फास्टटॅग

Submitted by तनुदि on 15 February, 2021 - 11:32

How to take fastTag online. Any govt website is there?
Pls help

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेटीएमचाही असतो. केवायसी लागतं. त्यामुळे शक्यतो आपलं अकाऊंट ज्या बँकेत आहे त्यांचाच घेणं सोयीचं पडतं. म्हणजे नव्याने केवायसी करावं लागत नाही.

लोकांना सहजपणे फास्टॅग विकत

लोकांना सहजपणे फास्टॅग विकत घेता यावा, यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे.

बँका, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासारख्या ठिकाणी फास्टॅगच्या विक्रीसाठी 18 नोव्हेंबरपर्यंत 28,500 विक्री केंद्र उभारण्यात आली आहेत.

यासोबतच आरटीओ (RTO) कार्यालय, सर्व सेवा केंद्र, वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवरही हे फास्टॅग उपलब्ध आहेत.

1 डिसेंबर पर्यंत लोकांना फास्टॅग मोफत देण्यात यावेत अशा सूचना केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या आहेत. या फास्टॅगसाठीचे 150 रुपये 1 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरेल.

कार, जीप्स आणि व्हॅनसाठीचे फास्टॅग हे अॅमेझॉन, पेटीएम, स्टेट बँक, ICICI बँक, अॅक्सिस बँक, HDFC बँक, IDFC फर्स्ट बँक यांच्या वेबसाईटवरून ऑनलाईनही विकत घेता येतील.

तुमच्या जवळचं फास्टॅग केंद्र शोधण्यासाठी अॅण्ड्रॉईड फोनवर My FASTag App डाऊनलोड करता येईल.

छान माहिती तेजो.
मलाही घ्यायचा आहे, बँकेच्या वेबसाईटवरून घेईन.

तुमचे खाते असलेल्या बँकेतून घेतलेले बरे. कधी प्रवासात बॅलन्स कमी आहे हे लक्षात आलेच तर बँकेच्या app मधून लगेच रिचार्ज होऊ शकते.

तुमचे खाते असलेल्या बँकेतून घेतलेले बरे. कधी प्रवासात बॅलन्स कमी आहे हे लक्षात आलेच तर बँकेच्या app मधून लगेच रिचार्ज होऊ शकते.>>
बँक खातं फ्रॉडुलंटली रिकामं व्ह्यायची कितपत शक्यता आहे?

मी वापरतोय ICICI वरुन घेतलेला fasttag दिवाळीपासून.... १५ एक वेळा टोल भरला असेल fasttag ने आणि जेव्हढे कट व्हायला पाहिजेत तेव्हढेच कट होतात.... अगदी लगेच टोलनाक्यावर असतानाच मेसेज येतो असे नाही पण थोड्यावेळात येतो लगेच मेसेज.... मुख्य म्हणजे fasttag वापरायला लागल्यापासून टोलनाक्यावरचा वेळ बराचसा वाचतोय Happy

काही टोल नाक्यांवर स्थानिक लोकांना टोल माफ असतो. पण आता FASTag मुळे हे कसे manage होणार काय माहीत? जसे की भोर परिसरात राहणाऱ्या लोकांना खेड शिवापूर टोल माफ आहे पण नवीन पद्धतीनुसार सरसकट सगळ्यांकडून वसुली होणार. स्थानिक आमदार आंदोलन करणार आहेत म्हणे ह्या प्रकार वरून.

त्यांना कॅश लेन मधून जाता येईल ना. तिथे स्थानिक ओळखपत्र दाखवून जाता येईल टोल न भरता.
एक्स-सर्व्हिसेमेन/वुमेनना सुद्धा टोल माफ असतो.

तुम्ही विचारल्यावर आता शोधले तर आता एक्स सर्व्हिसमेन ना माफ नसून ऑन ड्युटी असेल तरच माफ असे स्पष्टीकरण आल्याचे दिसले.

माझ्या आधीच्या कंपनीत माझा बॉस एक्स सर्व्हिसमन होता. त्याच्या सोबत जाताना तो एक्स सर्व्हिसमेन आयकार्ड दाखवायचा टोलला. आम्ही टॉक्सिने जात असू तरीही. तेव्हा माफ होता. २०१४ पर्यंत तरी, त्यानंतर तो रिटायर्ड झाला.
हैद्राबाद, नवीमुंबई, पुणे-मुंबई याठिकाणी तेव्हा माफ होता. अथवा खालील स्पष्टिकरण तेव्हा नसल्याने चालून तरी जात होते.

https://indianexpress.com/article/india/toll-exemption-to-defence-person...

पेटीएम चा फास्ट टॅग जरा किचकट प्रकरण आहे. कारण पेटीएम मध्ये २ अकाउंट्स राहातात. त्यातल्या फास्ट टॅग ला डिफॉल्ट १५०/- अडकतात. टोल वर तुमच्या मेन पेटीएम खात्यातून पैसे जातात. जर तुमचा मेन पेटीएम अकाउंट बॅलन्स कमी असेल तर च त्या फास्टटॅग च्या १५० मधून पैसे जातात.
अर्थात जेव्हा नेक्स्ट रिचार्ज कराल पेटीएम ला तेव्हा फास्ट टॅग परत १५०/- येतं.

डारयेक्ट बँक अ‍ॅप मधून फास्ट टॅग बहुधा रिचार्ज करता येत नाही.
ज्या बँकेचं फास्ट टॅग असेल त्या बँकेच्या फास्ट टॅग साईट ला जाऊन ते रीचार्ज करायला लागतं.

बाकी ती सोय फारच उत्तम आहे. अजिबात थांबायला लागत नाही टोल वर.
कॅश लेन मध्ये २-२ किमी रांग असताना आपण पटकन सुटतो टॅग असल्यानी.
मुं-पु एक्सप्रेसवे वर जिथे (शक्यतो विकेन्ड्स, इतर सुट्ट्या) फार गर्दी असते तिथेही अगदी २-३ मिनिटात टोल पार होतो हे या दिवाळीच्या वेळी अनुभवलं आहे. टोल अतीच घेतात ते वेगळं. [ ८४ किमीच्या रस्त्यासाठी २७०/- खूपच होतात Angry ]

शक्यतो प्रवासाच्या आदल्या दिवशी रिचार्ज करायच हे मी माझ्या पुरतं ठरवलंय. कारण टॅग ला बॅलन्स लगेचच अपडेट होत नाही. शक्यतो तासा-दोन तासांत होतो.
एक्स सर्वीस वाल्यांना टोल माफ आहे. त्यांना फास्ट टॅग ची गरज नाही. मूळ ओळखपत्र मात्र सोबत लागतं.

मी आयसीआयसीआय मधुन घेतला परवा, अजून यायचा आहे. ₹ २०० सिक्युरिटी डिपॉझिट आहे, ₹ २०० बॅलन्स आणि ₹९९ नव्या टॅगचे असे ₹४९९ लागले.
हे ₹२०० सिक्युरिटी डिपॉझिट हे बॅलन्स संपल्यास वापरले जातील आणि परत डिपॉझिट करावे लागतील असा कयास आहे.

हा असंच काहीसं मला एचडिएफसी नी दिलेलं होतं आता झालं वर्ष सो नीटस काही आठवत नाही.
टॅग लावतांना नीट लावा ही विनंती, नायतं ते टोल वर गाडी पुढे-मागे करायला लावतात रीड नीट होत नाही तर Biggrin

टॅग लावतांना नीट लावा ही विनंती, नायतं ते टोल वर गाडी पुढे-मागे करायला लावतात रीड नीट होत नाही तर ....

मुळात टोल नाक्यावरचे readers खूप उंचावर असतात (बस / ट्रक यांच्या उंचीचा विचार करून). आपली चारचाकी गाडी त्यामानाने खूपच खाली असते. त्यामुळे अंतर वाढल्याने कधी - कधी read होत नाही. जर त्यांनी वरच्या readers सोबतच बाजूला एखाद्या पोलवर कमी उंचीवर reader लावले तर ही समस्या येणार नाही असे मला वाटते.

आणि हो, Fastag लावतांना तो पुढच्या काचेवर आतूनच लावायचा असतो. काही महाभाग बाहेरून लावतात आणि मग प्रत्येक वेळी त्यावरून वायपर फिरल्याने तो खराब होतो.

काल एक नाक्यावर माझ्या फास्टॅग वरून सलग दोनदा कट झाले पैसे. त्यामुळे पुढील नाक्यावर बॅलन्स नसल्याने माझ्याकडून दंडासह दुप्पट पैसे घेतले. त्यामुळे बॅलन्स असूनही मला भुर्दंड पडला!
अश्या परिस्थिती तक्रार कुठे करायला हवी?

अश्या परिस्थिती तक्रार कुठे करायला हवी?
<<
राजाने मारलं अन पावसाने झोडपलं तर तक्रार कुणाजवळ करणार?
-आर्य चाणक्य.