RJZ4D34/ref=twister_B08RJZ22XL?_encoding=UTF...
https://www.amazon.in/dp/B08VRD5DPY/ref=twister_B08RJZ22XL?_encoding=UTF...

मी मागच्या वर्षी हा उद्योग यशस्वीरित्या केल्ता. हे वालं स्टेपलर घ्या "https://smile.amazon.co.uk/gp/product/B07TT65BS6/ref=ppx_yo_dt_b_asin_ti..."
१. स्पॉन्जेस , ते कव्हर करायला सुंदर upholstery fabric घेतली. २. आणि youtube वर बघून जुने कुशनं काढून टाकले. त्या स्टेपलर बरोबर एक छोटंसं Staple Remover मिळतं त्याने पिना काढल्या. ३. नवीन स्पॉन्जेसला upholstery fabric लावलं. ४. ते खुर्चीला स्टेपल केले. भर्पूर उद्योग आहे. खर्च पण आहे. पण मी lockdown ने खू...प वैतागले होते मागच्या डिसेंबर मध्ये. तेव्हा हे केलं. just as hobby to entertain myself. आता खुर्च्या खूप छान दिसतात. Happy

वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लिनर असेल तर सरळ साबण पाण्यानी धूवून व्हॅक्ली करणे सगळ्यात सोपा उपाय.

महत्त्वाचं सांगायचं राहिलं. जर पिना उचकटवणार असाल तर प्रोटेक्टिव गॉगल घालून काम करा हं. ते जरा इकडे तिकडे उडू शकतात.

अपहोल्स्ट्रीच्या दुकानाबाहेरच हे काम चालू असतं. ते पाहता येईल कसं करतात ते. खुरच्यांच्या फ्रेम्सलाच ते कापड बसवतात, काढतात.

सध्या amazon वरून कुशन कव्हर्स मागवली आहेत. ती 15 सप्टेंबर पर्यंत येतील. ती व्यवस्थित बसतील अशी अपेक्षा आहे!
हो, फोटो टाकते नक्की.