Submitted by नारी मारीतो on 15 April, 2021 - 15:01

अलिकडे ब-याच जणींच्या नव-यांना टक्कल असते. अशा बायकांना नव-याला टक्कल असल्याचे दु:ख असते का ?
टकलाकडे तुम्ही कसे बघता ?
- तुम्ही स्त्री असाल तर
- तुम्ही स्वतःच टक्कलवंत असाल तर
- तुम्ही केसाळ असाल तर
( काही स्त्रियांना पण टक्कल असते. पण खूपच कमी स्त्रियांत असते. मुद्दामून टक्कल केलेल्या स्त्रिया आकर्षक दिसतात. स्त्रियांमधल्या टकलाबद्दल या धाग्यावर नको).
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१) हा माझा आयडी नाहीये
१) हा माझा आयडी नाहीये
२) मध्यंतरी लॉकडाऊनमध्ये मी तुडुंब केस वाढवलेले. ते केस झुंजूमुंजू हलवताना छान विडिओही काढलेला पोरासोबत.
ईथे टाकला असता. पण हा धागा टकलाचा आहे, ईथे तो अवांतर होईल. म्हणून लांब केसांचा नंतर वेगळा धागा काढतो
३) डोके मोठे गोल गरगरीत असेल आणि शरीरयष्टी दांडगट, तर टक्कल असलेले पुरुष फार रुबाबदार दिसतात. मला ते शोभणार नाही म्हणून जितके उशीरा होईल ते चांगले. वडीलांना अजून आले नाही या वयात ते पाहता आशा करतो की थोडा वारसा मलाही मिळाला असेल.
४) टक्कल पुरुषांचे व्यक्तीमत्व लक्षवेधक असते. त्यामुळे क्रिकेटमध्ये जसे डावखुरे उठून दिसतत तसे चित्रपटांमध्येही भले होरो नसेनात पण ईतर भुमिकांत टक्कल असलेल्यांची चलती आहे.
५) डोक्यात ऊलटी चड्डी घालून टकलू हैवाण गँग आणि लक्ष्या लक्ष्या महेश डॅम ईट खेळणे हा आमच्या लहानपणीचा आवडीचा खेळ होता.
असो,
या धाग्यावर माझा रुमाल
उद्या सविस्तर लिहितो आणखी...
एकंदर व्यक्तिमत्व कसे आहे ते
एकंदर व्यक्तिमत्व कसे आहे ते पहातो त्यामुळे याचे तर टक्कल आहे वगैरे लक्षात रहात नाही. पण काही लोक टक्कल लपवण्याचा असा काही प्रयत्न करतात की कधी हसू येते, पण आवरतो. एकाला मध्यभागी टक्कल आणि मागे पुढे, आणि साईडला थोडे केस आहेत. तो मधल्या भागावर चार बटा एक दीड इंचाच्या अंतराने विभागून ठेवतो मधल्या भागाला सलग टक्कल दिसू नये म्हणुन.
पण तरी सलग टक्कल असल्याचे समोरच्याच्या लक्षात येते.
मग त्याने अशा लावलेल्या बटा वाऱ्याने हलतील म्हणुन तो त्यांना तेल लावतो ते टक्कल भागाला लागते आणि तो भाग चमकतो आणि अजून उठून दिसतो. तरीही वारंवार त्याला आरशात / सेल्फी कॅमेरात आपल्या बटा ठीक कराव्य लागतात.
मला वाटते एवढे सेल्फ कॉन्शस असू नये.
आहे टक्कल तर आहे.
टक्कल असलेल्याना न्यूनगंड येईल अशा कॉमेंट्स करणे सर्वांनी टाळावे असे मला वाटते.
अनुपम खेरचा काय कॉन्फिडंट
अनुपम खेरचा काय कॉन्फिडंट वावर असतो. शाळेत असताना कुठेतरी छापून आलेलं वाचलं कि टीव्हीवर बोललेलं वाचलं / ऐकलं होतं अनुपम खेर बद्दल. टक्कल पडण्याची प्रोसेस वर त्यांनी पीएचडी केली आहे. स्वतःवर विनोद करताना त्यांनी कसलं जबरदस्त निरीक्षण नोंदवत हसवलंय. अमरीश पुरी यांनाही टक्कल होतं.
हाईट म्हणजे रजनीकांत
एव्हढा मोठा सुपरस्टार असून कुठल्याही मोठ्या समारंभात विग न लावता जातात ते. त्यांना टक्कल आहे हे कधीच लपवले नाही. पडद्यावर मात्र केस असतात आणि लोक त्यांना स्विकारतात.
काही लोकांना टक्कल आहे हे मुद्दामून पाहिल्याशिवाय जाणवत नाही. मोहम्मद रफी यांचे टक्कल कधी नजरेत भरत नाही. त्यांचा आवाजच.
<<< म्हणुन तो त्यांना तेल
<<< म्हणुन तो त्यांना तेल लावतो ते टक्कल भागाला लागते आणि तो भाग चमकतो आणि अजून उठून दिसतो>>> <मानवकाका, प्रचंड हसले सकाळी सकाळी
काही लोक स्वतःच्या
काही लोक स्वतःच्या दिसण्याबद्दल कमालीचे जागरूक असतात. कल्ला कसा ठेवायचा, दाढी कशी कोरायची ह्या गोष्टींसाठी ते तासंतास घालवू शकतात. अशा लोकांमध्ये टक्कल पडायला लागणे हे एका खूप वाईट स्वप्नासारखे असू शकते. खास करून जे लोक अशा क्षेत्रांमध्ये काम करतात जिथे माणसाच्या दिसण्याला फार महत्व दिले जाते.
म्हाग्रू सचिन पिळगावकरांना फार तरुणपणीच टक्कल पडले होते आणि तेंव्हा पासून ते विग लावतात म्हणे. त्यांचा बिना विगचा एकही फोटो आंतरजालावर कुठेच नाही.
कॉलेज मध्ये ऐकलेला एक फिश
कॉलेज मध्ये ऐकलेला एक फिश पाँड.
दूर से देखा तो चाँद चमक रहा था
पास जाके देखा तो टकला नहा रहा था !
काही वेळेस अनुवंशिक तर काही वेळेस टेंशन ने केस गळतात. पण आजकाल थॉयरॉईड, जंक फुड, पोषक आहाराची कमतरता ( फळे, सॅलेड न खाता , चिप्स वगैरेवर भर ) याने केस लहान वयातच साथ सोडतात. तेल न लावणे ही फॅशन. माझ्या एका भाच्याला आता ११ वीत असुनही मध्ये टक्कल पडायची वेळ आलीय. पण तो किंवा त्याचे घरचे ( माझी चुलत नणंद ) ऐकत नाहीत.
तेलाचा खरंच फायदा होतो का ?
तेलाचा खरंच फायदा होतो का ?
माझ्या नवऱ्याला टक्कल आहे.
माझ्या नवऱ्याला टक्कल आहे. पडलेलं नाहीये त्याने त्याला आवडतं म्हणून केलंय. मी असाच लुक ठेवणार आहे हे लग्ना आधीच सांगितलं होतं. चालणार असेल तर पुढे बोलू हे ही म्हणाला होता.
मला एकंदर दिसण्यापेक्षा स्वभावाने आणि पर्सनॅलिटी ने माणसं आवडतात त्यामुळे मला काहीही फरक पडला नाही.
त्याची आणि माझी आई बरेचदा माझ्या।मागे लागतात की त्याला।केस वाढवायला सांग. केस वाढलेले असले की handsome दिसतो तो म्हणून पण मी मुळीच असं करायला जात नाही.
मी जाड आणि सावळी आहे तरी त्याला आवडते आणि तो जसा आहे तसा मला आवडतो त्यामुळे टक्कल डझंट मॅटर!
आमचे एक प्रोफेसर थोडे टकले
आमचे एक प्रोफेसर थोडे टकले होते आम्ही त्यांना बीच मे डॉलर बाजूमे झालर बोलायचो ते आठवले
होतो. केसांच्या मुळाशी व वर
तेलाचा खरंच फायदा होतो का ?>>>>>>>
होतो. केसांच्या मुळाशी व वर हलकेच दाब देऊन मालीश करावे. शक्यतो प्युअर खोबरेल तेल ( घाण्याचे चालेल ) मालीशकरता वापरावे. त्यात पाव चमचा एरंडेल तेल+ ५ ते ६ थेंब तीळाचे तेल मिक्स करावे. पाणी उकळुन पसरट भांड्यात ओतावे त्या गरम पाण्यात तेलाची वाटी ठेवावी, म्हणजे ते तेल गरम होते. तेल कधीही डायरे़क्ट गरम करु नये. मात्र दुसर्या दिवशी शिकेकाई+ रीठ्याने नहावे. कारण एरंडेल तेल चिकट असते. तीळ व एरंडेल ने केसांना दाट पणा येतो. मी घरी आवळ्याचे तेल केले होते, केस लांब पण झाले चक्क.
मी इंजिनिअरिंगला असताना टक्कल
मी इंजिनिअरिंगला असताना टक्कल करायचो. मशीनने करायचो त्यामुळे किंचित केस असायचे. माझा फेव्हरिट कट होता तो. नन्तर गझनी पिक्चर आला आणि सगळे मला गझनी कट का विचारायला लागले. एकदा असाच जात होतो तेव्हा बसमधले लहान शाळकरी मुलं मला बघून गझनी गझनी ओरडायला लागले. या सगळ्या प्रकारांना वैतागून मी तो कट बंद केला. आता परत सुरू करायला हवा.
साहेबांच्या जबरदस्त
साहेबांच्या जबरदस्त व्यक्तीमत्वात टकलाचा सिंहाचा वाटा आहे.
अनुपम खेर टक्कलकविता.https:/
अनुपम खेर टक्कलकविता.
https://www.google.com/search?client=ms-android-xiaomi-rev2&tbm=vid&sxsr...
मी दुसराच व्हिडिओ शोधतेय. हे अनपेक्षित पणे हाती लागले.
रीया आणि व्हीबी यांनी लिहीलेय
रीया आणि व्हीबी यांनी लिहीलेय तसं आपण कसं बघतो ते पण लिहा ना.
राभु - ते सगळे बिनधास्त आहेत. पण तुम्ही कसं बघता टकलाकडे ते महत्वाचं आहे.
रेखाने विशालच्या टकलावर तबला वाजवला. ती तबला म्हणून बघते.
मी माणूस म्हणूनच बघते.
मी माणूस म्हणूनच बघते.

माझ्या शाळेतल्या मैत्रिणीचा एक मजेदार किस्सा सांगते.
माझ्या त्या मैत्रिणीचा प्रेम विवाह 10+ वर्षापूर्वी. मागच्या वर्षी तीच्या मुलीच्या शाळेत पालक सभा होती. त्या सभेला हे दोघे आईबाबा गेले होते.तीथे तीला दुसरी एक शाळेतली मैत्रिण खूप वर्षानंतर भेटली. तीची मुलगी ही त्याच शाळेत होती.
त्या भेटलेल्या मैत्रिणीने इतक्या वर्षानंतर तीला काय विचारावे, अगं तु असा कसा टकला नवरा केलास?
अगं तु असा कसा टकला नवरा
अगं तु असा कसा टकला नवरा केलास? >>> अगं तू असा कसा नवरा टकला केलास ?
असं पाहीजे ते..
(No subject)
मस्त धागा आहे
मस्त धागा आहे
टक्कल पडणे अनुवंशिक असू शकते
माणसाचे केस गेले तरी चालतील
माणसाचे केस गेले तरी चालतील माणूस गेलेली केस असू नये, असं मोठी लोक म्हणून गेलीयेत.
रानभूली, अनुपम खेर खरंच cute दिसतोय
बाकी काही पांचट जोक आठवले
थांब टकल्या भांग पाडते, दोन टकले एका कांगव्या साठी भांडत होते
जे लोक टकलाला स्विकारुन
जे लोक टकलाला स्विकारुन आत्मविश्वासाने समाजात वावरतात त्यांचे टक्कल लक्षातपण येत नाही, पण काही टकलेश उरल्यासुरल्या केसांनी टक्कल लपवण्याचा प्रयत्न करतात ते विचित्र वाटते.
१. ए टकल्या!
१. ए टकल्या!
२. हाय टेस्टोस्टेरॉन लेव्हल्स!
३. टक्कल झाकण्यासाठी पैसे पाण्यात/तेलात/कशाकशात फेकणारा वेडा.
***
किस्सा टाईम :
फारा वर्षांपूर्वी आमचे एक सिनियर कलिग (इमॅजिन हा, माझे खूप सिनियर) हाँगकाँगला गेले होते, तिथून हौशीने विग विकत घेऊन आले.
परत आल्यावर विग घालून ऐटीत ओपीडीत बसू लागले.
अचानक पेशंटची संख्या फारच रोडावलेली दिसल्यावर स्टाफला बोलावून झापले, की मी परदेश सहलीवरून परत आलोय हे लोकांना ठाऊक नाहिये का?
नर्स म्हणाली, सर, सकाळी गर्दी जमते, पण पहिले २-४ पेशंट बाहेर आले की इतरांना सांगतात "माय वं, तठे दुसराच कुनीतरी बशेल शे. आपला डाक्टर कोठे गया कोन जानो" (तिथे दुसराच कुणीतरी बसलेला आहे, आपला डॉक्टर कुठे गेला कुणास ठावे.)
सरांनी विग घालणे बंद केले.
आजही तो लै डॉलर खर्चून विकत घेतलेला ह्युमन हेअर विग सरांच्या घरी प्रदर्शनिय ठिकाणी टांगलेला आहे. "मी आहे असा आहे" हे स्वीकारण्याचे रिमाइण्डर म्हणून. ..सर आता ९० टच करताहेत, त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो!
ता. क. : हा किस्सा सरांनी स्वतः सांगितलेला आहे. मायनी आन भो!
तिथे दुसराच कुणीतरी बसलेला
तिथे दुसराच कुणीतरी बसलेला आहे >>>>
भारी किस्सा
भारी किस्सा
भारी किस्सा आ रा रा
भारी किस्सा आ रा रा
छान किस्सा...
छान किस्सा...
"मी आहे असा आहे" हे स्वीकारण्याचे रिमाइण्डर म्हणून >>>>> हेच तर बालामध्ये सांगितके होते. टकले हुए तो क्या हुआ, हम भी अपने गेली के शाहरूख है.. ॲटीट्यूड सुपर्रस्टार बनवतात, रूप नाही..
समारंभात फोटो काढताना टकले
समारंभात फोटो काढताना टकले लोक फ्रंटला नसतील याची काळजी घेतो.
माझ्या नवर्याला टक्कल आहे पण
माझ्या नवर्याला टक्कल आहे पण मला काहीही फरक पडत नाही , शेवटी माणूस स्वभावाने कसा आहे हेच महत्वाच , आमचा प्रेमविवाह आहे आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हाही त्याला टक्कल होत, पण त्याचा हसरा चेहरा, प्रसन्न व्यक्तिमत्व, केअरींग स्वभाव ह्या गोष्टी इतक्या प्रभावी होत्या की टकलाचा विचारही आला नाही मनात
टक्कल असणे हे बुद्धीमान
टक्कल असणे हे बुद्धीमान माणसाचे चिन्ह असते असा माझा समज दीर्घकाळ होता.
टक्कलवंतांकडे तुम्ही कसे
टक्कलवंतांकडे तुम्ही कसे पाहता ?
>>> दयेच्या दृष्टीने... टक्कल पडणे यात त्या व्यक्तीची काहीच चूक नसते हे माहीत असल्यामुळे एक सिमपथी आणि एमपथी वाटतेच...
दयेच्या दृष्टीने...>>
दयेच्या दृष्टीने...>>
हे काही समजले नाही.
टक्कल पडणे हा काही रोग नाही किंवा व्यंगही नाही.
मग दया कशासाठी??
Pages