
निखळ आनंदास-गोविंदासही
कोणे एकेकाळी.....
अभिनेता गोविंदा मला कधीही क्लासी वाटायचा नाही. एवढंच काय ज्यांना तो आवडतो तेही क्लासी नाहीत हेही मी ठरवले होते. स्वतंत्रविचारसरणीमुळे सगळ्यांचा क्लास मीच ठरवायचे. बेसिकली मीच एकटी क्लासी यावर माझा अढळ विश्वास होता. अजूनही जुन्या अस्मिताचा रेसेड्यू माझ्यात आहे व तो अधूनमधून फणा काढतोच.
गोविंदाचे डोळे हे चंचल नेत्र होते, असे लोक मला आजही विश्वासू वाटत नाहीत ,जणू काही मला गोविंदासोबत इस्टेटीचे व्यवहारच करायचे होते. माझ्या भावाला गोविंदा आवडायचा. तो व्यापार खेळताना जेव्हां वडिलोपार्जित धन रूपये दोन हजार पाचशे पन्नास जिंकायचा तेव्हा त्याला हर्षवायू व्हायचा. इथे मी बँकेशेजारी मांडी ठोकून बँकेतला अर्धा माल हडप करायचे त्याला कळायचं सुद्धा नाही.
शिवाय तो इतका भोळा होता की त्याला फसवणं फार सोपं होतं , आळशी असल्याने मला अवघड कामापेक्षा सोपे काम आवडते म्हणून मी त्याला जन्मभर फसवलेलं आहे. नीतिपाठ दिले नसते तर मी कुठल्या कुठे गेले असते आणि आज नेटफ्लिक्सने माझा माहितीपट लावला असता. असो. (बायदवे, हे 'असो' किती सत्तरीतले वाटते नं ,असो !)
या दोन हजार पाचशे पन्नासात होणाऱ्या हर्षवायूमुळे तो अल्पसंतुष्ट आहे , गोविंदा न आवडला तर नवलच हा विचार मी मनात करायचे. माझ्या सगळ्याच भावांना गोविंदा फार आवडायचा , त्यामुळे मला आमच्या घरी व आजोळी सुटका नसायची, त्यांनी माझा मेंदू धुवायचा पुष्कळ प्रयत्न केला पण मी नर्मदेतल्या गोट्यासारखी अभेद्य राहिले. मी एखाद्या माणसाबद्दल एकदा मत बनवले की नंतर माझे मत बदलले असले तरी मी ते कबूल करायचे नाही. त्याने मला कमीपणा येईल असे वाटायचे ,कमीपणापेक्षा खोटारडेपणा अहं पोषणासाठी पूरक व बुद्धीसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे मी वाका-वाका करेल पण मोडणार नाही या तत्वावर जगायचे !!
आजोळी गेल्यावर मात्र त्याला सोबत म्हणून चार भावंडं मिळायची ,सगळी मुलं. बहिणी खूप लहान किंवा खूप मोठ्या होत्या. मगं मला एकटीने खिंड लढवावी लागायची. सारखं गोविंदाची गाणी आणि सिनेमे ,आनंदाने एकमेकांना ओरडून ओरडून हाका मारून त्या वाड्यात असतील तर या वाड्यात रंगीत टिव्हीवर बघू अशा गोविंद-योजना व्हायचा.
क्वचितच लाइट असायची, म्हणजे असल्यावर आवर्जून सांगावे अशी परिस्थिती. आमच्या घरी परतल्यावर रात्री जेवताना ताटातलं अन्न दिसायचं ह्याचंच काही दिवस अप्रुप वाटायचं. पण मिणमिणत्या चिमणीच्या प्रकाशात केलेल्या अंगतीपंगतीच्या आनंदामुळे प्रेमळ सोबतीची किंमत कुठल्याही भौतिक गोष्टींपेक्षा जास्त असते हे आता कळतयं !!
भर उन्हात बाहेर खेळायला जाता आले नाही की दुपारी घरी टिव्ही बघणे व्हायचेच. पत्ते, व्यापार लपाछपी यात तास दीड तासातल्या क्वॉलिटी टाइम मधली क्वॉलिटी संपून भांडणे सुरू व्हायचेच. तुझा पत्ता जळाला , तू पैसे चोरले , बुडवले , चार पडले होते तरी जेल नको म्हणून खोटंच सहा म्हटले , तू मला धप्पा जोरात देऊन स्कोअर सेटल केलास, माझ्यावरंच का राज्यं सारखं अशा ना ना तर्हा असायच्या. असे राडे सुरू झाले की मामा टिव्ही बघण्याचा आग्रह करायचा. बाकी बायाबापड्या ज्यानं टिव्हीचा शोध लावलायं त्याचं भलं चिंतायच्या. कुणीतरी 'काय माय कडंकडं करतात लेकरं आम्ही नव्हतो अशे' हे सुविचार रिपीट करायचे. सगळ्याच मुलांना ऐकावे लागणारे त्रिकालाबाधित सत्य...!!
तर लाइट असणे म्हणजे या छोट्या खेड्यात कपिलाषष्ठीचा योग , त्यात टीव्हीवर गोविंदाचा सिनेमा लागणे म्हणजे आधीच 'मर्कटा त्यात मद्य प्याला' गत व्हायची. कोणीच खेळायला नसल्याने मी पहायचे अगदीच आनंदाने पहायचे पण पाहिल्यासारखं करतेयं असं दाखवायचे.
'राजाबाबु' सारखा आचरट सिनेमा किती वेळा पाहिलायं गणतीच नाही. तोच कशाला सगळेच नंबर वन माळेतले सिनेमे अनेक वेळा बघत हसून धमाल केलेली आहे. तो सुट्ट्यांचा एकत्र वेळ बरेचदा अशा हलक्याफुलक्या सिनेमांमुळे व त्या मुग्ध /बावळट सहवासाने मजेदार गेलायं. आताही पुन्हा पहाते तेव्हा मनाने त्या आश्वस्त काळात जाऊन येते. उगाच !!
कधीतरी 'उगाच' वाटणाऱ्या गोष्टीही कराव्यात, मन रमतं. बरेचदा त्या गोष्टीपेक्षा ती गोष्ट कुणासोबत केली हेच महत्त्वाचे ठरते , म्हणजे ते फक्त निमित्तं असते. प्रत्येकाला असं निमित्तं हवं असतं , ज्यात पुन्हा लहान व्हावं, पुन्हा वेडं व्हावं.
गोविंदा मला आवडतो का याचे उत्तर अजूनही मला माहिती नाही , आणि मला जाणूनही घ्यायचे नाही. जाणून घ्यायला वापरावी लागणारी बुद्धीही खर्चायची नाही , निर्मळ आनंद घ्यायचा. खरंतर हा लेख त्या गोविंदाबद्दल ही नाही फक्त निर्भेळ आनंदाचा कुठलाही क्षण 'गोविंद' होऊ शकतो. कधीतरी मोठमोठ्या तात्विक गोष्टींचा कंटाळा येतो, कशाचा ताळमेळ कशाला रहात नाही, आपण माणूस आहोत की घाण्याला लावलेला बैल वाटत रहाते. तेव्हा असे एकदोन क्षणही मनाला रम्य अशा आश्वस्त काळाची सहल करून आणतात.
कधी उठताबसता पायाला कळ लागली किंवा चालताचालता ठेच लागली की आई 'गोविंद, गोविंद' म्हणायची तेव्हा मी तिला नेहमी गोविंदाच का कधीतरी 'शाहरूख खान-शाहरूख खान किंवा अक्षयकुमार-अक्षयकुमार' म्हण की
म्हणायचे, तसं ती 'परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला' नजरेने बघायची व "पाप लागेल गं मला" म्हणायची. पापपुण्य वगैरे आहे की नाही माहिती नाही पण हा लक्ष विचलित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे हे आता कळतयं. शेवटी कधीतरी एक उगाच वाटणारा निर्भेळ आनंदाचा क्षण सुद्धा माणसाला असंच तवानं करून जातो. तो कसा शोधावा हे आपण आपलेच ठरवावे.
Because, sometimes greatest moments in life are the simplest..!! आहे त्या वेडेपणाला/बालपणाला सांभाळून घेऊ ,आणि पुरवून पुरवून वापरू , मुग्ध आहे पण अमर्याद नाहीये ते !!
--
अटी त.टी. हे लेखन विनोदी आहे का हलकेफुलके ललित ते कळत नाहीये. विनोदी म्हणजे अर्चना पुरण सिंह आणि हलकेफुलके म्हणजे मंद हसणारे नारदमुनी , किंवा दोन्हीच्या मधले... तुम्हीच ठरवा.
आभार
©अस्मिता
चित्र टाकायला आवडतं (वेमा योग्य नसल्यास कळवणे) आंतरजालाहून साभार #कूलअँडस्मार्ट.कॉम.
भारीच लिहिलंस. मस्त वाटलं.
भारीच लिहिलंस. मस्त वाटलं.
गोविंदा , कादरखान , शक्ती कपूर जोडगोळीचे पिक्चर डोकं बाजूला ठेवून पाहायचे . मजा येते. मूड फ्रेश होतो
आपल्याकडे टवाळा आवडे विनोद अस म्हणतात. त्यामुळे कदाचित गोंविदाच्या चित्रपटाना नाक मुरडली जात असावीत. एलिट क्लासवाल्याच्या यादीत स्थान मिळाले नसावे. बट हु केअर्स ! गोविंदाचा डान्स , त्याचं विनोदाचं टायमिंग मस्त आहे.
बादवे गोविंदाचा शिकारी नावाचा चित्रपट जरूर बघा. विनोदी अभिनयाच्या चौकटीत अडकून राहिल्यामुळे त्याचे इतर अभिनय गुण तितकेसे टॅप झाले नाहीत. शिकारी चित्रपटात त्याने निगेटिव्ह रोल केलाय. वेगळाच गोविंदा पाहायला मिळतो. त्यातलं 'बहोत खूबसुरत गझल लिख रहा हु , तुमहें देखकर आज कल लिख रहा हु ' हे गाणं आवडतं.
अस्मे भारी लिहीलंयस. मला
अस्मे भारी लिहीलंयस. मला ऑफिसमध्ये माझी एक मैत्रीण चिडवायची मला गोविंदा आवडतो असं. नंतर मलाही वाटायला लागलं कि हो आवडतो गोविंदा तर मग काय झालं? शेखर सुमन च्या शो मध्ये आला होता गोविंदा तेव्हा गायला होता. आयहाय काय गायला होता. मला त्याचा आवाज आणि गाण्याची स्टाईल दोन्ही खुपचं आवडलेलं. आता त्या शो चं रेकॉर्डींग माहिती नाही आहे तरी का. Movers & shekers
सीमंतिनी, ते झिंगलाला गाणं
सीमंतिनी, ते झिंगलाला गाणं पाहून माझा आजचा दिवस धन्य झाला
'चला हवा येऊ द्या' मधे
'चला हवा येऊ द्या' मधे गोविंदा व त्याची बायको हे दोघं आले होते. एवढा धमाल एपिसोड होता तो मी दोनदा पाहिला. सगळेच वेडे आणि योग्य टाईमिंग असलेले एकत्र आल्याने तुफान मजा आली होती. त्याची बायको सुनिता पण प्रचंड हजरजबाबी व मिश्किल आहे. लिंक मिळत नाही पण पुन्हा कधी लागला तर नक्कीच बघा.
छान आठवण केलीस.
धनुडी मी शोधते मिळाले तर.
जाई मलाही आवडतं ते गाणं.
अस्मिता काय छान लिहिले आहेस.
अस्मिता काय छान लिहिले आहेस. गोविंदा आम्हा भावंडाना काय आमच्या आई वडिलांना पण आवडायचा. त्याचा कूली नं 1, राजा बाबू,साजन चले ससुराल,हिरो नं 1 कितिही वेळा आणि कधी ही पाहू शकते.
माझे वडिल सांगायचे की गोविंदा एकच हिरो आहे जो गाण्याच्या ठेक्यावर नाचतो त्याला ते हिंदी चित्रपटाचा दादा कोंडके म्हणत. त्याचे चित्रपट म्हणजे सर्व परिवाराबरोबर बसून पाहता येत.
मी पहिल्यांदा बंगलोर पाहिले तेव्हा तेथील विधान सौधा आणि बंगलोर हाय कोर्ट यातील रोड पाहून खूप खुश झाले होते. गोविंदा आणि करिष्माचे 'मै तो रस्ते से जा रहा था' गाणे तिथेच शूटिंग झाले आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
ईलझामपासूनच मी त्याचा फॅन आहे
आई ग्ग हा लेख कसा दिवसभरात मिस केला...
मस्तच !
मी लहानपणी आधी डिस्को डान्सर मिथुनचा आणि त्यानंतर डान्ससाठीच गोविंदाचा फॅन.. अगदी माझ्या आजोळी जे सर्व अमिताभचे फॅन होते त्यांच्याशी कचाकचा भांडायचो.. मग त्यानंतर एकदा त्यांनी शोले दाखवला.. तो आठवड्याभरात रोज एकदा असे सहा सात वेळा सलग पाहिला आणि अमिताभचाही फॅन झालो ते वेगळे..
पण मधल्या काळाच्या गॅपनंतर जेव्हा गोविंदा कॉमेडी कलाकार म्हणून पुढे आला तेव्हा तो माझ्यासाठी नुसता आवडीचाच नाही तर माझ्यामते या क्षेत्रातील लिजंड झाला _/\_ त्याच्या अफाट टायमिंगला तोड नाही..
त्याचा बावर्चीसारखा हिरो नंबर वन पाहिअल तेव्हा त्याचे जुन्या क्लासिकल कॉमेडी म्हणजे अंगूर, गोलमाल, चुपकेचुपके वगैरे सर्वच चित्रपटांचे गोविंदाला घेऊन रिमेक बनायला हवे होते असे वाटते.
आपल्या सल्लूभाईला सुद्धा पार्टनरमधून त्याने पुनर्जीवन दिले..
भागमभागमध्ये अक्षय कुमार सोबत होता, पण अक्षयकुमारने तो आपल्याला भारी पडणार हे समजल्याने त्याचा गेम केला त्या चित्रपटात, त्याला साईडला कसे ढकलले गेलेय हे स्पष्ट दिसते तो चित्रपट बघताना..
असो,
असो,
पण ज्या पहिल्या गोविंदाच्या प्रेमात होतो त्याचा डान्स.. आहाहा.. अगदी चुम्मा होता तो.. त्याच्या फेव्हरेट गाण्यांची लिस्ट टाकतो..
ईलझामपासूनच मी त्याचा फॅन आहे. तेव्हाच त्याने वेडे केलेले... मुद्द्दाम शोधून ऐकली आज ही गाणी
मै आया तेरे लिये.. ईलझाम
https://www.youtube.com/watch?v=e7stZmS1t_E
आयेम ए स्ट्रीट डान्सर - ईलझाम
https://www.youtube.com/watch?v=T6rl6eOYxKk
दुनिया की ऐसी की तैसी - ईलझाम
https://www.youtube.com/watch?v=fFqRN7HPfAI
पहले पहले प्यार की - ईलझाम
https://www.youtube.com/watch?v=XlJTmOEXnuQ
आणि त्यानंतर या गाण्यांनी आणखी त्याचा कट्टर फॅन बनवला...
मै से मीना से ना साकी से.. आप के आ जाने से - खुदगर्झ ... आहाहा चुम्मा साँग
https://www.youtube.com/watch?v=5pCGb6p4oIM
मै प्यार का पुजारी - हत्या --- यातली त्याची एक लंगडीतून उडी मारायची स्टेप आमच्याईथे पोरं फुल्ल फॅन झाली होती.
https://www.youtube.com/watch?v=_ssTxAaPuJk
वोह कहते है हम से, ये उमर नही है प्यार की.. - दरिया दिल
https://www.youtube.com/watch?v=_wH5nxKj-Vk
चलो चले कही दूर चले, प्यार के लिये ये जगह ठिक नही - सिंदूर
https://www.youtube.com/watch?v=oTyiKw0NsW4
मुकाबला, मुकाबला, तेरे भक्त जनो का मुकाबला - मरते दम तक
https://www.youtube.com/watch?v=D-ngSA715qg
आणि या मरते दम तक चित्रपटात गोविंदा मेलेला.... तेवढे दुख मग पुन्हा कुठल्या चित्रपटात हिरो मेल्यावर झाले नाही
अगदी माझ्या आजोळी जे सर्व
राहू द्यायचं असतं की, असो.
पार्टनरमधे तर एनर्जी येते गोविंदामुळे तो आला की कटरिना सलमान यांच्याकडे दुर्लक्ष होते.
त्याच्या अफाट टायमिंगला तोड नाही..>>>सहमत.
गाणी मस्तच, आभार.
सीमंतिनी, सामो, वावे, वंदना,
सीमंतिनी, सामो, वावे, वंदना, मोद, अनु,म्हाळसा,हरचंद पालव, मृणाली,हीरा, रानभुली, अतुल, रूपाली, मामी, श्रवु,अथेना, ए_श्रद्धा, जिज्ञासा, पारंबीचा आत्मा, रमड, जाई, धनुडी, सियोना, ऋन्मेष....
सर्वांचे आभार.
गोविंदा सारखा डान्सर नाही..
गोविंदा सारखा डान्सर नाही.. एकही बिट सोडत नाही... स्ट्रीट डान्सर गाणे बघा...
बाकी गोविंदा ओव्हररेटेड ऍक्टर आहे याबद्धल दुमत नसावे.. अजूनही तो स्वतःला सुपरस्टार समजतो.. तो कधीही नव्हता.. गोविंदाचे कॉमेडी चित्रपट हे खरे तर डेव्हिड धवन चे चित्रपट...
डेव्हिड धवन नाही तर गोविंदा काहीच नाही..
शाहरुख सलमान आमिर अक्षय अजय प्रमाणे गोविंदा वेळेप्रमाणे स्वतःला बदलू शकला नाही... तेच घिसेपिटेट पांचट विनोद... आता नाही चालू शकत...
धन्यवाद च्रप्स
धन्यवाद च्रप्स
गोविंदा सारखा डान्सर नाही.. एकही बिट सोडत नाही.>>>सहमत.
गोविंदा आणि सनी देवल यांनी एक
गोविंदा आणि सनी देवल यांनी एक काळ गाजवला होता व दोघेही खूप लोकप्रिय होते पण काळा नुसार ते बदल करू शकले नाहीत आणि आज फारसे relevant नाही राहिले
ते त्या ठराविक जॉनरचे लिजंड
ते त्या ठराविक जॉनरचे लिजंड होते. टिकून राहण्यासाठी बदल नाही जमला तर ईटस ओके. जर अश्यांनी निवृत्ती वेळेवर घेतली तर हे लक्षातही येत नाही. पण अर्थात ती न घेण्यामागे प्रत्येकाची वैयक्तिक कारणे असतात.
ही मला आवडणारी काही गाणी व
ही मला आवडणारी काही गाणी व आगाऊ टिप्पण्या म्हणजे जास्तीच्या !!!
https://youtu.be/GFljvZMZI0U
सोनी दे नखरे /कैंदी पों पों पों
एवढ्या सुरेख Cyan dress कडे पण दुर्लक्ष झालं माझं !!
https://youtu.be/mqXZXExI9UI
, कॉलेजच्या(?) समोर नंदी आहे !!
पक चिक पक राजाबाबु , हे लिहिताना हसतेयं..
https://youtu.be/4mGzU0VbdSU
सोना कितना सोना है सोने जैसे , यलो ब्लेझर अँड ए लिटल ब्लॅक ड्रेस !!
https://youtu.be/YfQ-3d5cFeo
मेरे प्यार का रस जरा चखणा , ओये मखणा.. यात नेहमी लेहेंगे घालणारी माधुरीने ब्लु अँड ब्लॅक स्कर्ट्स घातलेत, मस्त. काय मस्त केमिस्ट्री.
धमाल, धमाल, धमाल, काय जबर बेस आहे !!
https://youtu.be/OlW5gAKmOOU
याद सताये मेरी नींद चुराये... रंगपंचमी आणि बुशी आयब्रोजची जुनी करिष्मा , उच्चशिक्षित गोविंदा
https://youtu.be/jE1CavSI5TQ
हुस्न है सुहाना, काय झटके दिलेत गोविंदाने !!
https://youtu.be/fdE3R8ojF5w
आल टाईम चीप फेवरेट, अ आ ई उ ऊ ओ !
https://youtu.be/T6iE8pJOg44
कुठे गेले ते थ्री फोर्थ ब्लाऊज आणि तुरे लावलेले पोनी .. टिप्पर पाणी खेळल्यासारख्या उड्या आणि साधंसरळ व्याकरण व सोपे प्रश्न असलेले गद्यातले पद्य
तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूं. ???
https://youtu.be/h8MZTYLOjvo
शोला और शबनम मधले गोरी गोरी ओ बाकी छोरी, हे गोविंदाने गायलयं.
https://youtu.be/w-fmYo7NU9Q
बोले बोले दिल मेरा बोले , सुरवातीची मोहनिश बहलची कवायत सहन करा!
https://youtu.be/J7xP4m5mpN4
किसी डिस्को में जायें जायें , आणि ऊंह !! आपला Oomph factor, ऊंह factor .
लेदर पँट्स ऑन बीच, ट्रेंडसेटर पीप्स मस्तच.
https://youtu.be/zNDIZ7ujgFE
अंखियों से गोली मारे , ढिशक्यांव !!
https://youtu.be/V7e2JPieHy8
कहोतो जरा झूमलुँ
हे मला खूप आवडतं , जरी डान्स विशेष नाही, आणि वेगळी जोडी आहे. Chichi treats his gal so well!!
https://youtu.be/MqnDcHkpUOo
इक नयाँ आसमां ,शिल्पा शेट्टी सोबत !!
https://youtu.be/pXAxMkwMlmM
)
चाँदी की सायकल सोने की सीट (कारच का नाही घेतली मगं ?
https://youtu.be/3NWMK2MRqIk
तुमसा कोई प्यारा कोई मासूम नही है!
माझं ॲाल टाईम फेवरेट.. शाळेत
माझं ॲाल टाईम फेवरेट.. शाळेत असताना ह्या गाण्यावर नाचही केला होता
https://youtu.be/QB0Oc0GxB2E
माधुरी दिक्षित मिली रस्ते मे, खाए चने हमने सस्ते मे
सी ने टाकलेली सिमी गरेवालच्या शो ची लिंक बघितली.. जे काय गोविंदा बोललाय ते अगदी मनापासून बोललाय
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=VXzBcOALekA हा माझा ऑल टाईम फेवरेट गोविंदा. हेलेनच्या गाण्यावर नाचणे सोपे नाही. त्यावर 'व्हॉट इज मोबाईल नंबर' करणे तर अजिबातच सोपे नाही..... (त्या २ मिलियन हिट्स मध्ये माझ्याच १०-२० हजार हिटस असतील.)
https://youtu.be/OlW5gAKmOOU
https://youtu.be/OlW5gAKmOOU
याद सताये मेरी नींद चुराये... रंगपंचमी आणि बुशी आयब्रोजची जुनी करिष्मा , उच्चशिक्षित गोविंदा
>>>>
मला पण आवडते हे गाणे. गोविंदाचे वेगवेगळे ड्रेस आणि करिष्मा.
साजन चाले ससुराल मधिल 'दिल जाने जिगर तुझ पे'
त्यांचा डान्स पण एकदम ठेका.
गोविंदाचा नुसता डान्स नाही तर त्याचे चेहर्यावरिल हावभाव पण भारी असतात. त्यामूळे गाणे बघायला जास्त मजा येते.
नाहितर मक्ख चेहर्याने नाचणारे किती तरी जण आहेत.
आँखे चे 'अंगना में बाबा 'च्या स्टेप पण मस्त आहेत.
सॉलिड आहेत एकेक लिंका.
सॉलिड आहेत एकेक लिंका.
आशा भोसलेचा लाईव्ह प्रोग्रॅम काय मस्त आहे सी, मला आधी वाटलं कि गोविंदा फक्त लिप्सींग करतोय पण गायलाय खराच.आणि आशा भोसले कमालच आहे.
साजन चाले ससुराल मधिल 'दिल जाने जिगर तुझ पे'
त्यांचा डान्स पण एकदम ठेका.>>>>>>>> हो , ह्या गाण्याची सिग्नेचर स्टेप मस्त आहे.
अजून एक गाणं मला आवडतं "सोनेकी तगडी ". किमी काटकर गोविंदा
साजन चाले ससुराल मधिल 'दिल
साजन चाले ससुराल मधिल 'दिल जाने जिगर तुझ पे'
त्यांचा डान्स पण एकदम ठेका.>>>>>>>> हो , ह्या गाण्याची सिग्नेचर स्टेप मस्त आहे.>>>>> अर्र्ररररर काहितरी गडबड झाली , मी अत्ता हे गाणं बघितलं, हे नाही ते गाणं ज्याची सिग्नेचर स्टेप मी म्हणतेय.
मला दुसराच गाणं ,डान्स डोळ्यासमोर आला. दांडिया घेऊन डान्स आहे गोविंदाच आहे पण गाणं आठवतं नाही.आता शोधणं आलं
हेलेनच्या गाण्यावर नाचणे सोपे
हेलेनच्या गाण्यावर नाचणे सोपे नाही.
>>>
वाह सीमंतिनी, छान लिंक शेअर केलीत. दिल खुश हो गया गोविंदाचा डान्स बघून.. काय ते एक्स्प्रेशन्स.. आहाहा.. काय ती एंजॉयमेंट.. रोज रात्री माझ्या मुलीला मी हेच सांगत असतो गधडीला, पण तिचे ते आतून येतच नाहीत. नुसते समोरच्याला इम्प्रेस करायला डान्स चालू असतो. तिला आता दणादण गोविंदाचे डान्स दाखवायला सुरुवात करतो.
वरच्या यादीत केंदी प्पॉ हे
वरच्या यादीत केंदी प्पॉ हे पहिलं गाणं आल्यामुळे मी निखळ आनंद प्राप्नुवंत झालो
गोविंदा जबरी टॅलेंटेड होता पण
गोविंदा जबरी टॅलेंटेड होता पण आधी डेव्हिड धवन नी त्याला एकाच प्रकारे वापरून टाईपकास्ट केला आणि नंतर त्याच्या भोवतालच्या जीहुजूर्यांनी त्याच्या डोक्यात भ्रामक कल्पना भरवून त्याला पुरता संपवला.
२००७ च्या कमबॅक नंतर त्यानी निवडलेले वेगळ्या धटणीचे सिनेमे (तिग्मांशू धुलियाचे दोन, मीरा नायरचा एक, माय कजिन विन्नी चा रीमेक वगैरे) एकतर बंद तरी पडले किंवा डब्यात गेले.
आजही कुठेतरी वाटतं की त्यानी जरा वास्तवात यावं आणि एखादी तगडी वेब सिरीज करावी, एखादं असं कॅरेक्टर जे लोकांना गोविंदाकडून बिल्कुल अपेक्षित नसेल.
किमान क्रेडची जाहिरात हे त्याचं शेवटचं काम ठरू नये...
सगळी गाणी मस्त होती.
सगळी गाणी मस्त होती.
मला केंदी पॉ पॉ आणि किसी डिस्को मे जाये आवडतं खूप.
नवीन प्रतिसादांबद्दल आभार.
नवीन प्रतिसादांबद्दल आभार.
)
हीरा , तुमची निर्भेळ भेळ गोष्ट खूप गोड !!
हर्पा, निर्मळ आनंद /खुबसुरत मधली मंजू खूपच आवडती व्यक्तीरेखा .. धन्यवाद
अतुल, दीर्घ प्रतिसादासाठी आभार , आम्हीही ते फिल्म प्रोजेक्टर करून पाहिले होते , मजाच होती. खरंतर उन्हाळ्याच्या सुटीवर स्वतंत्र लेख हवा.
आज हे सगळे आठवले कि खूप हसायला येते. पण त्यावेळची मानसिकताच तशी होती.>>> होतं असं कधीतरी.
सी, मी सिमी गरेवालची लिंक पाहिली , शेवटी गोविंदा व त्याच्या बायकोने धमाल आणली आहे. दोघे दिसतातही मोकळे आणि प्रसन्न, सिमीच्या डोळ्यात हसून हसून पाणी आले. (ते तिने महागड्या अत्तरासारखे हलकेच टिपल्याने सरळ केलेले केस चक्क हलले.
साजन चाले ससुराल मधिल 'दिल
साजन चाले ससुराल मधिल 'दिल जाने जिगर तुझ पे'
त्यांचा डान्स पण एकदम ठेका +1 सियोना,
हे मी पाहिलं पण यादीत टाकायला विसरले.
वाह सीमंतिनी, छान लिंक शेअर केलीत. दिल खुश हो गया गोविंदाचा डान्स बघून.. काय ते एक्स्प्रेशन्स >>> +1
तो स्वतः इतके एन्जॉय करतो की आपल्यालाही धमाल येते.
मोनिकाSSSS
धनुडी सोनेकी तगडी बघते , म्हाळसा आठवलं ते गाणं.
अँकी नं वन आणि साधा माणूस आभार.
साजन चाले ससुराल मधिल 'दिल
लेखिकेचा मी ड्युआय नसूनही माझ्या जिवंतपणीच्या भावना जशाच्या तशा मांडल्या आहेत. >>>> पा.आ. खरं की काय. थँक्यू

प्रतिसाद आवडला, धमाल आहे.
भाकरी, जहर, संमिश्र भावना, मिठाईचा दुकानदार >>>
घरातच गोळीबार झाला, बंदुकीची
घरातच गोळीबार झाला, बंदुकीची गोळी लागली पण वाचला अशा बातम्या आहेत.
गोळी "चुकून" पायाला लागली अशी अधिकृत बातमी आहे.
बापरे, मला काहीही कल्पना
बापरे, मला काहीही कल्पना नव्हती.
थोडक्यावर निभावले हे चांगले
थोडक्यावर निभावले हे चांगले झाले. लोडेड असलेली बंदूक साफ करत होता. अपघाताने हत्यार जमीनीवर पडले आणि ट्रिगर दाबले गेले. तपास अधिकारी या उत्तरावर समाधानी नाही आहेत.
हा लेख वाचलेला का? आठवत नाही.
हा लेख वाचलेला का? आठवत नाही. मस्त आहे. एकेक पंचेसही फार आवडले.
Pages