Submitted by आरती शिवकुमार on 26 May, 2021 - 15:21
एक आला झोका ,
सगळ्यांच्या हृदयाचा वाजला ठोका .
पाखराने केली किलबिल,
त्यांच्या जीवाची झाली चिलबिल .
झाडांना राहिले नाही भान ,
त्यांच्या वर टिकले नाही पान .
वाऱ्याची वाढली गती ,
फुल फळांची झाली वाईट स्थिती .
मच्छी मरानी केली लगबग ,
त्यांच्या नौकाची झाली डगमग .
नदीने पकडला सूर,
माशांना लागली हुर हुर.
शेतकऱ्यांची वाढली चिंता ,
पिकांची वाटू लागली त्यांना खंता .
नदीला आला पूर ,
पाखरे उडाली भूर भूर .
जोरात वारा देखील सुटला ,
आमचा दरवाजा पण तुटला.
बाळाला लागली होती तहान ,
घरात शिल्लक नव्हते धान.
नदीचा आला जोर,
कुठे घेऊन जाऊ मी माझे पोर.
घराची झाली माती ,
शिल्लक राहिली नाही एकही वाटी .
हातात घेतली मी लाठी आणि
उठली माझ्या मुलासाठी.
--आरती शिवकुमार
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
खूप छान कविता
खूप छान कविता