खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, लाल द्राक्षे आहेत ती

रवाबेसन चा लाडू ..."कशी सुबक टंच बांधणी ...ही तरुण तनु देखणी" टाईप झालाय >> इतकं कौतुक फक्त माबोवरच होतं Happy

रवा बेसन लाडु फार देखणा दिसतोय.
म्हाळसा डबा देणार असेल तर मी परत शाळेत जायला तयार आहे.

म्हाळसा सॉलिड डबा आणि त्यातले पदार्थ पण. डबा तर खूपच आवडलाय मला .
म्हाळसा डबा देणार असेल तर मी परत शाळेत जायला तयार आहे. > मी सुद्धा Happy

एका डब्यासाठी सारे मै हू ना चे शाहरूख खान बनायला तयार आहेत Happy

गुलाबजामचे फोटोही टाक आता, ऊडू दे धुरळा..

एका डब्यासाठी सारे मै हू ना चे शाहरूख खान बनायला तयार आहेत>> मक्काय, आणि मला किरण खेर बनवण्याच्या मागे पडलेत Proud

विद्यार्थी म्हणुन घेत नसतील तर शिक्षक म्हणून. शेवटी डबा लागतोच ना.>> मला स्टॅनली का डब्बा मधल्या मुलांचा डबा खाणाऱया शिक्षकाची आठवण झाली Happy

वर्णिताच्या गुलाबजामना झब्बू
B7D5B4B3-29D9-4B42-B9DF-2D31DF67107E.jpeg6A731981-F16C-41A4-9524-4537D5F1AF5C.jpeg

हे आठवले..
सबकी मा ऐसे टिफिन नही देती लक्ष्मण..

IMG_20220812_174442.jpg

गुलाबजाम खतरनाक!
अप्प्यांपर्यंत आलाय.. हळूहळू पोळी भाजीकडेच जाणार>>> Happy माझ्या जावेचा मुलगा शाळेत असताना पोळी-भाजीचा डबा नकोच म्हणायचा. (त्याचेही बरोबरच होते.) सकाळची शाळा अन मधली सुट्टी १० वाजता असायची. डब्यात भाजी-पोळी दिली कि तो डबा खायचाच नाही. दुपारी घरी आला कि डबा खायचा आणि सांगायचा कि ही वेळ पोळी भाजी खायची आहे.
असे २-४ वेळा झाले मग त्याच्या आईने नाश्त्याचे पदार्थ डब्यात द्यायला सुरू केले. पण शाळेतल्या बाई अधूनमधून डबा चेक करायच्या. तेव्हा त्या म्हटल्या ‘तुझी आई पोळी भाजी करत नाही का?’ त्यावर हा बोलला कि ‘करते ना पण ती मी दुपारी खातो. आता माझी नाश्त्याची वेळ आहे.’
माझी शाळाही कायम सकाळची असायची. तेव्हा मी आईला सांगायचे कि तू शिरा, पोहे, उपीट नाही दिले तरी चालेल, रोज फोडणीचा भात देत जा : )

Sonali >>> किती स्पष्ट विचार त्याचे Happy .
मलाही पोळी भाजीचा डबा मिळायचा. मग मी घरी परत घेऊन यायचे म्हणून आईने बाईंकडे तक्रार केली. त्या मला त्यांच्या बाजूला बसवून डबा संपावयाला लावायच्या. माझ्याकडे option नव्हता.

अरे लोकहो, मला सात आठ नको. मी ३ मध्येच खूष आहे पण द्या ना Wink काय हे म्हणुनच म्हणते आवरा या म्हाळसा आणि अस्मिताला.

आ हा हा, गुजा , जबरी !
श्रीखंड, धिरडी, ताट , डबे, तोंपासु.
माझं काय सिक्रेट मानवदादा, मीच विसरले. Happy

मग मी घरी परत घेऊन यायचे म्हणून आईने बाईंकडे तक्रार केली>> हे भारी आहे
त्या मला त्यांच्या बाजूला बसवून डबा संपावयाला लावायच्या>>आणि हे त्याहून भारी आहे Proud

गुलाबजाम कमी काला जामुन ची साईझ वाटतेय>> वाह काय निरिक्षण.. गुलाबजामच्या पॅकेटवर ८० गुलाबजाम बनतील लिहीलेलं.. इतके कोण बनवत बसणार म्हणून ४० एक बनतील इतके मोठे बनवले

इतके कोण बनवत बसणार म्हणून ४० एक बनतील इतके मोठे बनवले>>> मीही तसेच करते. बराच वेळ वाचतो.
गुलाबजामून करपवला कि कालाजामून होतो का?

गुलाबजामून करपवला कि कालाजामून होतो का?>> नाही, काजा मधल्या पनीरमुळे काळा रंग येतो, मंद आचेवर जास्त वेळ तळायचे. गुजा मध्ये पनीर नसते.

म्हाळसा, तू कमालीची दुष्ट आहेस Proud असे फोटो टाकतं होय कुणी?
माझी शाळेत जायची तयारी नाही. नुसते रोजचे डबे पाठवशील का त्यापेक्षा? Wink Proud

वाह काय निरिक्षण.. >>>> गुलाबजाम डाय हार्ड फॅन असल्यावर इतना तो बनता है Happy

- कधीकाळी एकाचवेळी १५-१६ गुलाबजाम खाणारा आबा Proud

सम दम आलू & ढब्बू मिरची
दोन्ही भाज्या खूप टेस्टी झाल्या होत्या आणि एकमेकांसोबत चव आणखी चांगली लागत होती.
त्या दिवशीच मोठ्या कौतुकाने हा फोटो टाकायला आलेलो पण अस्मिता आणि म्हाळसाने उघडलेले फाइव्ह स्टार हॉटेल बघून मी गरीब बिचाऱ्या धाबेवाल्याचे धाबे दणाणले आणि गपचूप परत फिरलो Proud

IMG_20220813_131647.jpg

वॅाव, ढब्बू मिरची यम्मी दिसतेय

तू कमालीची दुष्ट आहेस >> तरी तो शेवटचा गुलाबजामचा फोटो मी टाकणार नव्हते.. मला माहित होतं कि मला शीव्या पडतील Proud

कधीकाळी एकाचवेळी १५-१६ गुलाबजाम खाणारा आबा >> अहो आबा माझा नवराही ह्याच कॅटेगरीतला आहे.. पूर्वी कधीतरी २३ गुलाबजाम खाऊन पाकही गटागटा प्यायल्याचा किस्सा घरचे सांगतात.

वा ! सगळे पदार्थ पाहून तोंपासू . व्हरच्युल फोटू पाहून चव घेता यायला पाहिजे अशी काहीतरी सोय हवी होती Biggrin

आज दुपारी भरगच्च जेवण झाल्याने रात्री हलक फुलक. आलिया भट्टच्या रेसिपीने केलेलं बीटरूट सलाड

20220816_203052.jpg

आलिया भट म्हणजे आपली हिरोईन? तिचाही काही चॅनेल आहे का? की शेफ लोकांमध्येही कोणी आलिया भट आहे..

बाकी दिसतेय छान .. पण
बीट म्हणजे पौष्टिक. माझा पास. आय मीन मी नापास.

Pages