ही ’श्री’ ची इच्छा, पुन्हा ’श्री’ गणेशा

Submitted by मोहना on 19 March, 2021 - 20:41

नुकतीच श्री ठाणेदारांची घेतलेली मुलाखत म्हणजे आनंदाचा ठेवा! कितीतरी गोष्टींना वेळेअभावी फक्त स्पर्श करता आला. २००५ साली ही ’श्री’ ची इच्छा हे पुस्तक हातात पडलं तेव्हा विलक्षण भारावून जायला झालं होतं. त्यांच्यासारखाच आपणही काहीतरी भलाथोरला उद्योगधंदा उभारावा असंही वाटून गेलं होतं. वेळेअभावी तो विचार लवकरच बाजूला पडला Happy पण पुस्तक मात्र कायमचं मनातला एक कोपरा अडवून राहिलं.
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मी त्यांना त्यांच्या पुस्तकातला एखादा उतारा वाचून ते चित्रित करुन पाठवतील का असं विचारलं आणि ते मुलाखतीसाठीच तयार झाले. इतकंच नाही तर त्यांचं दुसरं पुस्तकही ताबडतोब मला पाठवून दिलं. अधाशासारखी दोन्ही पुस्तकं मी परत वाचली. ठाणेदारांच्या जीवनप्रवासाने अचंबित होत राहिले. दीर्घकाळ लक्षात राहील अशी ही मुलाखत मला घ्यायला मिळाली याबद्दल ठाणेदारांचे मन:पूर्वक आभार. या निमित्ताने त्यांच्याशी आधी आणि नंतर झालेल्या गप्पा म्हणजे सकारत्मकतेचा आणि उत्साहाचा उत्सव!

ही मुलाखत पाहून त्यांची पुस्तकं वाचण्याची इच्छा कितीतरीजणांना व्हावी ही इच्छा. मुलाखत पाहिली नसेल तर पाहा आणि प्रतिक्रियेत इमेल नोंदवा. पुस्तक लगेच तुमच्यापर्यंत पोचेल. श्री ठाणेदारांनी दोन्ही पुस्तकं सर्वांसाठी उपलब्ध करुन दिली आहेत. विनामूल्य! मामबोकरांनी मला इथल्या प्रतिक्रियेत/ विपुत पुस्तक पाहिजे असेल तर कळवलंत तरी चालेल.

Youtube:
https://www.youtube.com/watch?v=MxQsMDgRfBs

Facebook:
https://www.facebook.com/CharlotteMarathiMandal/videos/1037898120037119/

ThanedarFlyer.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच मोहना
अश्या व्यक्तिमत्वाला भेटण्याची संधी मिळाली हे भारीच
श्रींची इच्छा अनेक वेळा वाचलंय.जेव्हा जेव्हा उदास मनःस्थितीत असते तेव्हा तेव्हा वाचते.
पुन्हा श्रीगणेशा बद्दल माहिती नव्हतं.नक्की वाचते.

धन्यवाद दोघींनाही. पुन्हा 'श्री' गणेशा मध्ये सुरुवातीची जवळजवळ 70 पानं पहिल्या पुस्तकातलीच आहेत त्यामुळे लागोपाठ पुस्तकं वाचली तर नक्की आपण कुठलं वाचतोय ते कळत नाही. तरीदेखील पुस्तक वाचण्यासारखंच आहे. याबद्दल मी त्यांना नंतर विचारलंही. पुढच्या पुस्तकात फक्त सारांशच लिहिन असं त्यांनी सांगितलं!!!

मोहना, तुम्ही घेतलेली मुलाखत पाहिली. आवडली.

मी श्री ठाणेदारांना एकदा भेटले आहे ( माझ्या मुलाच्या क्रेशच्या काकुंचा सख्खा भाऊ, त्यामुळे त्यांच्याकडे उभ्या उभ्या गप्पा झाल्या होत्या.) खुपच मृदु, humble आणि down to earth व्यक्तीमत्व आहे.

त्यांनी स्वतः मला श्रींची इच्छा दिलं होतं. तेव्हा 2-3 वेळा वाचलं आहे. पण श्री गणेशा बद्दल माहित नव्हतं. आता शोधुन वाचेन.

मीरा धन्यवाद. तुम्ही म्हणताय तसंच आहे त्यांचं व्यक्तिमत्व. मला त्यांनी दोन वेळा फोन करायला सांगितलं आणि नेमका उचलला नाही त्यामुळे मुलाखत थेट घ्यायची की नाही असा थोडा मला संभ्रम होता. मी त्यांना म्हटलं आपण मुलाखत आधीच चित्रित करू या. त्यातली खोच त्यांच्या ताबडतोब लक्षात आली. त्यानंतर तीन-चार वेळा त्यांनी सांगितलं की काळजी करू नका, मी फसवणार नाही, होईन हजर त्यावेळेला. दोनदा फोन उचलला नाही त्याबद्दलही तीन-चार वेळा दिलगिरी व्यक्त केली.

माझ्याकडे pdf आहेत दोन्ही पुस्तकांच्या. खूप मायबोलीकरांना मी पाठवली दोन्ही पुस्तकं. इमेल पत्ता कळवलात तर तुम्हालाही पाठवते.

मोहना, अत्यंत आभारी आहे. पुस्तक वाचायला नक्की आवडेल. मी तुम्हाला संपर्कातुन इमेल आयडी पाठवते. Happy