वाचायचा असल्यास मंगळागौरीची कहाणी भाग १ ह्या धाग्यावर प्रतिक्रियात कुठेतरी आहे. जसा फास्ट अँड फ्यूरिअस कुठलाही भाग पाहिला तरी समजतो तसेच ही कथा कुठूनही सुरूवात केली तरी समजते. मुलगा अल्पायुषी आहे हे भविष्य एवढीच महत्त्वाची घटना मागच्या भागात आहे.
कहाणी मंगळागौरीची (भाग २)-
(मुलाची) आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. ‘काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं’ असा माझा नवस आहे. असा जबाब दिला.
(नक्की काशीला जाऊन काहीतरी “जिंदगी ना मिलेगी दोबारा" छाप प्रकार करणार हा बंदा!! आणि हो, अजिबात टोटल लागली नाही - कुणाचा नवस होता आणि कोण लग्न करा म्हणाले??)
कांहीं दिवसांनीं मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊं लागले. जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं कांहीं मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणूं लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे!”
(#एपिक! अरे काय “ब्लिप” करायची पद्धत!!)
तेव्हां ती मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाहीं. मग मी तर तिची मुलगी आहे.”
(म्हणजे नवऱ्याआधी किंवा फारफार तर सह मरणार… देवीलोक्स, जरा बरी ऑप्शन्स देत जा प्लिज!! आणि हो, नवरी आधी मेली तर तिचे मरण फिक्स कारण एका पण गोष्टीत बाप्ये लोक जाऊन बायकोसाठी अमृत आणत नाहीत… आणि ह्या तर एक्स-बॉक्स नसतानाच्या गोष्टी आहेत… )
हें भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनांत आलं हिच्याशीं भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हें घडतं कसं? त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला. इकडे काय झालं? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करूं, म्हणून धर्मशाळा पाहूं लागले.
(मंगळागौरी प्रसन्न होती ना मग आजारी नवरा असला तरी काय फरक पडतो?? नक्की काय प्लॅन आहे ह्या आईबाबांचा - लग्न एकाबरोबर नि नांदायला दुसऱ्या बरोबर?? जाऊ द्या, डोक्याला ताप नको सॉंग सिच्युएशन द्या टाकून - “नही सामने ये अलग बात है… प्रेयसी ई
ई
ई
ई
ई
ई
ई
ई
ई
ई
ई
(अहो तो हरिहरनचा इ इ … संपता संपेना तरी मी एडीट केला … बॅक टू मंगळागौरी … )
मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लावलं. उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोंपीं गेलीं. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अग अग मुली, तुझ्या नवर्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्यात शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळीं उठून आईला तें वाण दे.”
(कैकयी आहे काय आई… साप कशाला द्यायचा तिला? आठ - नऊ वर्षाच्या मुलीला इतपत तर कळायला हवं ना!)
तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. कांहीं वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणूं लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिऱ्हाडीं गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले.
(उठल्या उठल्या लोकांकडे “भूक लागली”... कुठ्ठे म्हणून कुठ्ठे नेण्याच्या लायकीची नसतात #लाडूपार्सल)
दुसरे दिवशीं काय झालं? हिनं सकाळीं उठून स्नान केलं, आपल्या आईल वाण दिलं. आई उघडून पाहूं लागली, तों आंत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळयला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाहीं.”
(कहाणी में ट्वीस्ट.)
रात्रींची लाडवांची व अंगठीची खूण कांहीं पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सांपडतो? नंतर त्यांनीं अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेंकडों लोक येऊन जेवूं लागले.
(त्यापेक्षा कोतवालाला सांगावं. हे म्हणजे ‘होऊ द्या खर्च’ प्रकार झाला. #आपण यांना पाहिलंत का?)
इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली.
(कशाला युद्ध करायचं?तू देवी, यम पण देवचं ना! मग त्याला फोन करायचा - “भिडू तेरे पंटर लोग अपने आदमी के साथ राडा करेले है, अब्बी के अब्बी वापस बुला नई तो तेरे घर में घुसकर इतना मारुंगी की तेरा रेडा भी ‘बाबूजी धीरे चलो’ गायेगा”)
भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगूं लागला, “मला असं असं स्वप्न पडलं.” मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरीं जाऊं.” परत येऊं लागले. लग्नाच्या गांवीं आले. तळ्यावर स्वयंपाक करूं लागले.
(लाडू पार्सल संपलं काय ?? ताटभर होते की रे बंडू)
दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाहीं.” दासींनीं यजमानणीस सांगितलं. त्यांनीं पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्याला ओळखलं. नवर्यानं आंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं.
(“श्री व सौ व. र. अदलाबदले यांचे कडून सप्रेम भेट” उगीच नव्हतं कोरलं होतं ताटावर )
सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वांचल,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असतां. ही सगळी तिची कृपा.” सासर माहेरचीं घरचींदारचीं माणसं सर्व एकत्र झाली, आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.
(हुश्श!! एकूणात एवढ्या घटना घडायला ५ वर्ष लागली असावीत कारण मंगळागौर पाचच वर्ष पूजतात.)
तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो,इतकीच देवाची प्रार्थना करा.
ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.
(दीर्घायुष्यासाठी लाडू पुरवून पुरवून खावेत. कोण आधी कोण नंतर जाणार असल्यावर लक्ष देण्यापेक्षा एकत्र काळ सुखाने घालवावा. उपास, पत्री, खेळ इ धमाल ह्या मध्ये नवऱ्याला शक्य तर सामील करावं. “नाच ग घुमा” ऐवजी “नाच रे घुम्या” पण धमाल येईल. म्हारे छोरे छोरियोंसे कम है के… #मॉडर्नचातुर्मास)
चित्रः साभार विकीमिडीया
कमाल !!! ह. ह. पु. वा.
कमाल !!! ह. ह. पु. वा.
मस्त आहेत विडंब नं . ह्या
मस्त आहेत विडंब नं . ह्या सर्व कहाण्या धार्मिक गोड गुलजार मुलामा देउन आत टॉक्सिक पॅट्रिआर्की चे वळसे घट्ट केले आहेत. तुम्ही विनोदाने चांगले पोकळ बांबूने फटके देत आहात ते मस्त वाट्ते. एक तर बालविवाहाचे समर्थन दुसरे म्हणजे वैधव्य आले कि जीवन संपले असे फालतू पूर्वग्रह अश्या कथांनी घट्ट होत राहतात व हे बिन कामाचे पुरण बायकांच्या मेंदूत घट्ट बसते. कीप देम कमिन्ग.
बाप्रे डेन्जर कहाण्या आहेत.
बाप्रे डेन्जर कहाण्या आहेत.
सगळीच कंस कॉमेन्ट्री
मस्तच....
मस्तच....
सी कठीणच आहे.. अशी कशीही
सी कठीणच आहे.. अशी कशीही गोष्ट गळी कशी उतरायची हा प्रश्न पडतोय, आणखी एक म्हणजे चोळीचा काय वाटेल तो उपयोग _/\_ >>दूध पिऊन सर्प कर्यात शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळीं उठून आईला तें वाण दे.”>>>> चोळीने कशाला? बाकी रूमाल सदृश काही नसायचं का? आधी पण एका जुन्या (माबो वल्डफेमस) पिक्चरचा किस्सा नुकताच कळलाय
बाकी स्टोरी भन्नाट
कशाला युद्ध करायचं?तू देवी, यम पण देवचं ना! मग त्याला फोन करायचा - “भिडू तेरे पंटर लोग अपने आदमी के साथ राडा करेले है, अब्बी के अब्बी वापस बुला नई तो तेरे घर में घुसकर इतना मारुंगी की तेरा रेडा भी ‘बाबूजी धीरे चलो’ गायेगा”)>>>>
भारी . अमा +1
भारी .
अमा +1
अति अति भयंकर
अति अति भयंकर
एकंदरच चोळी चे मूळ वापर इन ऍडिशन टू कोण्या बाईचा बदला घेणे, भांड्याचे झाकण, लोणच्याच्या बरणीवर बांधायला दादर, चहा गाळायला /मटकीचे मोड आणायला/ पनीर किंवा चक्का बनवायला फडके असे अनेक उपयोग पूर्वीच्या काळी होत असावेत.
आधी पण एका जुन्या (माबो
आधी पण एका जुन्या (माबो वल्डफेमस) पिक्चरचा किस्सा नुकताच कळलाय Rofl>>>>> आणि ह्या सिनेमात भुताचं दुखणारं डोकं बांधायला
“भिडू तेरे पंटर लोग अपने आदमी
“भिडू तेरे पंटर लोग अपने आदमी के साथ राडा करेले है, अब्बी के अब्बी वापस बुला नई तो तेरे घर में घुसकर इतना मारुंगी की तेरा रेडा भी ‘बाबूजी धीरे चलो’ गायेगा”)>>>> हसून हसून मेले!
अमा +१.
आम्ही परान्न घेत नाहीं.”>>>> हायला,आधी दोघे भिक्षा मागायचे ना?
मॉडर्नचातुर्मास ओरिजिनल
मॉडर्नचातुर्मास ओरिजिनल पेक्षा भारी आहे
ओके. अल्लख ची कथा वाचली
ओके. अल्लख ची कथा वाचली एकदाची. भारी आहे.
जिंदगी ना मिलेगी, ब्लीप,
जिंदगी ना मिलेगी, ब्लीप, लाडूपार्सल, हरिहरन, भिडूपंटर, होऊदेखर्च >>>> धमाल
अमांशी सहमत. मंगळागौरीचे आभार की आपण ह्यातून बऱ्यापैकी बाहेर पडलोत.
जबरदस्त जमली आहे कथा, सी!
जबरदस्त जमली आहे कथा, सी!
आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक >>> आँ? अन् मग तिने काय पेहरायचं?
छान आहे मॉडर्न टेक (टिका!)
छान आहे मॉडर्न टेक (टिका!)
अमा, +१११ कितीही गोड गोड शेवटाच्या कहाण्या असल्या तरी त्यातली सगळ्यात छान गोष्ट हीच आहे की या कहाण्यांचा relevance उरलेला नाही! आणि काहीही झालं तरी यात बदल व्हायला नको! आपण छान आधुनिक कहाण्या लिहू ज्यांच्यातून आजच्या काळात relevant असणारे संस्कार प्रतित होतील.
“काय रांड द्वाड आहे! काय रांड
“काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे!”>>
देवीच्या कथेत कशाला शिव्या घातल्या आहेत.. कमाल च आहेत. जुने public.. तेही एवढ्या छोट्या मुलींच्या तोंडी... हे मोठ्या आनंदानी वाचतात.. आणि थोडा कुठे f word चुकून गेला तोंडातून (या वयातही) की लगेच डोळे मोठ्ठे होतात.. double standard s of old generation..
कोण्या बाईचा बदला घेणे,
कोण्या बाईचा बदला घेणे, भांड्याचे झाकण, लोणच्याच्या बरणीवर बांधायला दादर, चहा गाळायला /मटकीचे मोड आणायला/ पनीर किंवा चक्का बनवायला फडके असे बहुविध उपयोग केल्यानेच "चोली के पीछे क्या है" असे प्रश्न २१व्या शतकात पडतात. रमड, मुद्द्याचे प्रश्न!
हायला,आधी दोघे भिक्षा मागायचे ना? >>
धन्यवाद सर्वांना. अमा+१११
हे मोठ्या आनंदानी वाचतात.. >>
हे मोठ्या आनंदानी वाचतात.. >> कारण एव्हरी वुमन वाँट्स टु बी रिअल द्वाड पण तिच्या इच्छांचे आकांक्षांचे दमन केल्याशिवाय सुखी संसार होत नाहीत. लाटा बाई लाटा.
बी द्वाड गर्ल्स. मेक युअर ओन $
अंगठीची खूण! रामायण म्हणू नका
अंगठीची खूण! रामायण म्हणू नका, स्वप्नवासवदत्तम् म्हणू नका, मुद्राराक्षसम् म्हणू नका.... सगळीकडे हे असले खुणांचे प्रकार येऊनही कुणाला डुप्लिकेट अंगठी/खूण करायची कल्पना अजून सुचलेली दिसत नाही. पण इथे एक्स्चेंज ऑफरमध्ये लाडू आणून नाविन्य आणलं आहे.
खरं तर हे वन नाइट स्टँड
खरं तर हे वन नाइट स्टँड असतात. मग तो बाप्या विसरणारच ना. सोयीचंच असतंय ते त्यांना. उगीच जुनी चेपलेली हरव्ली तरी चालेल अशी अंगठी देतात .
खूण म्हणून लाडू = मटणाच्या लेग ने खून करणे व नंतर खाउन टाकणे. ( लॉजिक वाइज) डबा तरी ओळखू येइल पण एक लाडू दुसृया सारखाच दिसनार ना!! इथे ताट दिले आहे त्यावर नाव कोरले असेल. दोन वर्शा पूर्वी काशीस जाण्या आधी लग्न केलेल्या मुलीकडून मिळालेले ताट. ते ताट ह्यांना मारून दुसृया कोणी घेतले असेल तर चोरून!!! पण दिमाग तो युज करनाही नही है.
बी द्वाड गर्ल्स. मेक युअर ओन
बी द्वाड गर्ल्स. मेक युअर ओन $>>>> yo....thats the spirit..
नवी कहाणी मस्तच आहे.
नवी कहाणी मस्तच आहे.
रच्याक, रांड शब्दाचा अर्थ अगदी अलिकडेपर्यंत विधवा असा होता , वेश्या असा नाही.
झाशीची राणी सुद्धा स्वतःबद्दल बोलताना " मी रांड मुंड, शेरभर पिठाची धनिण" म्हणाली होती. (माझा प्रवास-गोडसे भटजी)
रंडकी हा शब्द विधवा या
रंडकी हा शब्द विधवा या अर्थाने वापरलेला चि वी जोशींच्या पुस्तकात वाचला आहे.
हा शब्द नंतर वेगळ्या अर्थाने वापरला जाणे हे निराळीच शंका येऊन जास्त ट्रॅजिक वाटते.
हिंदीचे आक्रमण?
हिंदीचे आक्रमण?
किती irrelevent, अजब कथा आहे
किती irrelevent, अजब कथा आहे बापरे! काहीही फालतुपणा. आणि अजुनही बायका वाचतात की काय या कथा?
हो, ~रू १७०/- फक्त चे पुस्तक
हो, ~रू १७०/- फक्त चे पुस्तक घेऊन वाचतात!
अजुनही बायका वाचतात की काय या
अजुनही बायका वाचतात की काय या कथा? >>
हो.. विधीच असल्या types आहे तो पूजा करताना.. श्रावणातल्या प्रत्येक वारांना.. त्याच्याशिवाय पूजा नाही पूर्ण होत बहुतेक..
तेरा रेडा भी ‘बाबूजी धीरे चलो
तेरा रेडा भी ‘बाबूजी धीरे चलो’ गायेगा >> काय अभ्यास काय अभ्यास _/\_
अचाट आहेत एकेक कथा
अचाट आहेत एकेक कथा
मंगळागौरीनंतर सत्यनारायणालाही हात घाला. फक्त त्याच्या प्रसादाला धक्का लाऊ नका
रांड शब्द ऐकून मी सुद्धा गचकलेलो. पण पुढे प्रतिसादात रंडकी वगैरे शब्दांनी संदर्भ लागला.
ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.
>>>>>
हे सुद्धा अचाट आहे. एकीकडे भगवदगीता सांगणारा कृष्ण तर दुसरीकडे मंगळागौर सांगणारा कृष्ण.. हे काय कृष्णाच्या नावावर खपवले आहे की काय?
>>>>>हहाहा
>>>>>हहाहा