आहेर

Submitted by आर्त on 30 January, 2021 - 08:24

पहिली वहिली गझल. मुक्तमनाने टिका करा, चुका काढा आणि दाद द्या. त्याशिवाय शिकणे नाही.

उंबऱ्यावर उभा प्रश्न घेऊन, आत किंवा बाहेर
ताठर तु नकार दिलास, आणि एकटेपणाचा आहेर.
.
पौर्णिमा चंदेरी तरी अंधकार का इथे दाटला?
कोण निर्दयी टाकून गेला हा मेघांचा घेर?
.
चांदणे दिसले परी कधी नक्षत्र न दिसले मज
तुकड्यास तुकडे जोडणे अवघड, बिथरले मन चौफेर
.
दोष सारे मान्य केले, अजून गुन्हेगार अज्ञात
शासन शेवटी प्याद्यावर झाले, निमित्त मात्र अखेर
.
संथ निशा भावली होती, सालस ती सोबती
भीती कालवत नभी चालली, का मेघांची समशेर?
.
मनात नसता परिवर्तन झाले, आढळले क्षितिज नवीन
उशीर झाला थांबवण्याला, दूर राहिले माहेर.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults