वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फॅमिली मॅन २ पहिला, Griiping आहे सामंथा ने छान काम केल आहे पण तिला itkaaaaa dusky का बुआ दाखवल आहे त्यापेक्षा आहे त्या कलर मध्ये किंवा दुसऱ्या कोणा dusky actres ला कास्ट केलं तरी चाललं असतं आणि परत तिचा हिंदी accent masha allah आहे शरद केळकर ला काहीच काम नाहीये यार, जस्ट TP
आणि खूप तामिळ वापरलं आहे जे समजायला वाचावं लागत त्यात थोडा वेळ जातो
बाकी JK आणि तिवारी mindblowing आहेत आणि तिसरा भाग येऊ घातला आहे..

मी पण फॅमिली मॅन पाहते आहे. 3 एपिसोड झालेत, अपेक्षेप्रमाणे आवडते आहे. इथे बरीच चर्चा सुरू आहे. दुसरा धागा काढावा काय? म्हणजे तिथे स्पॉईलर सहित चर्चा करता येईल. आणि अजून सिरीज न पाहिलेल्या मंडळींचा रसभंग होणार नाही.

हो खरंच.
व्यवस्थित धागा हेडर मध्येच स्पॉइलर आहेत असं कंसात लिहून.
मी आता तिसरा भाग (उमियाळ आणी राजी रॉक्स) परत बघतेय.

नाही नाही,
जनरल चर्चा चालू आहे गं दुसरा धागा काढण्यावर
सिरीज बद्दल बोलावं तर वाटतं पण खूप बोललं गेलं तर नकळत स्पॉयलर जातात, म्हणून.

स्पॉयलर म्हणजे सर्वसाधारणपणे रहस्योद्घाटन होऊ नये अशी अपेक्षा असेल तर योग्यच आहे. प्लॉटवर किंवा क्लायमॅक्स वर पण बोलले जाऊ नये हे मान्यच आहे. पण कलाकारांचे अभिनय वगैरेंवर बोलले तर रसभंग होणार नाही असे वाटते.

राभू, तुम्हाला किंवा कुणालाही उद्देशून नाही हो म्हणाले मी, एकंदरीत सगळ्यांना चर्चा करावीशी वाटतेय यावर म्हणून वेगळा धागा काढला इतकंच.

तुझ्या प्रतिसादाबद्दल नाहीये गं चालू.अभिनयाबद्दल इथे लिहीणे पूर्णपणे योग्य आहे.
आता स्पॉयलर धागा निघालाय त्यावर बोलूच!!

'द एलियनिस्ट' बघतोय.
पिरिएड ड्रामा आहे. १८९० ला न्यूयॉर्क मध्ये घडतो. बेघर मुलांना कोणी सिरियल किलर मारतोय त्याला पकडायचं आहे. पण न्यूयॉर्क पुलिस डिपार्टमेंट प्रामाणिक तपास करण्याऐवजी धनाढ्य लोकांना पाठीशी घालण्यास जास्त उत्सुक आहेत. मग त्याकाळी मानसिक रुग्ण म्हटल्याजाणार्‍या समस्या ग्रस्त मुलांना ते त्यांच्या मेंदूच्या ठाशिव विचारांपासून दूर गेले आहेत म्हणून एलियन म्हणत, आणि त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांना एलियनिस्ट म्हणत... तर असा एक एलियनिस्ट (सायकायट्रिस्ट) डॉ. लॅस्लो आणि दोघांची टीम बनते आणि ते समांतर तपास चालू करतात. अशी ढोबळ थीम आहे.
त्या काळानुसार ऐतिहासिक व्यक्ती जसं नवीनच पुलिस कमिशनर म्हणून रुजू झालेला थिओडोर रूझवेल्ट येतो, जे.पी. मॉर्गन येतो. असे पिरिएड ड्रामा लंडनचे खूप बघितले आहेत. ते बघताना जो फील येतो, तसाच फील जुनं न्यूयॉर्क, रस्त्याच्या मधुन दौडत जाणार्‍या घोडागाड्या, बकाल वस्त्या, तेथिल माणसांची मुलांची अवस्था, मुख्यधारेपासून वेगळे असलेल्या मुलांची अवस्था बघुन येतो.
न्यूडिटी फार नाही, पण ग्राफिक कंटेंट आहे. मुलांबरोबर बघण्यायोग्य नाही. दहा भागांची मिनी सिरिज आहे. नेटफ्लिक्सवर आहे.

फैमिली मैन सीझन वन आज सुरू केला बघायला.. दोन एपिसोड्स ओढून ताणून पाहिले.. बोअर व्हायला लागला.. बैड वर्डस पण जास्त आहेत.
पुढचे एपिसोड्स पाहावेत का??इंटरेस्टिंग आहेत का???

हो. नक्की बघा. इंटरेस्टिंग आहे. आणि पुढे पुढे बॅड वर्ड्स खटकणार पण नाहीत. सवय होईल. Lol
स्टोरी छान आहे आणि एक्झिक्यूशन पण.

चिन्मयी Lol
ओके..बघते मग तिसरा पण.
सिझन टु बघायचाय पण पहिला पाहिला नव्हता म्हणून सुरू केला.

तमिळ संघटनेला निगेटिव्ह इमेज मध्ये दाखवल्याने आणि isi कनेक्शन दाखवल्याने जगभरात तामिळ कम्युनिटी ची चुकीची प्रतिमा तयार होईल अशी तमिळ लोकांना(काही) भीती आहे.
त्यामुळे बॅन ची मागणी चालू आहे.

प्राईमवर 'पंचायत-सीझन 1' चे सगळे आठ एपिसोड्स पाहिले.
आवडली, हलके फुलके हसी के फवारे.
शेवटचा एपिसोड पण मस्तच.

आम्ही पण आज 4 पाहिले
आधी पहायला घेतले तेव्हा रटाळ वाटली होती।
पण आता आवडली.त्यात तो मेन नायका बरोबरचा असिस्टंट पण भारी आहे.

हो तो भारीए.
पहिला एपिसोड जरा स्लो आहे पण पुढे पुढे मजा येते.

अरे आता बघताय का पंचायत?
मस्त आहे.
दुसरा सिझन येण्याची वाट बघतेय.
जो शेवट केलाय त्यावरून पुढे काहीतरी हलकंफुलकं बघायला आवडेल.

इव्हन पहिल्या भागातही गावकर्‍यांच्या सहज पण तर्‍हेवाईक वागण्यातून आपोआप निर्माण होणारे विनोद अनेक आहेत. पेठा संपून जाणे वगैरे.

मस्त सिरीज आहे.

आता सनफ्लॉवर बघतोय.
थोडी स्लो आहे मालिका पण भन्नाट आहे.सुनील ग्रोव्हर चा रोल हिलारियस आणि काहीही असा दोन्ही आहे Happy

तीन चार दिवसांपूर्वी दादर स्टेशन वर अडकलो होतो फॅमिली मॅन २ पुर्ण सिरीज एका दिवसात सलग पाहिली... सिझन वन आवडला होताच. या सिझनमध्ये समंथा ने कमाल केलीये.

आता ऊरी हल्ल्या वर आधारित अवरोध पाहतोय...

फैमिली मैन वन सात एपिसोड्स पाहिले.. सहावा एपिसोड थरारक..आज संपवेन सीझन वन.
वर लिहिल्याप्रमाणे नंतर नंतर बैड वर्डस खटकत नाहीत.सवय होते. Wink Lol

Pages