का अशी रागावली? (कोलावरी गाण्याचे मुक्त विडंबन )

Submitted by निमिष_सोनार on 9 April, 2021 - 04:43

("व्हाय धिस कोलावरी डी?" या गाण्याचे हे मी मराठीत मुक्त विडंबन केले आहे, जे फक्त मनोरंजनासाठी मी लिहिले आहे!)

का अशी रागावली रागावली रागावली ती?

दूर बसला चंद्र चंद्र,
रंग पांढरा फट्ट
शुभ्र शुभ्र प्रकाशात,
रात्र काळी कुट्ट

का अशी रागावली रागावली रागावली ती?

मुलगी मुलगी गोरी पिट्ट,
हृदय काळे कुट्ट,
डोळे डोळे भिडले भिडले,
भविष्य माझे अंधारले..

का अशी रागावली रागावली रागावली ती?

हातात पेल्ला,
दारूने भरला,
डोळे सुजले रडूनं..

जीवन एकाक्की,
पोरगी आल्ली,
जीवनात मज्जा आल्ली..

माझे प्रेम्म,
तुच्च तुच्च,
पावसात आपण न्हाऊअ..

गाणे ऐक,
अरे भाऊअ,
नको कुठे जाऊअ..

हे गाणे आहे आहे,
सूप सारखे घट्ट,
गाणे ऐकल्याशिवाय,
तू कुठे नको जाऊअ..

का अशी रागावली रागावली रागावली ती?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

टायटल बघून मनात कल्पना केली होती की शेवटचा शब्द तू असेल,

पण इथे ती आहे

जमलंय.
पण मूळ गाणेच अर्थहीन असल्याने विडंबनाची मजा नाही आली असे मला वाटते. भाषांतर जास्त वाटते आणि ते जमलंय.

अजून कुठले छानसे गाणे घेऊन येऊ द्या विडंबन.