स्व-काळजी म्हणजे स्वार्थीपणा, आप्पलपोटेपणा मुळीच नव्हे.
स्व-काळजी म्हणजे आखीव-रेखीव आयुष्यही नव्हे.
स्व-काळजी म्हणजे आपले शरीराशी, मनाशी, बुध्दीशी, भावनांशी असलेले नाते, निरंतर चालू असलेला संवाद आणि यातील कधी कुणाचे ऐकायचे हे असलेले तारतम्य.
स्व-काळजी म्हणजे आपल्या बलस्थांनाची आणि मर्यांदाची असलेली जाणीव. पण त्यात अडकून न रहायचं शहाणपणही.
स्व-काळजी म्हणजे स्वत:वर सतत काम करणे.
स्व-काळजी म्हणजे स्वत:च्या गरजा, प्राधान्यक्रम ओळखून घेतलेले निर्णय.
स्व-काळजी म्हणजे एक सुखी, आनंदी, समाधानी आयुष्य जगण्याची ईच्छा,वृत्ती आणि त्याद्रष्टीने सातत्याने केलेले प्रयत्न.
स्व-काळजी म्हणजे स्वत:वर असलेले प्रेम, विश्वास आणि स्वत:चा केलेला आदर.
स्व-काळजी म्हणजे जबाबदारीने घेतलेले निर्णय आणि निर्णयाची घेतलेली जबाबदारी.
स्व-काळजी म्हणजे आयुष्यातील प्रवासाची मजा.
स्व-काळजी म्हणजे शिस्त पण कधीतरी शिस्त मोडण्यातील गंमतही.
स्व-काळजी म्हणजे आपली स्वत:, कुटूंब, नातेवाईक,शेजारी,मित्र-मैत्रिणी आणि समाजाशी विणलेली घट्ट वीण.
स्व-काळजीमधे ढोबळमानाने खालील गोष्टींचा समावेश होतो.
१.आहार
२.विहार
३. निद्रा
४.सवयी
५.विचार/भावना
६.औषधोपचार
ह्या पोस्टस मी ज्या गटात मोडते त्या गटाला डोळ्यासमोर ठेऊन लिहीत आहे. त्यामुळे याला बर्याच मर्यादा आहेत.
तुझी इयक्ता कोणती रे भाऊ?
१.वय-४०+
२. शहरी मध्यमवर्गीय
३. कमी धकाधकीचे, कमी लाभांचे आयुष्य
४.स्वत:साठी जगलास तर मेलास ;दुसर्यासाठी मेलास तर जगलास हे लहानपणी झालेले संस्कार
५. You get life only once ही मोठेपणी आलेली अक्कल.
६. नॅान-मेडिको
फार सुंदर!!! खूप प्रेरणादायी
फार सुंदर!!! खूप प्रेरणादायी लिहीत आहात. विस्तारपूर्वक आणि मोठे भाग टाकावेत.
पुभाप्र.
पुभाप्र.
नेमकं.
नेमकं.
इतरांनीही आपले विचार थोडक्यात लिहावेत.
-------------------------
आता हेच विचार मी अगदी आठव्या दहाव्या वयापासून बाळगून असल्याने 'एक हट्टी मुलगा' या सर्टिफिकेटवर आहे. फक्त ते माझ्या घरात नसून इतरांच्या घराच्या भिंतींंवर टांगले आहे. पायावर धोंडा पडणारच आहे तर तो दुसऱ्यांकडून कशाला पाडून घ्यायचा? आपणच आपल्या पायावर पाडलेला बरा नाही का?
आटपतो.
______________________________
चांगली सुरुवात.
चांगली सुरुवात.
आहार , विहार , निद्रा यांनंतर डोक्यात आपसूक मैथुन हा शब्द उमटला.
शारीरिक, मानसिक आरोग्य आणि स्वकाळजीचा हाही एक महत्त्वाचा भाग आहे.
त्याबद्दल इथे लिहिणं प्रशस्त वाटत नसेल, तर किमान नोंद तरी घ्यायला हवी.
भरत., मग तुम्ही 'भय' नाही
भरत., मग तुम्ही 'भय' नाही लिहिलेत? ते ही महत्त्वाचे आहे ना? आ-नि-भ-मै अशी चौकडी आहे ती.
मोहिनी१२३, रोचक विषय आहे. सध्या व्यवसायामागे धावता धावता स्व-काळजी गौण राहते आहे सगळ्यांची आणि त्याचेच परिणाम बघायला मिळत आहेत. पुढचे लेख आणि विचार वाचायला आवडतील.
छान विचार मांडलेत लेखात..!!
छान विचार मांडलेत लेखात..!!
पुभाप्र..!
योग्य विषयावर मुद्देसूद आणि
योग्य विषयावर मुद्देसूद आणि उपयोगी असं लिहिलं आहे.
प्रत्येक मुद्द्याचा विस्तार करता येईल. (वाचकही तो करू शकतील.)
धन्यवाद सामो,मानव,srd, भरत
धन्यवाद सामो,मानव,srd, भरत,हरचंद,रुपाली,हीरा.
पुढचा भाग लिहीला आहे.
पुढचा भाग लिहीला आहे.