साखरपुडा ज्याला ईंग्रजीत Engagement असे म्हणतात. ज्या नावातच अर्थ स्पष्ट आहे की हा सोहळा पार पडल्यावर मुलगा आणि मुलगी एकमेकांसोबत Engage झाले. दोघे एकमेकांसाठी बूक झाले. आणि म्हणूनच त्या डीडीएलजे'मध्ये राजवर प्रेम करणारी सिम्रन आपला साखरपुडा पारंपारीक नियमानुसार होऊ नये म्हणून मुद्दाम ज्या हातात अंगठी घालायची असते तेच बोट दुखवून घेते आणि अंगठी चुकीच्या बोटात कशी घातली जाईल हे बघते. जणू काही अंगठी योग्य बोटात जात परपुरुषाशी एंगेजमेंट झाली असती तर हिरोईन पवित्र राहिली नसती वा हिरोने तिच्या प्रेमात असणे पापच ठरले असते
असो, तसे तर लग्नानंतरही कायदेशीर पद्धतीने घटस्फोट घेऊन दुसरा विवाह करणे किंवा बेकायदेशीर पद्धतीने जुन्या प्रेयसी प्रियकराबरोबर पसार होणे हे समाजात घडतेच. मग या एंगेजमेंटमागचा नेमका हेतू काय असतो?
आज हा प्रश्न पडायचे कारण म्हणजे परवाच आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला. म्हणजे हॅपी (असं म्हणायची पद्धत असते) वेडिंग अॅनिवर्सरी. बघता बघता तब्बल अकरा वर्षे झाली. काळ खरेच किती वेगवान असतो. म्हणजे माझे गर्लफ्रेंडसोबतचे फिरणे, मग लग्न, मग संसार, पोरंबाळं.. अगदी काल परवाच सारे घडल्यासारखे वाटते.
असो, बालविवाहाचे फायदे तोटे या सदराखाली हे पुन्हा कधीतरी..
तर आमच्यापेक्षा जास्त आमची मुलगीच एक्सायटेड होती. तिचे हे सर्व मैत्रीणींना सांगून झाले. त्यात तिला समजले की तिच्या एका मैत्रीणीच्या आईवडीलांची एंगेजमेंट अॅनिवर्सरीही त्याच दिवशी आहे. मग पर्यायाने आम्हाला अँगेजमेंट म्हणजे काय हे विचारणे आले. ते काय असते हे सांगितल्यावर तुमची नाही का झाली हा पुढचा प्रश्न आला. तेवढाच तिला अजून एक दिवस सेलिब्रेशनला मिळाला असता, आमच्या एंगेजमेंटच्या अॅनिवर्सरीलाही एक केक आणखी कापला गेला असता, हा तिचा यामागचा हेतू..
पण हाय रे तिचे दुर्दैव.. आमचा साखरपुडा त्याच दिवशी झाला होता. म्हणजे सकाळी साखरपुडा, दुपारी पुण्यवचन, संध्याकाळी शुभविवाह आणि रात्री स्वागतसमारंभ असे एकाच दिवसभरात सारे उरकून टाकले होते...
झालं, आता ईथे पुन्हा कन्फ्यूजन ..
जर एंगेजमेंट म्हणजे नवरा बायकोने एकमेकांना एंगेज करणे, अॅडवान्स बूकिंग करणे, आपला क्लेम लावणे याचसाठीच असेल तर आमची एंगेजमेंट वा साखरपुडा मुद्दाम म्हणून सकाळी का केला गेला.. असे कोण होते आमच्यात जे भर दुपारी उन्हात लग्न सोडून पळून जाणार होते, जे या एंगेजमेंटची गरज भासली
आता यातही आणखी एक गंमत म्हणजे त्या सकाळच्या साखरपुड्याच्याही नऊ महिने आधी आम्ही गपचूप रजिस्टर मॅरेज केले होते, मात्र साथिया चित्रपटाप्रमाणे आपापल्या घरी राहात होतो. पण नंतर पारंपारीक पद्धतीने केलेल्या या विवाहाआधी हे उघड झाले होते म्हणा. त्यामुळे रजिस्टर का असेना, लग्न झालेल्या दोन जीवांचा पुन्हा साखरपुडा करण्यात काही लॉजिकच नव्हते. ते सुद्धा त्याच सकाळी..
याचाच अर्थ हि साखरपुड्याची प्रथा वा परंपरा फक्त बूकिंगसाठी नसून यामागे काही धार्मिक शास्त्रही असावे. ते जाणून घ्यायला हा धागा.
यानिमित्ताने देशोदेशीच्या गावोगावच्या साखरपुड्याच्या पद्धतींबद्दल माहिती मिळाली तर ऊत्तमच.
आमच्यात एकमेकांना रिंग घालण्याव्यतिरीक्त नेमके काय केले होते हे आता फारसे आठवत नाही. कारण दिवसभरात साखरपुडा, पुण्यवचन, शुभविवाह, स्वागत सोहळा असे चार समारंभ आणि चार वेळा चार कपडे घालून तयार होणे यातच माझा सारा दिवस संपला. ती अंगठी सुद्धा मी त्या दिवसानंतर जी बोटातून काढली ती मला दागदागिन्यांची बिलकुल हौस नसल्याने आयुष्यात पुन्हा कधी घातली नाही. कधी पुन्हा पाहिलीही नाही.
पण ज्यांना हौस आहे त्यांनी मतदान केल्यावर बोट दाखवणारा सेल्फी शेअर करतात तसे त्या अंगठीचा बोट दाखवणारा सेल्फी ईथे शेअर केला तरी चालेल
आपण कितीही काहीही म्हणलं तरी
आपण कितीही काहीही म्हणलं तरी पूर्वी लग्न मोडणं हा so called गुन्हा होताच की.
>>>
हो हे कर्रेक्ट आहे, तेव्हाच्या विचारसरणीचा विचार करता योग्य आहे.
त्यात लग्न तुटल्याची आणि समोरच्या पार्टीने तोडल्याची बदनामी फार असायची. लग्न तुटलेल्या मुलीचे वा काही वेळा मुलाचेही पुन्हा लग्न जमणे अवघड असायचे.
आपल्याकडच्या बऱ्याच प्रथा या
आपल्याकडच्या बऱ्याच प्रथा या पूर्वीच्या त्या वेळांसाठी योग्य होत्या. आता काळानुसार त्यात बदल केले गेले पाहिजेत. पण असो! लोकांना बदलू शकत नाही. आपण आपल्यापुरते बदल करायचे.
यानिमित्ताने देशोदेशीच्या
यानिमित्ताने देशोदेशीच्या गावोगावच्या साखरपुड्याच्या पद्धतींबद्दल माहिती मिळाली तर ऊत्तमच. >>> देशोदेशीच्या प्रथा माहीत नाहीत, पण आपल्याकडेच उत्तरेत सापु सारखं प्रकरण 'रोका / रोक्का' असतो. हिमाचलच्या एका आजींनी सांगितलं की रोक्का म्हणजे त्या मुलाला/मुलीला कुंकू लावुन थोडेसे विधी करून आपल्यासाठी रोक के रखना. त्या कुटुंबाने पुढे अजुन काही स्थळं पाहु नयेत किंवा दुसरीकडे लग्न जमवु नये म्हणुन त्यांना रोकणे.
साखरपुडा प्रथेबद्दल माझ्या स्वयंपाकाच्या मावशींनी छान पटण्यासारखी माहिती सांगितली होती. वर कोणी लिहिलं आहेच की पूर्वी लहान वयात लग्न ठरवुन पुढे वयात आल्यावर लग्न करायचे. त्या लग्न ठरवणे विधीनन्तर एकमेकांना गोड भरवणे किंवा साखर वाटणे प्रथेमुळे कदाचित साखरपुडा नाव असावं. किंवा मग त्या लहान मुलीला लग्न ठरल्यावर साखरफुटाणे / बत्तासे असे काही साखरेचे पदार्थ खाऊ म्हणून पुड्यात भरून देत असतील म्हणुन मग तो लग्न ठरवण्याचा विधी साखरपुडा असेल. आताही मुलीला पेढ्यांचा किंवा इतर स्वीट्सचा बॉक्स देतातच.
का करतात माहित नाही. पण
का करतात माहित नाही. पण करताना आमच्याकडे बाकायदा सुशोभित करून साखरेचा पुडा देतात. आमच्या सापुला नवर्याने असा सापु सजवून वगैरे ठेवलेला. पण द्यायलाच विसरला. लग्नही त्याच दिवशी असल्याने कुणाच्या लक्षात आले नाही. लग्नानंतर, फिरून वगैरे झाल्यानंतर मलाच एकदा घरात सापडला. तेव्हा कळलं की हा सापुच्या दिवशी द्यायला पाहिजे होता.
पूर्वी गावात सासरे मुलीला/मुलाला अंगठी घालायचे. एका नातेवाईकाच्या सापुमधे हा प्रकार बघून आम्हाला आश्चर्य वाटलं होतं
पुढचा धागा आपल्यात लग्न का
पुढचा धागा आपल्यात लग्न का करतात असा असेल का? त्यापुढे आपल्यात हनिमून का करतात वगैरे??
आपल्यात साखरपुडा का करतात?
आपल्यात साखरपुडा का करतात?
>>> पूर्वी इंटरनेट नव्हते, तेंव्हा लग्न कोणाशी जमलंय हे सर्व नातेवाईकांना कळावे म्हणून साखरपुडा करत.. प्रत्येकाला नवरा मुलगा आणि मुलगी बघता यावी, ओळख व्हावी म्हणून...
@ फिल्मी
@ फिल्मी
पुढचा धागा आपल्यात लग्न का करतात असा असेल का? त्यापुढे आपल्यात हनिमून का करतात वगैरे??
>>>>>>>>
असा एक धागा आहे माबोवर अगोदरच. खरेच विषयात रुची असेल तर तिथे लिहू शकता.
लग्नानंतरचा मधुचंद्र - एक वायफळ खर्च म्हणू शकतो का?
https://www.maayboli.com/node/62579
पूर्वी इंटरनेट नव्हते,
पूर्वी इंटरनेट नव्हते, तेंव्हा लग्न कोणाशी जमलंय हे सर्व नातेवाईकांना कळावे म्हणून साखरपुडा करत..
>>>>>
हे सुद्धा कारण असू शकते. नातेवाईकांना एकदा कळाले की मग ते एखादे जवळचे स्थळ घेऊन यायचेही बंद होतील.
अन्यथा त्यांना कल्पना नसल्यास ते एखादे नवीन स्थळ घेऊन आले आणि मुलाला/मुलीला तेच जास्त आवडले तर मन उगाच दोलायमान स्थितीत
माझ्या प्रेमविवाहाला विरोध करतानाही आधी घरच्यांनी हा पत्ता फेकलेला. आम्ही दोनतीन स्थळे बघितली होती तुझ्यासाठी, ती एकदा बघून घे, त्या मुलींशी भेटून घे, मग हवे तर कर त्याच मुलीशी...
मला समजला त्यांचा डाव, कारण आधीपर्यंत माझ्या लग्नाचा कधी मस्करीतही विषय नव्हता घरी वा नातेवाईकांकडे, तर अचानक कुठून आली हि स्थळे मला सरप्राईज द्यायला? मी तयार झालो असतो तर आयत्यावेळी धावाधाव करून मग काही आमच्याच जातीतल्या रंभा मेनका उर्वशी शोधल्या असत्या आणि मला दाखवल्या असत्या
तुझ्या साखरपुड्याच्या वेळी
तुझ्या साखरपुड्याच्या वेळी विचारायचे ना सर्वाना
पुढचा धागा काढ कन्यादान का करतात, पाय का धुतात, हार का घालतात, मुंडावळ्या का बांधतात, साडीच का नेसावी, शेलाच का घ्यावा, मंगळसूत्र का घालावे, मंगळसूत्राच्या वाट्या उलट्या का घालाव्या , देवक का करायचे, गौरीपूजा च्या वेळी गप्प का बसायचे, तोंडात विडा का देतात, उपास का करतात, होम का करतात, प्रदूषण वर उपाय काय इइइ
तुझी कळकळ नुसती कळफलक बडवून व्यक्त करण्यापेक्षा जुनाट irrelevant विधी नाहीसे करण्यासाठी काय करता येईल ते बघ,
>> माझ्या प्रेमविवाहाला विरोध
>> माझ्या प्रेमविवाहाला विरोध करतानाही आधी घरच्यांनी हा पत्ता फेकलेला. आम्ही दोनतीन स्थळे बघितली होती तुझ्यासाठी, ती एकदा बघून घे, त्या मुलींशी भेटून घे, मग हवे तर कर त्याच मुलीशी...
मला समजला त्यांचा डाव, कारण आधीपर्यंत माझ्या लग्नाचा कधी मस्करीतही विषय नव्हता घरी वा नातेवाईकांकडे, तर अचानक कुठून आली हि स्थळे मला सरप्राईज द्यायला?
शी: किती रे चीप मेंटॅलिटी तुझ्या घरच्यांची!
>> मी तयार झालो असतो तर आयत्यावेळी धावाधाव करून मग काही आमच्याच जातीतल्या रंभा मेनका उर्वशी शोधल्या असत्या आणि मला दाखवल्या असत्या Happy
तु तर एकदम सेक्सिस्टच आहेस की. अर्थात बरोबरच आहे, घरचेच असले म्हणल्यावर ... आडात नाही तर पोहर्यात ई ई.
तुला रे कशाला हव्या रंभा मेनका उर्वशी? सती सावित्री अस नाही ना आल तोंडातुन? स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तु आहे अस मनात असल्यावर असच होणार. उगाच नाही तुला तुझ्या मुलीचा बाप होण अवघड वाटत.
तु कुठला रे ईंन्द्र? ज्याचा रंभा मेनका उर्वशी ऊXत नाही? उद्या कुणीतरी तुझ्या मुलीला रंभा मेनका उर्वशी नाही म्हणून नाकारल तर कस वाटेल?
तुझी जात कुठली ते नाही माहीती पण नवीन जाती व्यवस्थेच्या उतरंडी वर असल्या चीप मेंटॅलिटी च्या लोकांना एकदम खाली फेकून दिले पाहीजे.
प्रतिसाद अजिबातच आवडला नाही.
प्रतिसाद अजिबातच आवडला नाही.
अहो त्यांनी तो आवडायला
अहो त्यांनी तो आवडायला लिहीलाच नव्हता. डु आयडी आहेत ते. मागचा माणूसही नेमका कोण हे आपल्याला ठाऊक नाही.. मग का ईतका विचार करावा. त्यांनी लिहिले. हलके झाले. देव त्यांचे भले करो
Pages