आई-बाबा

Submitted by kavyarshi_16 on 24 June, 2021 - 05:33

ऋण तुमचे कसे फेडू मला कळेना
एवढे कोण कसे प्रेम करू शकते मला वळेना....

एक न पाहता सोसते नऊ महिने त्रास
तर दुसरा पाहतो वाट भरवण्याचा घास

शाळेत सहलीसाठी एक असते परवानगीचे तिकीट
तर दुसरा कधीच कमी पडू देत नाही पैशांचं पाकीट

एक असते वर्षानुवर्षे वाफ चुलीची झेलतं
तर दुसरा असतो शेवटपर्यंत मुलांसाठीच घाम गाळत

एक करिते काटकसर कुटुंबासाठी
तर दुसरा कष्ट च काय रडतो सुद्धा दुसऱ्यांसाठी

थोडक्यात काय ,एक असते संस्कारांची मूर्ती
तर दुसरा पाजत असतो अनुभवांची कीर्ती

एक असते कुटुंबाचा कणखर कणा
तर दुसरा कोणत्याही प्रसंगी ठरतो लढवय्या बाणा

खरंच! आई-बाबा ऋण तुमचे कसे फेडू मला कळेना
एवढे कोण कसे प्रेम करू शकते मला वळेना....
✍ ऋषी

Group content visibility: 
Public - accessible to all site users