
(अमितव यांच्या सल्ल्याचा विचार करून काही बदल करतेय. त्यांचे म्हणणे पटले. डिफेन्सिव्ह स्टान्स वर जाऊन लिहीले होते).
मागच्या पिढीसाठी दिलीपकुमार किंवा अमिताभ बच्चन कसे होते ?
किंवा दक्षिणेकडचे रजनीकांत , चिरंजीवी यांचे वलय कसे जाणवते. त्याच कॅटेगरीतले नाव म्हणजे मल्याळी सिनेमाचा मेगास्टार मामुट्टी. फारसे सिनेमे पाहीलेले नाहीत. पण एकंदरीतच त्याचा पडद्यावरचा वावर हा सुपरस्टारला साजेसा असतो.
एका बाबतीत तो सर्वांपेक्षा सरस ठरतो. ते म्हणजे विलक्षण संयत अभिनय.
मामुट्टीच्या या वलयाखालीच द प्रीस्ट पाहिला. हा सिनेमा कुणी कुणी पाहू नये याचीच यादी द्यावी लागेल ( शब्दशः घेऊ नये).
जर तुम्हाला टिपीकल हॉरर मुव्हीज आवडत असतील तर हा चित्रपट बघू नका. टिपीकल मधे भट कंपनी, रामसे ब्रदर्स आणि रामूची फॅक्टरी असे सगळेच आले.
तुम्हाला नन , ओमेन सारखे चित्रपट आवडत असतील तरीही हा सिनेमा पाहू नका.
या जॉनर मधे वेगळं काही करता येऊ शकतं का ?
कदाचित भय, भीती याच्याशी तडजोड केलेले पहायला आवडत असेल, गूढ आवडत असेल तर असे प्रयोग एकदा पहायला हरकत नाही. हाताळणी संथ आहे. तरीही उत्कंठा ताणणारी आहे. अशा चित्रपटांची ती गरज असावी कदाचित. ओमेन सुद्धा संथ वाटला होता. अशा सिनेमात येणारे ते प्रसंग मग हायलाईट होत जातात.
काही काही प्रसंग क्लिशे वाटणारे. पण ती सिनेमाची गरज नाही. ते प्रसंग केवळ कथेची गरज म्हणून येतात. दिग्दर्शकाने भय वाटावे म्हणून नक्कीच सिनेमा बनवलेला नाही हे लक्षात येते.
कुठेही स्पॉयलर न देता इतकीच कथा सांगेन...
फादर बेनडीक्ट हे पॅरासायकॉलॉजिस्ट पण आहेत. त्यांच्याकडे "केसेस" येत असतात. केरळात ख्रिस्ती धर्माचे बरेच अनुयायी आहेत हे चित्रपटात दिसते. त्यामुळे त्यांचे चर्चेस, कॉन्व्हेन्ट स्कूल्स आणि त्याला जोडून असणारे अनाथआश्रम. अशा अनाथालयात अमेया नामक एक लहान मुलगी आहे. जिच्याबद्दल शाळेत सर्वच शिक्षकांच्या तक्रारी आहेत. अनाथालयाची प्रमुख सिस्टर आहे. शाळेचे प्रमुख फादर हेच चर्चचेही फादर आहेत. हे वेगळे आहेत. बेनडीक्ट नव्हेत. दर वेळी सिस्टर मुळे फादर कारवाई मागे घेतात. दर वेळी ते सिस्टरला तसे सुनावतात सुद्धा.
याच्या आधीच फादर बेनडीक्ट कडे एक तरूण मुलगी आली आहे. ती जिथे कामाला आहे तिथल्या मालकांच्या काहीच महीन्यात आत्महत्या झालेल्या आहेत. त्या ही एकामागोमाग एक. एक मुलगी अपघातात गेली आहे. हे कुटुंब अतीश्रीमंत आहे. त्यांचा बिझिनेस आहे. जो कुणी या उद्योगाचा प्रमुख बनतो तो काहीच दिवसात आत्महत्या करतो.
पोलिसांनी या सर्व मृत्यूंची नोंद आत्महत्या म्हणून केली आहे. कारण त्यांना संशायस्पद असे काही दिसलेले नाही. प्रत्येक आत्महत्या अगदी साफ साफ दिसतेय.
आता एकच एलिझाबेथ शिल्लक आहे.
फादर बेनेडिक्टना ही कहाणी ऐकताना तिचा संशय आलेला आहे.
दुसरीकडे त्या कॉन्व्हेन्ट स्कूल मधली ती मुलगी "अमेया" शाळा सोडून पळाली आहे. अनाथाश्रमातही गेलेली नाही. स्कूल बॅग आणि आयकार्ड फेकून ती रेल्वे लाईनकडे गेली आहे.
फादर बेनेडीक्ट त्या तरूण मुलीला समजावून सांगताहेत की ही पोलिसांची "केस" आहे. ते डीएसपींना फोन करतात. फारदना बराच मान दिसतोय. डीएसपी त्यांच्या शब्दाखातर ऐकायला तयार होतात. एलिझाबेथवर संशय हा अँगल पोलिसांच्या तपासात आतापर्यंत आलेला नसतो. आता सगळ्याच आत्महत्यांकडे एकत्रित पाहताना डीएसपींना त्यांचे म्हणणे पटते. म्हणून ते एलिझाबेथला फोन करतात. ती तेव्हां कारमधे असते.
ती सांगते की मी कोचीला आहे. रात्री परतेन. उद्या सकाळी बोलूयात.
सकाळी सकाळी पोलिसांना खबर मिळते की एलिझाबेथ ने आत्महत्या केली.
जिच्यावर संशय तीच मृत्यू पावल्याने आता पोलिसांचे काम अवघड होते. तिच्या मृतदेहाशेजारी अमेया रात्रभर बसून असते.
फादर पाहून ती किंचित अस्वस्थ झालेली आहे. जाताना ती फादर कडे खुन्नस ने पाहते. ( यामुलीने जबरदस्त अभिनय केला आहे)
ही केस पोलीस फादर बेनेडीक्टच्या मदतीने कशी सोडवतात आणि त्या केसमधून दुस-या केसची कशी सुरूवात होते हा पाहण्यासारखा भाग आहे. दुसरी केस ही अमेयाशी संबंधित आहे. अमेया एलिजाबेथच्या मृतदेहापाशी रात्रभर होती. ती तिच्याकडे कशी आली ? तर एलिझाबेथला ती रस्त्यावर फिरताना दिसली. तिने घरी आणलं आणि तिच्याकडून माहिती घेऊन तिच्या अनाथालयाच्या प्रमुखांना (सिस्टरला) फोन केला. पोलिसांनी विचारल्यावर सिस्टरने सांगितलं की या आधीही ती तीन वेळा पळून गेली. तेव्हां पोलीस विचारतात की ही बेफिकीरी नाही का ? त्या वेळी सिस्टर सांगतात की अमेया ही इतर मुलांसारखी नाही. ते विचित्र आणि विशेष आहे. शिक्षक म्हणतात ती भयंकर उर्मट आहे. ती हिंसक पण आहे.
अमेया फादर बेनेडी़क्टना पाहताच असहकाराची भूमिका सातत्याने घेते. त्यांच्यापासून आपला बचाव करते. फादर बेनेडीक्ट हे तिच्या शाळेच्या फादर कडे येऊन तिच्याशी बोलण्याची परवानगीही घेतात. पण अमेया त्यांचा डाव हाणून पाडते. तिची नवीन शिक्षिका जेस्सी फादर बेनेडीक्टना टाकून बोलते. अमेया या नवीन टीचर वर खूष आहे. ती आल्यापासून तिच्यात बदल झालेत. ती सर्वांशी प्रेमाने वागते. तिच्यातला राग कमी झाला आहे.
फादर मात्र या नवीन शिक्षिकेला अमेयापासून वाचण्यासाठी तुला माझी गरज लागणार आहे असा इशारा देतात. जेस्सी त्या वेळी रागात असल्याने ती फादरचे व्हिजिटींग कार्ड त्यांना परत करते. मात्र तिच्यावर तशी वेळ येते का ?
सुट्टीत अमेया टीचर ला तिच्या घरी येण्यासाठी मागे लागते. तिला कुणीच नसल्याने अनाथालयात सुट्टीत तिला रहायचे नसते. या सुट्टीत अनेक घडामोडी घडतात.
त्यांची उकल फादर कसे करतात हे पाहणे रोचक आहे. सिनेमातली दृश्ये बघताना युरोपातल्या एखाद्या खेड्यात शूटींग झाले असावे असे वाटते. जुन्या पद्धतीची लाकडी आणि काचेची भली मोठी घरं , विशाल चर्चेस हे सर्व देखणं आहेच. पण केरळची निसर्ग संपदाही डोळ्याला सुखावते. चित्रपटाच्या कथेला साजेसे पार्श्वसंगीत प्रभावी आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचे संगीत ऐकण्यात आले. दक्षिणेच्या चित्रपटाचे छायाचित्रण हॉलीवूडपटांच्या तोडीचे असते. हा सिनेमाही अपवाद नाही. स्पेशल इफेक्ट्स विशेषतः एक्जॉर्सिजमचे , यात मेहनत घेतलेली नाही. त्यांचा चक्क कंटाळा येतो. ते लांबवले नसते तरी चालले असते. अगदी नसतेच दाखवले तरीही चालले असते. रहस्याची उकल यावरच फोकस असायला हवा होता.
फादरसाठी या केसची उकल महत्वाची आहे. प्रेक्षकालाही नंतर हे रहस्य काय आहे यात रस निर्माण होतो. ते रहस्यच आहे. त्याची उकल शेवटी शेवटी धक्कादायक वाटत नाही. पण तोपर्यंत चित्रपटाने पकड घेतलेली असते.
मंजू वॉरीयर या अभिनेत्रीने असुरन नंतर या सिनेमातही खूप प्रभावित केले. असुरन सुद्धा प्राईमवर हिंदीत आलेला आहे. ही गुणी अभिनेत्री आहे. अनेक अभिनेते सहजसुंदर आहेत. रंग रूप वगैरे टॅबू फारसे इकडे दिसत नाहीत. हा माझ्या मते प्लस पॉईण्ट आहे.
किती फास्ट मुलगी आहेस तू.
किती फास्ट मुलगी आहेस तू. वाचणारे.
छान लिहिलंस राभु..या विकेंडला
छान लिहिलंस राभु..या विकेंडला बघणार नक्की.
जगभरातल्या शिणुमामांनी
जगभरातल्या शिणुमामांनी प्रीस्ट, फादर, पुजारी, सायकॉलॉजीचे प्रोफेसर्स यांचे काम भूत पळवणे इतकेच असल्याचा समज करून घेतला आहे. मी दीवारचा अमिताभ बच्चन असल्याने शशी कपूर देवळात गेला तरी मी बाहेर पाय-यांवर बसतो. त्याला पुजारी भेटतो, मला देव. त्यामुळे पुजा-याला भूत पळव असं काम सांगायची वेळच आलेली नाही.
बघेन कधीतरी आणि आयडी राहिला तर कळवेन.
कोणी बघावा हे तुमच्या नजरेतुन
कोणी बघावा हे तुमच्या नजरेतुन देत बसण्यापेक्षा काय आहे ते लिहावे, बघायचा का नाही हे प्रत्येक जण ठरवेल.
बाकी लिखाण हे अत्यंत गोंधळात टाकणारे वाटले. मला काही अर्थबोध झाला नाही. (हे मुद्दाम केलेले असेल असा विचार केला तरी तसं काही वाटलं नाही)
लेख आवडला नाही. भुतांवर शून्य विश्वास आहे पण हॉरर मूव्ही बघायला प्रचंड आवडतात. सो चित्रपट बघेन. कुठे आहे?
अस्मिता, नामा, मृणाक्का
अस्मिता, नामा, मृणाक्का धन्यवाद
अमितव - लेख आवडला नाही यापेक्षा चांगली प्रतिक्रिया नाही.
कुणी पाहू नये हे सांगणे हे सुचवणे नसून हा सिनेमा हॉरर नसून त्यातल्याच वेगळ्या पद्धतीचा आहे हे सांगणे आहे. सर्वांना त्या अभिरूचीला नेऊन ठेवण्याचा प्रयत्न नाही तो. हॉरर म्हणून बघणा-यांचा अपेक्षाभंग होईल असे सांगण्याचा प्रयत्न आहे. थोडक्यात वेगळा आहे.
कुठेही स्पॉयलर देऊ नये यामुळे इतकेच सांगितले आहे. यात एक शब्द जरी जास्तीचा सांगितला तरी चाणाक्ष वाचक संपूर्ण कथानक आधीच ओलखू शकतो. मग बघणार काय ?
छान लिहिलं आहेस..!
छान लिहिलं आहेस..!
मामुती कधीच आवडला नाही..
मामुती कधीच आवडला नाही.. मोहनलाल मात्र फार आवडतो...
बादवे..या चित्रपटाला खराब रिव्यु आहेत वेब वर...
हिंदी डब झाला की नक्की बघेन...
छान लिहले आहेस रानभुली.
छान लिहले आहेस रानभुली.
@ अमितव, नंतर पटल्याने बदल
@ अमितव, नंतर पटल्याने बदल केले आहेत. धन्यवाद.
Feels like an English movie i
Feels like an English movie i had watched in 2012 or 2013..
Cant remember d name..
A small girl calls 911 saying her parents are going to put her in oven that night. She is rescued and social worker takes her in..
But is d girl really innocent as she seems?
इंटरेस्टिंग वाटतोय. स्टोरी
इंटरेस्टिंग वाटतोय. स्टोरी वाचताना थोडीशी 'Case 39' पिक्चर सारखी वाटली.
@नानबा - येस! तोच Case 39
@नानबा - येस! तोच Case 39

ग्रेट माइंडस!
छान लिहिले आहे, आवडेल असे
छान लिहिले आहे, सिनेमा आवडेल असे वाटतेयं.
चांगले लिहीलेय. बघावासा
चांगले लिहीलेय. बघावासा वाटतोय. पण तब्बल अडीच तास सबटायटल्स सकट बघण्याचा पेशन्स नाहीये. डोकेदुखी होते. डब झाला की बघेन.
तीन दिवसांत नेटाने पाहिला,
तीन दिवसांत नेटाने पाहिला, आणि उगाच वेळ घालवल्यांचं फीलिंग आलं.
एक तर प्र-चं-ड मोठा आहे. निम्मा एडिट करुन टाकला असता तर जरा गोळीबंद झाला असता. बघणार्याला डोकं कमी दिलंय याची खात्री बाळगून सगळं डी-टे-ल मध्ये समजावुन नाही सांगितलं तर चालतं. आणि इतकं करुन क्लायमॅक्स अगदी टोटल बॉलिवुडी सर्वमान्य सरळ सुटसुटीत! पटकथा फारच कमकुवत वाटली. अनेकोनेक गोष्टी कन्विनियंटली घडतात, स्पॉयलरच्या भयाने काय ते सध्या लिहित नाही.
पहिल्या केस मधुन त्या मुलीविषयी समजते आणि दुसरी केस निघते, आणि मग फक्त आणि फक्त दुसरी केस. त्याचा पहिलीशी काही संबंध नाही, की त्यातील न सुटलेल्या दुव्यांचा काही मागोवा नाही. थोडक्यात पहिल्या केसचा वापर फक्त पात्रपरिचय म्हणून. आणि त्या पात्रपरिचयात तब्बल तास भर दवडला!
कॉलेजात ख्रिश्चन -केर्लाईट शिक्षक खूप होते, ते आठवले एकदम. 
पार्श्वसंगीत भडक आणि टिपीकल. मामुट्टी ही ठीकच. लक्षात राहिल असं काही त्याने केलं नाही. ती मुलगी आणि 'जेस्सी टीच्चरं' याच लक्षात राहिल्या. मला सगळ्यात काय आवडलं आणि लक्षात राहिलं असेल तर मल्याळी हेलात केलेले इंग्रजी उच्चार. ते मात्र फारफार आवडले. टीच्चरं.