
नोव्हेंबर म्हटले कि आमच्या सारखे पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर्स स्थलांतरित पक्ष्यांची वाट बघायला लागतात. अशातच नोव्हेंबर मध्ये बातमी आली कि अमूर फाल्कन दिसायला लागलाय. ९ महिने झाले मी फोटोग्राफी आणि पक्षी निरीक्षणाला गेलो नव्हतो एक प्रकारचं नैराश्यदायक वातावरण होतं .
मग काय खडाक्टिंग केले आणि शोधात निघालो. पण आम्हाला त्या दिवशी दिसला नाही. तसा मी ८ एक वर्षांपूर्वी ह्याच ठिकाणी पाहिला होता पण तेंव्हा कॅमेरा नव्हता आणि नंतर एकदा दुसरी कडे पाहिला होता तेंव्हा कॅमेरा होता पण पक्षी तारेवर बसला होता. मग हे न विसरणारं वर्ष संपता संपता परत कळाले कि अमूर दिसायला लागले आहे. आता मात्र पूर्ण तयारीनिशी निघालो आणि दुपारी ३ च्या सुमारास पोहोचलो...आणि जेंव्हा अमूर ला पाहिलं तेंव्हा अक्षरशः धन्य झालो. ह्या पक्षाला आजूबाजूचं काहीच भान नव्हतं, इतके लोकं त्याला बघत होते, फोटो काढत होते आणि त्याचे आपलं खाण्याचं काम चालू होतं . तो दिवस संपला पण मन नाही भरलं . २ दिवसांनी परत त्याला आणि इतर पक्षी बघायला गेलो. एकतर हॅबिटॅट इतके सुंदर झाले आहे..सगळी कडे जांभळी मंजिरी ची फुलं आहेत , हिरवाई आहे..ह्या वेळेस आम्ही सकाळी ७.३० ला पोहोचलो. हळू हळू लोकांची गर्दी व्हायला लागली. गेल्या गेल्या आम्हाला फिमेल पक्षी दिसला मस्त पैकी अळ्यांवर, किड्यांवर ताव मारणे चालू होते. मग आम्ही अजून पुढे गेलो , मेल पक्षी नेहेमीच्या क्षेत्रात नव्हता . आम्ही अजून पुढे गेलो आणि तिकडे तो मस्त पैकी आरामात बसलेला दिसला . आम्ही शांतपणे गाडीतून उतरून झोपत झोपत थोडे पुढे जाऊन फोटो काढले आणि पुढे गेलो. एका ठिकाणी उभं राहून न्याहारी उरकली आणि परत इतर पक्षाच्या शोधात निघालो. दूरवर कापशी घार मस्त पैकी भक्ष्याच्या शोधात आकाशात हॉवर करत होती. थोडे फोटो आणि विडिओ काढून पुढे गेलो तर अजून एक सुंदर असा लेसर केस्ट्रेल नावाचा पक्षी (मेल) उन्ह खात बसलेला दिसला. शांतपणे अँप्रोच केले आणि फोटो काढले. तेवढ्यात इतर गाड्या आल्या आणि तो उडून गेला. पुढचे २-३ तास हा हवेतच उडत होता. फिरत असतांना थोड्यावेळाने परत हा पक्षी दिसला आणि ह्यावेळेस फोटो काढत असतांना लक्षात आले कि तो साप खातो आहे. हा पक्षी साप खातो पण असं दिसणे म्हणजे एक अद्भुत अनुभव होता. अक्षरशः १ मिनिट मध्ये त्याने साप पकडला आणि ५ मिनिट्स मध्ये संपवला.
आम्ही परत अमूर च्या इकडे आलो. तेंव्हा फिमेल अमूर पक्षी मस्त पैकी जांभळ्या मंजिरीच्या फुलांमध्ये बसलेली होती. इतकी सुंदर फ्रेम होती कि बस्स. तशाच वातावरणात लांब आम्हाला इतर काही पक्षी पण दिसले जसे कि आयबीस, बगळे , खंड्या , लार्क , नीलकंठ , ब्राह्मणी घार वगैरे. संध्याकाळ व्हायला आली तसे आम्ही आता एका पक्षाची वाट बघत उभे राहिलो. हा पण युरोपातून येणारा पक्षी आहे sparrohawk "चिमणबाज" . तो आला आणि अक्षरशः ५ मिनिट्स मध्ये परत उडून गेला..
आता तुम्ही म्हणाल अमूर ससाण्याची एवढी काय क्रेझ तर ऐका . हा पक्षी साधारण पणे २२, ००० किमी अंतर पार करतो स्थलांतराच्या काळात . म्हणजे रशियात असलेल्या अमूर नदीच्या खोऱ्यातून निघून, मंगोलिया , चीन मार्गे नागालँड इथे भारतात येतो. नागालँड च्या इथे हजारोंच्या संख्येने येतात. साधारण २०१२ पर्यंत त्यांची खूप शिकार व्हायची खूप म्हणजे दिवसाला ३ ते ५००० वगैरे. मग अचानक सगळी सूत्र फिरवली गेली आणि नागालँड मधल्या लोकांना शिक्षण दिले गेले आणि त्यांना शिकारी पासून परावृत्त केले गेले. सध्या तिकडे एक पण शिकार होत नाही .
तर पुढे हा पक्षी हळू हळू भारतात पुढे पुढे येत राहतो. पुण्यात दर वर्षी येतो बऱ्याच ठिकाणी दिसतो. आणि मग २-३ आठवड्यांनी केरळ कडे जातो. तिथे परत काही दिवस मुक्काम करतो आणि मग निघतो विना थांबा प्रवासाला . पूर्ण अरबी समुद्र पार करतो (४००० किमी) आणि आफ्रिकेमध्ये स्थिरावतो . तिकडे ३-४ महिने राहून परत रिटर्न जातो. जातांना तो अफगाणिस्तान वगैरे मार्गाने अमूर च्या नदीच्या खोऱ्यात येतो. आहे कि नाही जोरदार पक्षी :).
lockdown नंतरचं एकूणच निराशाजनक वातावरण जाऊन एकदम पॉसिटीव्ह वातावरण निर्माण झाले हे नक्की
~ योगेश पुराणिक, जाने २०२१
वाहवा!!! सुंदर फोटो सगळे.
वाहवा!!! सुंदर फोटो सगळे. अमूर फाल्कनचे फोटो गेले काही दिवस बघायला मिळत होते पण तुमचे फार सुंदर आलेत. लेसर केस्ट्रेल आणि इंडियन रोलरचाही खूप सुंदर आलाय.
धन्यवाद इथे फोटो दिल्याबद्दल.
पुण्याजवळ काढले का फोटो? नेमके कुठून?
छान फोटोज
छान फोटोज
वाह मस्तच. कोणत्या कॅमेरात
वाह मस्तच. कोणत्या कॅमेरात काढलेत तुम्ही? काय खतरा डिटेल्स आलेत एकेक! प्रोफेशनल दिसताय
.
वावे- हो लोणावळ्याला .
वावे- हो लोणावळ्याला . धन्यवाद
धन्यवाद जाई
धन्यवाद भाग्यश्री . कॅनन ७०D ह्या dslr कॅमेऱ्याने काढले आहेत. प्रोफेशनल नाही आवड :). आपला IT मधला कर्मचारी आहे.
अच्छा लोणावळा. मी पाहिलेले
अच्छा लोणावळा. मी पाहिलेले बाकी फोटोपण तिथलेच आहेत.
खूप छान फोटो. तीन चार वर्षां
खूप छान फोटो. चार पाच वर्षां पूर्वी मेघालय मध्ये हजारोंच्या संख्येने पाहिले होते त्या आठवणी जाग्या झाल्या
छान आलेत फोटो.
छान आलेत फोटो.
फेसबूकवर सध्या धुमाकूळ घातलाय ह्याने
सध्या सगळ्या पक्षीप्रेमींचे रस्ते लोणावळ्याकडेच जाताहेत.
'मला कमी समजू नका चाळीस पन्नास पुणेकरांना काही क्षणात धुळीत लोळवण्याची ताकद आहे आपल्यात'
वगैरे भारी कॉमेंटसही वाचायला मिळत आहेत.
वाह रचना , मला पण जायचंय एकदा
वाह रचना , मला पण जायचंय एकदा . तुमचा अनुभव शेअर करा
हर्पेन - हो दुनिया भरातून लोकं येत आहेत :). मेमे तर खूप झालेत त्यावर
सुंदर फोटो सगळे.
सुंदर फोटो सगळे.
खूप छान आणि सुंदर फोटो...!!
खूप छान आणि सुंदर फोटो...!!
तुम्ही अनुभव छान लिहिलायं!!
छान माहिती.. फोटो पण भारीएत !
छान माहिती.. फोटो पण भारीएत !!
अतिशय सुंदर फोटो. मी सुद्धा
अतिशय सुंदर फोटो. मी सुद्धा अमुर फाल्कन लोणावळ्यातच पाहिला होता. मला या मायग्रेटरी पक्षांचे अतिशय कौतुक आहे. बेंगलोरला येऊन बर्ड वॉचिंग पूर्ण थांबलेय. इकडचे कोणी पक्षी निरिक्षणाचे ग्रुप असतील तर प्लीज कळवा.
स्वाती, मी नॉर्थ बंगलोरमधे
स्वाती, मी नॉर्थ बंगलोरमधे राहते. इथल्या जवळपासच्या तळ्यांवर जात असते पक्षीनिरीक्षण करायला. तुम्हीही जवळपास रहात असाल तर संपर्कातून ईमेल करा. आपण एकत्र जाऊ कधीतरी
मीही रंगनथिट्टू सोडल्यास इथल्या कुठल्या ग्रूपबरोबर कुठे गेले नाहीये अजून.
स्वाती - वाह कधी बघितला होता.
स्वाती - वाह कधी बघितला होता. २०१३ नंतर पहिल्यांदा आलाय लोणावळ्यात.
बंगलोर ला तर खूप छान आहे birding साठी. पण ग्रुप नाही माहिती. चला ह्या पोस्ट मुळे तुम्हाला सोबत मिळाली वावे ची
छान फोटो, आवडले.
छान फोटो, आवडले.
खूप भारी देखणा पक्षी !
खूप भारी देखणा पक्षी ! इंट्रेस्टींग माहिती कळली.
थँक्स योगेश!
सुंदर फोटो सगळे.
सुंदर फोटो सगळे.
धन्यवाद उपाशी बोका, अंजली
धन्यवाद उपाशी बोका, अंजली आणि अस्मिता.
(No subject)
Ornithology शिकवताना बर्ड
Ornithology शिकवताना बर्ड फोटोग्राफी करताना पाळायचे एथिक्स, नियमसुद्धा शिकवले जातात. सहसा ठराविक अंतर राखून, फार गर्दी न करता बर्ड फोटोग्राफी केली तर बरी. 40 - 50 गाड्यांची गर्दी, बसेस भरून माणसे अमूर फाल्कनचे फोटो काढायला येणार आणि त्यामुळे त्याला काही त्रास होणार नाही याची खात्री कोण देणार आहे? दोन वर्षापूर्वी फॅन थ्रोटेड लिझार्डचे फोटो काढतानासुद्धा लोकांनी अशीच गर्दी करून वैताग आणला होता. जे काही ट्रेंडमध्ये असेल त्याचे फोटो काढायचे आणि सोशल मीडियावर टाकून आपणही त्या ट्रेंडचा भाग आहोत हे दाखवायची नुसती शर्यत चालली आहे. ODKF झाला, फॅन थ्रोटेड लिझार्ड झाली आणि आता अमूर फाल्कन.
बाकी फोटोज अतिशय अप्रतिम
pratidnya - बरोबर आहे तुमचं .
pratidnya - बरोबर आहे तुमचं . माझा हेतू ट्रेंड मध्ये राहण्याचा नव्हता एक्साक्टली पण बऱ्याच गाड्या एका ठिकाणी एकाच वेळेस येणे ह्याला काहीतरी मर्यादा हवी हे नक्की. कंट्रोललेड पद्धतीने झाले तर चांगले आहे.
पण माझ्या ऑबसेर्व्हशन नुसार
पण माझ्या ऑबसेर्व्हशन नुसार अमूर ला काहीही फरक नव्हता पडत तो त्याच्या रेगुलर रुटीन मध्ये होता
पण माझ्या ऑबसेर्व्हशन नुसार
पण माझ्या ऑबसेर्व्हशन नुसार अमूर ला काहीही फरक नव्हता पडत तो त्याच्या रेगुलर रुटीन मध्ये होता>>> आमच्या निरीक्षणा नुसार flying shot मिळवण्यासाठी लोक पक्ष्याला दगड सुद्धा मारत होते. दिवसाला 40 ते 50 गाड्या अमूर फाल्कनच्या habitat जवळ येत होत्या.
pratidnya -> हो बरोबर आहे कि
pratidnya -> हो बरोबर आहे कि गाड्या जवळ येत होत्या. गाड्या बंद करून फक्त walking परमिशन ठेवली असती तरी चालले असते. पण लोकं pratidnya -> हो बरोबर आहे कि गाड्या जवळ येत होत्या. आणि जर पक्षाला त्रास झाला असता तर तो पहिल्याच दिवशी उडून गेला असता. आणि तिकडे इतर पक्षी पण आहेत. असो गाड्या बंद करून फक्त walking परमिशन ठेवली असती तरी चालले असते.
पण लोकं दगडं मारत होती हे आम्ही तर नाही पाहिले इतक्या वेळात पण काही महाभाग असतात असे हे नक्की.
सु रे ख!!! काय उमदा पक्षी!
सु रे ख!!!
काय उमदा पक्षी!
छान
छान
छान फोटोज
छान फोटोज
काय सुंदर फोटो आहेत.
काय सुंदर फोटो आहेत.