खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Don’t underestimate the power of a hungry kid Proud

गरमागरम पुऱया - मुलींची खास फर्माईश..प्रत्येकीने चार चार बनवतानाच खाल्या
4923FB89-DBF0-43ED-83D4-DD583D07D30C.jpeg

श्रिखंड पुरी आणि छोले
CED2D252-817D-4291-BA47-1040CD6594B7.jpeg

आमच्या शाळेत फक्त, भाजी आणि चपाती आणायची नियम होता. डब्बे चेक सुद्धा करत. त्यामुळे खुपच कंटाळा वाटायचा डबा खायला कधी कधी.
फक्त मस्त उसळी असल्या की मी खायचे. आणि बटाट्याचे विविध भाजी प्रकार.

त्यात, पालेभाजी दिवस सुद्धा होता, त्यावेळी पालेभाजीच डब्यात द्यायची.

इतका परफेक्ट रंग आणि इतका परफेक्ट फोटो कसे काय करता तुम्ही ???
विचारात पडलेली लाळगाळू बाहुली..

ये लाल रंग मुझे दे दे ठाकूर
आमच्याकडे पोरगी हॉटेलसारखी लाल रंगाची भाजी नसल्याने खातच नव्हती आधी
हॉटेलमध्ये टोमेटो भाजी असते आणि ईथे तू मला पावभाजीच्या नावावर पौष्टिक भाज्या खाऊ घालतेयस असे आईला म्हणत होती Happy

भाज्या परतताना काश्मिरी लाल तिखट घालायला सांगा रंगासाठी . बऱ्यापैकी बाहेरच्यासारखी दिसते भाजी . कधी कधी फूड कलर पण असतो बाहेरच्या भाजीत .

अच्छा ओके धन्यवाद Happy
कदाचित घरी माहीतही असेल हे. आता लेकीने तो मुद्दा उपस्थित केलाय तर पुढच्यावेळी त्याची काळजी घेतली जाईल.

बाकी माझे उलट आहे. मला त्या हॉटेलवाल्या भाजीचा लाल रंग आवडत नाही. घरच्या लाल रंगाची खात्री असते. बाहेरचा लाल रंग नेहमी नकली वाटतो. त्यामुळे जितकी जास्त लाल दिसेल तितकी ती नकोशी वाटते. त्यात ती हॉटेलची भाजी आंबटही असते थोडीफार. आणि तरीही सोबत लिंबाची फोड दिली असते, जी बघून "एss ईस को लेके जाओ रे" असे डीडीएलजेच्या शाहरूखसारखे ओरडावेसे वाटते.

मी बॅडगी मिरची पावडर वापरते. फार तिखट नसते आणि रंग पण छान येतो. हल्लीच नवीन पॅकेट फोडलंय म्हणून एवढा लालेलाल रंग आहे.
हॉटेलमधे फूडकलर वापरतातच.

Pages