तळजाईचा भूतबंगला

Submitted by अदित्य श्रीपद on 7 August, 2021 - 22:46
#तळजाईचा_भूतबंगला

taljai2.jpgतळजाईचा भूतबंगला
मी लहान असताना आम्ही पर्वती पायथ्याशी राहायचो तर मावशी सहकारनगर इथे रहायची त्यामुळे तिच्याकडे नेहमी जाणे येणे होत असे. सहकारनगरला मुक्तांगण बालरंजन केंद्राचे जे मैदान आहे त्याच्या मागील बाजूने जाणारया रस्त्याच्या उजव्या बाजुला असणाऱ्या बंगल्यांच्या रांगेतील शेवटचा-लेण्याद्री बंगला म्हणजे मावशीचे बिऱ्हाड.तिच्या घरासमोरून तळजाई टेकडीची मागील बाजू दिसे आणि मुख्य म्हणजे भूतबंगला दिसे. १९८०-८३ चा काळ तो! तेव्हा सहकारनगरला वस्ती आणि रहदारी कमीच होती. मावशीच्या घरासमोरच्या रस्त्यावर अगदी मंद असे ट्यूब लाईटचे पथदिवे होते. त्यांचा मिणमिणता अपुरा प्रकाश, मधूनच एखादी फडफड करणारी खराब ट्यूबलाईट ह्यामुळे दिवेलागणीच्या वेळी तो रस्ता अगदी भेसूर दिसे. अशात समोर अंधारात बुडत चाललेला निर्जन ओसाड असा भूतबंगला पाहून आम्हा लहान मुलाना अगदी भीती वाटे. त्याला भूतबंगला का म्हणत? तेथे काही घडले होते का? ह्याबाबत मीअनेक आख्यायिका ऐकल्या होत्या पण त्यापैकी माझ्या मोठ्या मावस बहिणीने सांगितलेली कथा मला अगदी चांगली आठवत्ये. एकदा असेच आम्ही मामे-मावस भावंड मावशीकडे जमलो असताना तिच्या घराच्या पायरीवर बसून तिने आम्हाला, एका मराठी सरदाराने एका आवडत्या नाचणाऱ्या बाई करता तो बंगला बांधला होता आणि तिथे तिचा खून झाल्यावर तिचा अतृप्त आत्मा तिथे वावरतो त्यामुळे तो बंगला ओसाड पडलाय अशी गोष्ट अगदी रंगवून सांगीतली होती. ती गोष्ट सांगत असतानाच टेकडीवरून किणकिण-टीण टीण असा लयबद्ध आवाज येताना आम्ही सगळ्यानी अगदी स्पष्ट ऐकला (आणि चांगलेच घाबरलो )आणि हा त्या नाचणारणीच्या पायातल्या घुंगरांचा आवाज आहे आणि ह्या वेळी रात्री किंवा बारा वाजता असा तो मधून मधून येतो हे बहिणीने अगदी गंभीर चेहरा करून सांगितले. ह्या घटने मुले असेल पण ती गोष्ट अजूनही माझ्या लक्षात आहे. पुढे थोडा मोठा झाल्यावर (६वी ७वीत असताना) आम्ही टेबल टेनिस खेळायला म्हणून तिथल्या अजय मंगल कार्यालयात एक त्रिदल क्रीडा केंद्र भरत होते तिथे जायचो. एरवी हे अजय मंगल कार्यालय फारसे काही चालत नसावे पण क्वचित कधीतरी लग्न मुंज वगैरे कार्यक्रम असला कि आमचे सर मग आम्हाला ह्या तळजाई टेकडीवरच्या भूत बंगल्यासमोरच्या मैदानात घेऊन जात. आमच्या सरांना किंवा इतर मुलाना तरी माझ्या बहिणीने सांगितलेल्या आख्यायिका माहिती नव्हत्या पण भूत बंगला हे नाव मात्र माहित होते. मी ती नाचणारीच्या खुनाची गोष्ट आणि पायातल्या घुंगरांचा आवाज वगैरे गोष्ट सांगितल्यावर मात्र ते भरपूर हसले आणि आम्हा सगळ्याना त्या बंगल्यात घेऊन गेले. बंगला ओसाड असला तरी बराच सुस्थितीत होता. खालच्या मजल्यावरील, खोल्या, गच्चीत जायचा जिना, गच्ची सगळं ठीकठक होतं. गच्चीत तर पूर्वी टाइल्सचे तुकडे,कपचे वगैरे लावून करत तशी फरसबंदी होती. त्याकाळच्या आमच्या घरातल्या शहाबादी फरशी पेक्षा मला ती खूप सुंदर वाटली. तिथेच नाचताना त्या बाईचा खून झाला असणार असे मला वाटले. थोडी भीती हि वाटली पण बरोबर मास्तर आणि इतर मुलं असल्याने अगदी भेदरलो वगैरे नाही तेवढ्यात अगदी तसाच घुंगरांचा आवाज हलके हलके यायला लागला आणि मग मात्र जाम टरकलो. आमच्या सराना घाबरून जाऊन तुम्हाला आवाज येतो का विचारले तर त्यानाही तो येत होता आणि ते देखिल चकित झाले आवाज खालून येत होता म्हणजे भूत खालच्या खोलीत असणार अशी माझी खात्री झाली, वेळ देखिल सात सव्वासाताची म्हणजे अंधार पडायला सुरुवात झाली होती. रडायला यायला लागलं. आमच्या सरांनी गच्चीवरून खाली पहिले तर कोणी माणूस आपल्या दहा बारा म्हशी घेऊन चरायला जो टेकडीवर गेला होता तो परतत होता आणि त्या म्हशीच्या गळ्यातल्या घंटाचं तो लयबद्ध आवाज येत होता. तालाजैच्या पायथ्याशी अरण्याश्वर मंदिराजवळ गवळी वाडा आहे तिथला कोणी असणार.त्यानंतर मला इतर मित्र इतके चिडवीत कि त्यापेक्षा त्या बाईच्या भुताने आपल्याला खाऊन टाकले असते तर बरे झाले असते असे वाटत राही.
तर हा बंगला कुणा ठोसर नावाच्या मराठी बऱ्याच अप्रसिद्ध सरदाराचा आहे आणि काही कोर्टकचेऱ्या दावे ह्यांच्या मुळे तो बेवसाउ झाला आणि खराब झाला ही माहिती नंतर मिळाली, हा बंगला १९९५ पर्यंत अगदी सुस्थितीत होता आणि मी तिथे जाऊन दहावीचा अभ्यास वगैरे केला होता. हल्ली मात्र फारच पडझड झाली आहे. बहुधा आसपासच्या लोकांनी बांधकामातले दगड काढून नेल्याने असेल. आजमितीला एक दोन भिंती आणि जिन्याचा थोड्या पायऱ्या,जिना वर घेऊन जाणारया मनोऱ्याचा( मनोरा कसला?) काही भाग एवढेच शिल्लक आहे. तिथे खरेच एखादे भूत असले असते तर लोकांची असे काही करायची हिम्मत झाली नसती...
झाली होती. रडायला यायला लागलं. आमच्या सरांनी गच्चीवरून खाली पहिले तर कोणी माणूस आपल्या दहा बारा म्हशी घेऊन चरायला जो टेकडीवर गेला होता तो परतत होता आणि त्या म्हशीच्या गळ्यातल्या घंटाचं तो लयबद्ध आवाज येत होता. तालाजैच्या पायथ्याशी अरण्याश्वर मंदिराजवळ गवळी वाडा आहे तिथला कोणी असणार.त्यानंतर मला इतर मित्र इतके चिडवीत कि त्यापेक्षा त्या बाईच्या भुताने आपल्याला खाऊन टाकले असते तर बरे झाले असते असे वाटत राही.
तर हा बंगला कुणा ठोसर नावाच्या मराठी बऱ्याच अप्रसिद्ध सरदाराचा आहे आणि काही कोर्टकचेऱ्या दावे ह्यांच्या मुळे तो बेवसाउ झाला आणि खराब झाला ही माहिती नंतर मिळाली, हा बंगला १९९५ पर्यंत अगदी सुस्थितीत होता आणि मी तिथे जाऊन दहावीचा अभ्यास पहिली वाहिली फोटोग्राफी तिथे जाऊन केली होती हल्ली मात्र फारच पडझड झाली आहे. बहुधा आसपासच्या लोकांनी बांधकामातले दगड काढून नेल्याने अशे पडझड झाली आहे. एक दोन भिंती आणि जिन्याचा थोड्या पायऱ्या,जिना वर घेऊन जाणारया मनोऱ्याचा( मनोरा कसला?) काही भाग एवढेच आता शिल्लक आहे
--आदित्य
ता.क.
१९८२ साली आलेल्या मायबाप नावाच्या सचिनच्या चित्रपटात हा ठुबे भूतबंगला दिसतो, यु ट्युबवर आहे. त्याचा स्क्रीन फ्रीज करून त्यातून स्क्रीन शॉट घेतलाय, हा भूत बंगला जरा सुस्थितीत असताना कसा दिसत असे ह्याची कल्पना ह्यावी म्हणून बाकीचे फोटो हल्ली हल्लीच मी स्वत: काढलेले आहेत

हा लेख फेसबुकवर टाकल्यानंतर अनेक मह्जुण्या लोकांनी तो वाचला आणि बरीच माहिती मिळाली ती जशीच्या तशी देत आहे. त्या माहितीच्या सत्यतेबाबत बाबत खातरजमा केलेली नाही
ठुबे हे तया काळी फार मोठे प्रस्थ होते इंग्रजांनी त्यांना रावबहादुर ही पदवी दिली. पुण्यात संचेती जवळ ठुबे पार्क नावाचा बंगला आहे. तो त्यांचाच
साभार-अशोक सोमवंशी

विट्ठल लक्ष्मण ठुबे 1930 ते 52 पर्यन्त पुणे येथे कॉन्ट्रक्टर होते इंग्रज सरकारने त्याना सरदार तसेच राव बहादुर या पदव्या बहाल केल्या होत्या पाचगांव पर्वतीचा डोंगर त्याच्या मालकिचा होता. तळजाई देवी त्यांच्या स्वप्नात आली होती. दृष्टांताप्रमाणे खोदल्यावर मूर्ति सापड़ली. मग त्यानी देउळ बांधले 1940 च्या दरम्यान हा बंगला बांधला होता हवा पालट म्हणून ते येथेरहायला यायचे. तेव्हाही इथे विजपाणी होते , त्यांना एकुलता एक मुलगा होता आणि त्याने आत्महत्या केली नाही. तो मुलगा साठी उलटल्यावर वारला.
साभार--अशोक डुंबरे

सरदार ठुबे आणि या बंगल्याबद्दल बरेच किस्से त्याकाळी फेमस होते. कोणी सांगायचे की तळजाई देवळाच्या मागील विहिरीत त्या ठुबेंना देवीची मूर्ती आणि खजिना मिळाला आणि त्यातून त्यांनी तो भव्य बंगला बांधला आणि त्यानंतर त्यांची नियत फिरली वगैरे वगैरे, पण त्याकाळी म्हणजे 1948 साली जेंव्हा त्या भागात कोणीच नव्हते तेंव्हा या ठुबे महाशयांनी हा इतका भव्य बंगला इतक्या गावाबाहेर का बांधला असावा ? असा प्रश्न पडतो.केवळ बंगलाच अतिभव्य होता असे नव्हे तर त्या बंगल्यालापाणी पुरवठा करण्यासाठी एक भली थोरली टाकी तळजाई मंदिराच्या अलीकडे उभारली होती आणि त्यातून पाण्याची पाईपलाईन बंगल्यापर्यंत आणली होती. त्या बंगल्या साठी स्पेशल विजेची लाईन व अनेक खांब रोवून खूप लांबून विजेची सोय तिथे केली होती. टेकडीच्या पायथ्याचे सहकारनगर पानशेत पुरानंतर 1962-63 सालापासून उभारले गेले आणि तिथे लाईट 1969-70 साली आली हे इथे नमूद केले तर ठुबेंनी 1948 साली किती सुखसोयी निर्माण केल्या होत्या हे लक्षात येते.
त्या बंगल्याचे रेखीव दगडी चिरे, सागवानी दरवाजे, चौकटी, खिडक्या हळूहळू गायब होत गेल्या आणि बंगला भकास मोडकळीस आला. या बंगल्यात दोन कार पार्किंग होत्या व त्याच्या आउट हाऊसच्या खोल्यांमध्ये तीन कुटुंबे त्याकाळी रहात होती त्यांपैकी दोन मराठी व एक उत्तर प्रदेशी भय्ये कुटुंब होते. त्यातील नांगरे कुटुंबातील श्याम हा आमचा बालपणीचा जिवलग मित्र. हा श्याम उत्तम शिकून पुढे शिक्षक झाला व आता कोथरूडमध्ये राहतो
साभार-–प्रसाद दशरथ

taljai3.jpgtaljai4.jpgtaljai5.jpgtaljai6.JPGtaljai6.JPG

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पूर्वी मी या ग्राउंडच्या अगदी समोर रहायचो. माझ्या बेडरूमच्या खिडकीतून हा बंगला आणि सगळा परिसर दिसायचा. तेंव्हा सदू शिंदे स्टेडियम बनले नव्हते.
त्या काळी मी अमेरिकन कस्टमरसाठी काम करायचो. त्यामुळे बऱ्याच रात्री जागून काढल्या जायच्या.
तुम्हाला खोटं वाटेल, पण त्या बंगल्याच्या रस्त्यावर सकाळी तीन-चार वाजेपर्यंत वाहनं येत जात असायची. एका रात्रीत दहा-बारा तरी असतील.
कधी एखादीच टू-व्हीलर यायची, मग पाठोपाठ दोन-चार. कधी चारचाकी.
यायचे आणि थोड्यावेळानं - अर्धा तास, एक तास - वाहनं जायची.
दिवे दिसायचे, माणसांचा वावर जाणवायचा. पण तिथल्या हालचाली कधी स्पष्ट दिसल्या नाहीत.
मात्र त्या गचपणातून बाहेर आल्यावर रस्त्यावरच्या दिव्यांच्या उजेडात माणसं दिसायची. ती फक्त पुरूषमंडळीच असायची असा समज करून घेऊ नये.
तरी इथे रात्री पोलिसांची गस्त असते.
एकदा मस्त चांदणं पडलं होतं. म्हणून मी आणि बायको रात्री बारा-एकला तळजाईवर गेलो होतो.
त्या रस्त्यावर मधे एक वळण आहे बघा, जिथून आजही बिबवेवाडी-व्हीआयटीचे दिवे दिसतात, तिथे बसलो होतो. आम्हाला पोलिसांनी तडक हाकलला!

एवढं निश्चित की त्या बंगल्यात अथवा तिथल्या वर्दळीत अमानवी काहीही नव्हतं आणि नाही!
यायचे ते मानव, जायचे ते मानव. क्वचित एखादा मानव तिथे अचेतन अवस्थेत सकाळी सापडलाय.

Pages