चार अंश सेल्सिअस
वरुन पहायला कोरडा कडकडीत पारदर्शी बर्फ. पण त्याच्या खाली मात्र वाहणारे जिवंत प्रवाह.
वरुन दिसणारं आणि खाली मुळात असणारं संपूर्ण विरोधाभासी चित्र. खाली तापमान ‘चार अंश सेल्सिअस’ आणि वर मात्र शूण्याखाली!
विज्ञान याला ‘पाण्याचे असंगत आचरण’ म्हणतं.
बाहेरुन पाहणाऱ्याला दिसतो कोरडा ठक्क बर्फ. आतले प्रवाह दिसत नाहीत.
माणसांचंही असतं असं काहीसं.
वाढत जाणाऱ्या वयाचे आणि आयुष्याचे गोठवणारे शूण्य क्षण पचवल्यावर वरची कातडी शुष्क बर्फाची बनत जाते. त्यावरच्या संवेदना पुसट होत जातात. एक थंड मुखवटा चढतो.
पण आत मात्र असतात जाणीवांचे काही जिवंत प्रवाह. कोणालाही न दिसणारे. स्वप्नाळू मन आपलं इवलंसं अस्तित्व राखून असतं तिथे. कोणालाही न दाखवलेली स्वत:ची अशी एक आगळी बाजूही जपलेली असते नकळत. नाती, नियम, शिष्टाचार साऱ्यांच्या पलिकडे असलेलं एक अल्लड मन जपू पाहत असतं स्वत:चं अस्तित्व!
ही चार अंश सेल्सिअस अवस्था तशी फार महत्वाची असते.
पाणी चार वरच सर्वाधिक घन असतं
चार अंश सेल्सिअस..
More or less, Duality exists in everybody and everywhere!
सांज
chaafa.blogspot.com
मस्त ! आवडले. वर् वर कोरडा
मस्त ! आवडले. वर् वर कोरडा वाटणारा चेहेरा, आतमध्ये मनाच्या किंवा हृदयच्या कुठल्यातरी खोल कप्प्यात मायेचा जिवंत झरा बाळगुन असतो, तसेच हे.
क्या बात क्या बात!
क्या बात क्या बात!
छान लिहिलय.
छान लिहिलय.
मस्त ...
मस्त ...
धन्यवाद!
धन्यवाद!