Submitted by omkar_keskar on 2 May, 2021 - 06:44
सध्या मी whatsapp चे स्टेटस बघणं टाळलंय.
परंतु आल्या मेसेजला उत्तर देण्याचं पथ्य मात्र पाळलंय.
अवघड झालंय जगणं अन खडतर झालाय प्रवास.
प्रत्येक रात्रीवर उधार पडलाय उद्याचाच श्वास.
फोटो कुणाचा हे बघण्याआधी, आधी खाली पहावं लागतं
फुलं असतात दोन्हीकडे, तिथलं म्हणणं मात्र समजून घ्यावं लागतं.
पहिली जरा थंडावताच दुसरी लाट आली.
उमलत्या सुखाच्या प्रवासात काटेरी वाट आली.
झाला कुणाचा जन्म अन ओढवलं कुणाचं मरण
शेवटी नशिबाच्या सोंगटीवर एकजात सारे शरण.
कुठला वर्ण कुठला देश कुठला जात अन धर्म
माणसाशी माणूस म्हणून वागण्यातच माणुसकीचे मर्म.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा