Submitted by कुलदीप आपटे on 3 February, 2021 - 21:30
माझ्या घरात,
मी दुःख पसरून बसलो होतो
दुःखाने कानाकोपरा व्यापला होता
घराचे दार वाजले,
दार उघडले तर समोर सुख होते
घरात जागा नसल्यामुळे बिचारे अडगळीत बसले
अधून मधून,
सुख माझ्याकडे कोपऱ्यातून बघत होते
मी मात्र दुखालाच कुरवाळत बसलो होतो
परत घराचे दार वाजले,
दुसरा कोणीतरी त्याचं दुःख घेऊन आला होता
पण माझ्या घरात जागा नव्हती मी त्याला परत पाठवून दिले
अधून मधून,
सुख माझ्याकडे कोपऱ्यातून बघत होते
मी मात्र दुखालाच कुरवाळत बसलो होतो
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults