कधीकाळी माझ्यातला आत्मविश्वास एकदम कमी झाला होता. तो मी प्रयत्नपूर्वक वाढवू शकलो. त्या टप्प्यातनं जाताना मला उपयोगी पडलेल्या या काही युक्त्या. मी डॉक्टर/ मानसोपचार तज्ञ नाही . या युक्त्या मी नुसत्या वाचलेल्या नसून मी प्रत्यक्षात वापरून मला त्याचा फायदा झाला आहे.
आधी या मागची थेयरी सांगतो.
१) मनोकायिक आजारांबद्दल (Psychosomatic disorder) किंवा Mind body connection भरपूर माहिती नेटवर उपलब्ध आहे. तुमच्या मनातल्या काही विचारांमुळे तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. संशोधनावरून असं लक्षात आलंय की हे दोन्ही दिशेने कार्य करतं आणि चांगल्या वाईट दोन्ही परिणामांसाठी काम करतं. आपण शरीरात चांगले बदल घडवून मनावर आणि स्वभावावर त्याचा परिणाम करून घेणार आहोत.
२) आयुष्यातल्या एका भागात होणार्या बर्या वाईट अनुभवांचा परिणाम इतर भागांवर पसरतो. कंपार्टमेंटलायझेशन करता येतं पण ते आपोआप होत नाही त्यासाठी मेंदूला कष्ट करावे लागतात. एका भागाचा परिणाम दुसरीकडे होणे हे जास्त आपोआप असते. त्यामुळे आपल्या एका भूमिकेत आत्मविश्वास आला तर तो दुसर्या भूमिकेतही वाढतो. हे आनंदी अवस्थेबद्दलही (डिप्रेशन कमी करण्यासाठीही )लागू पडते.
३) आपल्या सभोवतीच्या वातावरणाचा , व्यक्तींचा, घटनांचा आपल्यावर सतत कळत नकळत चांंगला वाईट परिणाम होत असतो. याचा आपण आपल्या फायद्यासाठी करून घेऊ शकतो.
३) छोट्या छोट्या सवयीतून मोठे बदल घडवून आणता येतात.
आता प्रात्यक्षिकाकडे वळू:
यातल्या ३ ही पायर्या महत्वाच्या आहेत. त्या वगळू नका.
१) रुटीन तयार करा: रोज एक ठराविक , तुम्हाला सगळ्यात जे सोपे असेल ते रुटीन सुरु करा. उदा. दररोज सकाळी उठल्यावर अंथरुणाची घडी करा. का ? एक म्हणजे दिवसातले सगळ्या पहिले काम तुम्ही केलेत तर एक काम संपवल्याचा आत्मविश्वास तुमच्यात येईल. आणि दुसरे हे इतके सोपे आहे , त्याची सवय पटकन लागून जाईल.
तुमचा यावर विश्वास नाही? अमेरिकन नौदलाचे अॅडमिरल विल्ल्यम मॅकरव्हेन यांचा हा व्हिडीयो पाहण्यासारखा आहे.
२) या रूटीनचा भाग म्हणून काहीतरी व्यायाम सुरु करा. (अंथरूण आवरल्यावर आणि दात घासल्यावर). हा व्यायाम अगदी सोपा हवा, कुठल्याही साधनाचा वापर न करता (किंवा अगदी सहज मिळणार्या साधनाचा वापर करून) यायला हवा आणि घरच्या घरी एकट्याने करता यायला हवा. सोपा आणि घरच्या घरी एकट्याने (कुणाची मदत न घेता) हे खूप महत्वाचे आहे. उदा. बैठका , सूर्यनमस्कार, सहज जमू शकेल असे योगासन (शवासन सोडून) , दोरीवरच्या उड्या . आणि यातला एकच व्यायाम सुरु करा. उदा रोज ५ बैठका किंवा रोज एक सूर्यनमस्कार असे आठवडाभर केल्यावर पुढच्या आठवड्यात तुम्हाला सहज जमेल तितके वाढवा . उदा ५ बैठकांच्या ऐवजी ६ बैठका. ही छोटीशी वाढ होणे हे ही खूप महत्वाचे आहे. काही आठवड्यांनंतर तुमचे शरीर पहिल्या दिवसापेक्षा जास्त असलेल्या व्यायामासाठी तयार झाले असेल आणि हे आपले आपल्या जमले आहे हे याची मेंदूत नकळत नोंद होऊन आयुष्यातल्या या छोट्या गोष्टीबद्दलचा आत्मविश्वास वाढला असेल. हा व्यायाम फक्त आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे. तुम्ही इतर व्यायाम करत असाल (उदा वजन कमी करण्यासाठी वगैरे) ते वेगळे करा.
विश्वास बसत नाही ? हार्वर्ड विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या लेखातही हेच सुचवले आहे.
३) रोज रात्री अंथरूणात पडल्यावर , डोळे मिटून , तुमच्यात आत्मविश्वास आल्यावर , तुम्ही कसे दिसाल, वागाल, बोलाल हे डोळ्यासमोर आणा (Visualize). पण हे नुसते डोळ्यासमोर आणून थांबायचे नाही तर त्याचा काल्पनिक अनुभव घ्यायचा आहे. उदा. तुम्हाला चारचौघात बोलायची भिती वाटते. डोळे मिटून अशी कल्पना करा की तुम्ही चारचौघात अस्खलीत बोलता आहात. पण तिथेच थांबायचं नाही तर तपशीलात जाऊन कल्पना करायची. तुम्ही कुठले कपडे घातले आहेत , त्यांचा रंग काय आहे, तुमची केशभूषा कशी आहे, तुम्ही कुठल्या खोलीत बोलता आहात, तिथे किती तापमान आहे, कुठले वास येत आहेत, कुठले आवाज येत आहेत , अजून कोण आहे याची खोलात जाऊन कल्पना करा. थोडक्यात तुम्हाला जो अंतिम परिणाम अपेक्षित आहे , तो झालेला आहे याची मेंदूला सवय करून घ्यायची.
यावर विश्वास नाही ? ऑलिपिक खेळाडू या युक्तीचा वापर करून स्वतः मधे बदल घडवून आणतात.
या युक्त्यांमुळे तुमचे सगळे प्रश्न सुटणार नाहीत. पण आत्मविश्वास वाढवण्याचा हा पहिला महत्वाचा टप्पा आहे हे मी अनुभवावरून नक्की सांगू शकतो.
छान टिप्स आहेत.
छान टिप्स आहेत.
३. बद्दल बरेच वाचले आहे, ते कसे काम करते ते आणि त्याचे लोकांचे प्रत्यक्ष अनुभव. मला पावलांचा आर्थ्रायटीस झालाय, त्यावर मात करायला मी हा उपाय सुरू केला आहे अलीकडेच, डॉकने सांगितलेल्या व्यायामासोबत.
उपयुक्त लिखाण, धन्यवाद
उपयुक्त लिखाण, धन्यवाद
छान माहिती.
छान माहिती.
उपयुक्त माहिती +१
उपयुक्त माहिती +१
छान विषय आणि मांडणी केली आहे,
छान विषय आणि मांडणी केली आहे, छोट्या आवाक्यातल्या गोष्टी तडीस गेल्यावर आत्मविश्वास वाढायला मदत होते. लेखातल्या लिंक पण माहितीपूर्ण आहेत.
छान माहिती.
छान माहिती.
छान लेख.
छान लेख.
चांगल्या सूचना आहेत. माझा
चांगल्या सूचना आहेत. माझा अनुभव सांगतो. मी दहावीपर्यंत नगरच्या बाहेर गेलो नव्हतो कधी राहायला जादा आणि अकरावीला मी फर्ग्युसनला प्रवेश घेतला तसेच आयआयटी एंट्रन्स तयारीसाठी एम प्रकाश क्लास जॉईन केला( बारावीला मी नगरला आलो तो भाग वेगळा). आम्ही गरीब वगैरे नसलो तरी इथे आल्यावर हायफाय पोरं-पोरी आणि त्यांचे फाडफाड इंग्लिश पाहून मला मोठा कॉम्प्लेक्स आला होता. मग मी इंग्लिश बोलण्यावर आणि स्वतःच्या आऊटलूकवर बरीच मेहनत घेतली. त्यातुन व्यक्तिमत्वात बराच बदल होऊन आत्मविश्वास वाढला. नंतर डिग्रीसंपेपर्यंत माझी पर्सनॅलिटी जगात कोणीही कोणत्याही पदावरचा माणूस भेटला तरी न्यूनगंड येणार नाही एवढी टिपटॉप केली. वापरात येणाऱ्या सर्व गोष्टी शक्य तितक्या टॉपक्लास असतील याची दक्षता घेतली. फक्त दिसण्यावरच नाही तर हावभाव, बोलायची पद्धत, आवाजातील चढउतार-त्यातील मार्दव वगैरे सर्व गोष्टींवर मेहनत घेतली. हे सर्व बाहेरून आपल्याला कोणी अप्रूव्ह करावे म्हणून नाही तर स्वतःची इमेज स्वतःसाठी पर्फेक्त बनेल यासाठी करायचे आणि यात आपण narcissist होणार नाही याकडेही लक्ष द्यायचे. पण यात तुमच्या/घरच्यांच्या खिशाला मोठे भगदाड पडते हा एक मायनस पॉईंट आहे. माझे अकॅडेमिक्स गँडले या सर्वांत पण त्याचा तसाही फार उपयोग नसतो खऱ्या व्यावहारिक जगात. साधी राहणी-उच्च विचारसरणी यापेक्षा उच्च राहणी-अतिउच्च विचारसरणी यावर जास्त विश्वास आहे माझा.
बादवे कोतबोमधे ऍडमिन यांचा वरील शीर्षक असलेला धागा पाहून क्षणभर गांगरलो मग उचकून पाहिला
बादवे कोतबोमधे ऍडमिन यांचा
बादवे कोतबोमधे ऍडमिन यांचा वरील शीर्षक असलेला धागा पाहून क्षणभर गांगरलो मग उचकून प>> अय्या मी पण.
क्षणभर गांगरलो मग >> उस
क्षणभर गांगरलो मग >> उस वक्त आपको कैसा लगा ?
<< बादवे कोतबोमधे ऍडमिन यांचा
<< बादवे कोतबोमधे ऍडमिन यांचा वरील शीर्षक असलेला धागा पाहून क्षणभर गांगरलो मग उचकून प>> अय्या मी पण. >>
------ होय असे मान्य करायला पण धाडस लागते...
आणि त्याचा सकारात्मक परिणाम आज त्यातून जाणारांवर होतो. ( अरे त्यांना पण हे भेडसावत होते.... म्हणजे मी एकटाच नाही )
जिद्दु, स्वतः बद्दल सोमीवर
जिद्दु, स्वतः बद्दल सोमीवर बिनधास्त लिहिता येणं, हे सुद्धा चांगल्या आत्मविश्वासाचे लक्षण आहे, तुमच्या लिहिन्यातून आत्मविश्वास दिसून येतो.
चांगला लेख. व्यायामाचा
चांगला लेख. व्यायामाचा मुद्दा तर खूप अनुभवलेला आहे. एक तरी ठरवलेली गोष्ट घडली याचे समाधान खूप आनंद देतं.
चांगल्या सूचना आहेत.
चांगल्या सूचना आहेत.
लेख खूप आवडला अजयजी
लेख खूप आवडला अजयजी
अजय, लेख उत्तम झाला आहे.
अजय, लेख उत्तम झाला आहे. उपयुक्त आहेच.
तुझा आत्मविश्वास कमी झाला होता ह्यावर विश्वास बसत नाहीये.
छान आणि उपयुक्त लेख!
छान आणि उपयुक्त लेख!
छान टिप्स आहेत.+१११
छान टिप्स आहेत.+१११
छान आणि उपयुक्त लेख!>>>>+१.
छान आणि उपयुक्त लेख!>>>>+१.
खूप छान व उपयुक्त धागा आहे.
खूप छान व उपयुक्त धागा आहे. सहज होऊ शकणारे उपाय दिले आहेत. नक्की करून बघेन.
>>असे मान्य करायला पण धाडस लागते...
>>आणि त्याचा सकारात्मक परिणाम आज त्यातून जाणारांवर होतो. ( अरे त्यांना पण हे भेडसावत होते.... म्हणजे मी एकटाच नाही Happy ) >>>> उदय +१११
खूप छान व उपयुक्त धागा आहे.
खूप छान व उपयुक्त धागा आहे. सहज होऊ शकणारे उपाय दिले आहेत. >> + 1
छान माहिती दिली आहे.
छान माहिती दिली आहे.
खूप छान लेख. व्हिडीओ तर
खूप छान लेख. व्हिडीओ तर जबरदस्तच.
You must write more.. for us...
छान लेख!
छान लेख!
उपयुक्त लेख. आवडला.
उपयुक्त लेख. आवडला.
मायबोली वेबसाईट स्थापन करण्याऱ्या अडमीनचा आत्मविश्वास कमी झाला होता याची खरच कल्पना नव्हती.
खूप छान आणि उपयुक्त धागा, अजय
खूप छान आणि उपयुक्त धागा, अजय!
मला सायकल चालवता येते हे चौथी
मला सायकल चालवता येते हे चौथी पाचवीत सिद्ध झाले. पण रस्त्यावर ट्राफिकच्या बाजूने तोल सावरत जाऊ शकेन किंवा गर्दीमधून धक्का न लावता चालवता येईल असा आत्मविश्वास नाही.
खूप छान व उपयुक्त धागा आहे.
खूप छान व उपयुक्त धागा आहे. सहज होऊ शकणारे उपाय दिले आहेत. >> + 1
लेख ऊत्तम आहे. पण सकाळी
लेख ऊत्तम आहे. पण सकाळी उठल्यावर अंथरूणाची घडी करणे सोपे काम नाही. आधीच कसाबसा जीवावर आल्यागत उठायचे आणि मिटल्या डोळ्यांनीच दहा पंधरा मिनिटे ब्रश करत राहायचे अशी दिवसाची सुरुवात करणारया माझ्यासारख्यांसाठी फारच अवघड.
तिसरा प्रकार ईंटरेस्टींग आहे. मला वाटते तो मी अपयशी एकतर्फी प्रेमप्रकरणांतून बाहेर पडण्यासाठी वापरला आहे. काल्पनिक गर्लफ्रेंड आणि काल्पनिक रोमान्स..
खूप छान लिहिले आहे आवडले.
खूप छान लिहिले आहे आवडले. नंबर तीन बद्दल अ.ल. भागवत यांच्या "मनाची शक्ती व स्वयंसूचना" अशा(?) शीर्षकाचे पुस्तकात वाचले होते. नुसत्या कल्पना करण्याने सुद्धा मन सुचना स्विकारते..हे खरंय. सगळेच मुद्दे उपयुक्त व सहज करता येण्यासारखे आहेत.
जिद्दु यांचा प्रतिसाद ही आवडला.
Pages