Submitted by सुनिधी on 3 January, 2021 - 23:29
जवळच्या मैत्रिणीला दीड वर्षापुर्वी एकाएकी डोळ्याच्या भोवती सुज आली व फार दुखायला लागले.
डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या, भरपुर रक्त घेऊन प्रत्येक प्रकारची अॅलर्जी तपासली. स्टेरॉईड देऊन पाहिले. पण नक्की काय झालंय ते डॉक्टरांना कळलेच नाही. जवळजवळ १-२ महिने हा त्रास चालु राहिला व मग बंद झाला. डॉक्टरांनी सावधगिरी म्हणुन वांगी, ढबु मिरची असे सुज आणू शकणारे पदार्थ टाळायला सांगितले म्हणुन ती काटेकोरपणे पाळते.
आणि आता पुन्हा ३-४ दिवसापासुन डोळा पुन्हा सुजलाय. ते डॉक्टर सुट्टीवर आहेत.
पण मोठा प्रॉब्लेम असा की ते आले तरी नक्की काय झालंय हेच कळले नाहिये डॉक्टरांना तर ते काय उपाययोजना करणार?
काय प्रकार असेल हा?
मला इतकीच वरवरची माहिती आहे.
अजुन काही माहिती हवी असेल विचारा म्हणजे उद्या विचारुन लिहीन.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी डॉक्टर नाही पण मला ॲलर्जीच
मी डॉक्टर नाही पण मला ॲलर्जीच वाटत आहे.मार लागल्याशिवाय सूज येत असेल तर ॲलर्जीच आहे असे वाटते.तरीही पुण्यातल्या नामांकीत डॉक्टर्सचा सल्ला घ्यावा.डोळ्यांच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेऊ नये .
सायनसचा त्रास आहे का? वारंवार
सायनसचा त्रास आहे का? वारंवार सर्दी-शिंका असं होतं का?
डोळ्यांच्या डॉ.ना भेटायला
डोळ्यांच्या डॉ.ना भेटायला सांगा.खूप वेळ संगणकावर काम करतात का?बर्फाने डोळ्याची ajubaju अलगदपणे शेकायला सांगा.ठणका कमी होतो.हा स्वानुभव आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
ती पुण्यात नाहीये. इथे डॉक्टरकडे वारंवार फेर्या मारुनही डॉक्टरना अजुनतरी कळले नाहीये. सर्दी वगैरे काही नसते. डोळ्याच्या डॉक्टरना दाखवले का विचारते. संगणकावर पण नसते.
शरीराबाहेर टाकले जाणारे
शरीराबाहेर टाकले जाणारे अशुद्ध पदार्थ पूर्णपणे बाहेर टाकले जात नसावेत.
थोडक्यात, गोक्षुरादी काढा किंवा वरुणादी काढा किंवा पुनर्नवादि काढा.
Stye असे गूगल करून बघा. जर
Stye असे गूगल करून बघा. जर त्या प्रकारची सूज असेल तर hot compress करायला सांगा.
सुनिधी, मेकअपची वगैरे अॅलजी
सुनिधी, मेकअपची वगैरे अॅलजी असण्याची शक्यता कितपत आहे? मला सनस्क्रिन्वाल्या मॉइश्चरायझरने डोळ्यांना सूज आली होती. दुखत नव्हते , नुसतेच सुजले होते. माझ्या नेहमीचा डोळ्याच्या डॉकने सुज कमी होण्यासाठी ड्रॉप्स दिले होते. समरची सुरुवात म्हणून मॉईश्चरायझर बदलले आणि डोळे सुजले त्यामुळे लगेच लक्षात आले.
एखादे व्यसन असल्यास त्यातून
एखादे व्यसन असल्यास त्यातून मुक्ती साठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच किडनी, मधुमेह संबंधित चाचण्या करून घ्या.
लेन्स घालते का? मला लेन्स
लेन्स घालते का? मला लेन्स घातले की होते. लेन्स काढल्या की सूज जायची.
आता लेन्सच घालत नाही. कितीही चांगल्या लेन्स घातल्या तरी त्रास आहेच.
नामांकीत डॉक्टर्सचा सल्ला
नामांकीत डॉक्टर्सचा सल्ला घ्यावा.डोळ्यांच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेऊ नये +१
sty मला पण झाले होते.. १
sty मला पण झाले होते.. १ महिना पूर्ण लागला बरे व्ह्ययला..आधी सासरचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना कळले नाही.. नाही तर १५ दिवसात बरे झाले असते.. माझा डोळा होता सगळ्यांचा विरोध पत्करून स्पेशालिस्ट ला दाखवल्यावर कळले.. डोळ्यासकट चेहरा पण पूर्ण सुजला होता.. आणि खाली बघितले कि लगेच पाणी यायचे डोळ्यातून.. डोळे खूप जड जड वाटतात आणि मग सुजायला सुरवात होते जरा जरी हात लागला तरी भयन्कर दुखते.. ब्लर पण होते कधी कधी .. हे एक प्रकारचे इन्फेकशन आहे.. जे डोळ्याचा आतल्या भागाला होते..
या ४ ५ दिवसांत आधीसारखं काही
या ४ ५ दिवसांत आधीसारखं काही खाण्यात आले का ते आठवून पहा अँलर्जी असू शकते वाटलं तर..
Swelling or puffiness around the eye area. - असं असेल तर बरीच वेगवेगळी कारणे आहेत.. अपूर्ण झोप, डोळ्यांवरचा ताण, आहारात जास्त मीठ, शुगर वाढणे, कँल्शियम डिपॉझिट इ.इ. हे पण एकदा तपासून पहा डॉ कडून.
नामांकीत डॉक्टर्सचा सल्ला घ्यावा.डोळ्यांच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेऊ नये +१
खूप जास्त रडून पण डोळे
खूप जास्त रडून पण डोळे सुजतात. घरी कल्पना नको म्हणून त्या एकट्याने काही सहन करून रडत आहेत का ते विचारून बघा. हे मी काळजीनेच लिहिले आहे. अति स्ट्रेस जसे कोणी जवळचे गेले तर खरेच रडून डोळे सुजतात. त्या एकट्याने सफर व्हायला नको फ्रेंडरव्हेन्शन इज नीडेड.
Doctor बदलून बघा.डोळे सुजत
Doctor बदलून बघा.
डोळे सुजत आहेत आणि ती सूज जास्त दिवस राहत असेल तर शरीरात काही तरी दोष नक्की आहे.
एकच शक्यता गृहीत धरून त्याच टेस्ट करण्यात काही अर्थ नाही.
शरीर चे काम एक मोठ्या आणि गुंतागुंतीच्या रासायनिक क्रिया प्रक्रिया वर अवलंबून असते.
सूज आली म्हणजे किडनी च खराब असेल.छाती मध्ये दुखायला लागले की attak च असेल .
असे कधी कधी नसते दुसरीच कारणे असतात.
24 तासा पेक्षा जास्त वेळ सूज राहत असेल तर डॉक्टर चा सल्ला घेणे हेच उत्तम.
नेहमीच्या डॉक्टर ला समस्या लक्षात येत नसेल तर दुसऱ्या तज्ञ डॉक्टर च सल्ला घेणे.
खाण्यात नेहमीपेक्षा काही आलं
खाण्यात नेहमीपेक्षा वेगळ काही आलं होतं का..? हे आधी नीट आठवून बघा.
मला पिझावरच्या मश्रूम
मला पिझावरच्या मश्रूम खाल्ल्यावर असं झालं होतं. माझ्याही खूप अॅलर्जी टेस्ट केल्या गेल्या आणि डोंगर पोखरून हा उंदीर निघाला.
एरवी मला मश्रूमची अॅलर्जी नाही...मला किती विश्वास ठेवायचा यावर ते माहित नाही.
पण डोळे, चेहरा ४ दिवस अत्यंत सुजले होते. नाताळ आणि नविन वर्षाच्या सुट्ट्या होत्या त्यामुळे मी डॉक्टर्कडे लगेच गेले नव्हते, पण गेल्यावर डॉकटर म्हटले की मी अँब्युलंस बोलवायला हवी होती ...श्वासनलिका सुजली अस्ती तर गदमरून कदाचित मेले अस्ते
तुम्च्या मैत्रिणीनं पिझा /पास्ता मश्रूम घालून खाल्लाय का?
मेकअपची वगैरे अॅलजी असण्याची
मेकअपची वगैरे अॅलजी असण्याची शक्यता कितपत आहे? >>>> माझ्या डोक्यात पहिला प्रश्न हाच आला कारण मला Faces Canada च्या कोल पेन्सीलने डोळ्यातुन पाणी येत रहातं आणि डोळे सुजतात. Especially ब्ल्यु पेन्सिलने जास्तच.
लेन्स घालते का? मला लेन्स घातले की होते.>>> हो मला पण. मी पार्टी किंवा विशेष ऑकेजनला कलर्ड लेन्सेस वापरायचे तेव्हा पापण्या सुजायच्या. माझ्या डॉक्टरने सांगितलं होतं की आपल्याला त्रास होणार नाही इतपत, पण प्रत्येक blinkला पापणी लेन्सच्या कडेला घासून पापणी सुजू शकते.
केसमध्ये कोंडा झाला आहे का?
केसमध्ये कोंडा झाला आहे का? माझ्या मावशीला असा त्रास झाला होता.
सर्वांना धन्यवाद. धाग्याचा
सर्वांना धन्यवाद. धाग्याचा दुवा तिला पाठवते.
अरे वा बघता बघता बरेच विविध
अरे वा बघता बघता बरेच विविध शक्यता आल्या ईथे. माहितीत भर पडली. पण ज्याला सूज आलीय त्याने दुसरया डॉक्टरचा सल्ला घेणेच उत्तम. त्यालाही नाही समजले तर तिसरा डॉक्टर ..
निष्णात डॉक्टरांचा सल्ला घेणे
निष्णात डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम .. ऍलर्जी चा प्रकार असू शकतो . मला हि किवी ची ऍलर्जी होती ..उलट्या , सूज असे प्रकार व्हायचे . डॉक्टर कडे जाऊन काहीच कळले नाही . २ वर्षांनी लक्षात आले . कारण उपवासाच्या दिवशी मी फक्त किवी च खाल्लेले आणि त्रास झाला .. त्यावरून गेस केलं आणि आता जवळ जवळ ९ वर्ष झाली काहीच त्रास नाहीये .
मेकअपची वगैरे अॅलजी असण्याची
मेकअपची वगैरे अॅलजी असण्याची शक्यता कितपत आहे? >>>>यस . माझ्या एका मैत्रिणीला आय शॅडो ने डोळ्याला त्रास झाला होता
नामांकीत डॉक्टर्सचा सल्ला
नामांकीत डॉक्टर्सचा सल्ला घ्यावा
इथे सल्ला किंवा शक्यता विचारणाऱ्यांनी ते केलं नसेल का?
किंवा काही बटव्यातील सोप्पे उपाय करून बरे व्हायचे असा विचार करत असतील का? आणि कुणी काही उपाय सुचवले की मूर्खात काढायचं.
भटकंतीला असलो की जखमेसाठी तुरटीचा खडा, काटा काढण्यासाठी चिमटा आणि तापासाठी दोन परसिटोमोल जवळ ठेवलेल्या असतात. त्यावर निभावून जवळच्या स्टेशन, शहराला गाठणे हे काम असते. नंतरचे रीतसर उपाय करतोच.
नेहमीच्या डॉक्टरांकडे ४-५ दा
नेहमीच्या डॉक्टरांकडे ४-५ दा गेली ती. १७ तपासणीच्या बाटल्या भरुन रक्त घेतलं सर्व तपासण्याकरता. काहीही निष्पन्न नाही, अॅलर्जी नाही. आता दुसर्या डॉक्टरकडे जाऊन पहायला हरकत नाही. सुचवते.
Mala dust mule ashi allergy
Mala dust mule ashi allergy yete
एलर्जीची टेस्ट निगेटिव्ह आली
एलर्जीची टेस्ट निगेटिव्ह आली याचा अर्थ ऍलर्जी नाहीच , असे होत नाही
>>>एलर्जीची टेस्ट निगेटिव्ह
>>>एलर्जीची टेस्ट निगेटिव्ह आली याचा अर्थ ऍलर्जी नाहीच , असे होत नाही +१
Blepharitis is one disease
Blepharitis is one disease causing swelling. Of eyelids
एलर्जीची टेस्ट निगेटिव्ह आली
एलर्जीची टेस्ट निगेटिव्ह आली याचा अर्थ ऍलर्जी नाहीच , असे होत नाही >> आणि पॉझिटिव्ह आली तरी ऍलर्जी आहेच असे नाही की आहेच असं आहे?
१७ तपासणीच्या बाटल्या भरुन
१७ तपासणीच्या बाटल्या भरुन रक्त घेतलं सर्व तपासण्याकरता.
>>>>>>
बापरे.. अॅलर्जीच्या तपासणीला बाटली बाटली रक्त काढतात
कि तपासणीच्या बाटल्या म्हणजे ते ईंजेक्शन ईतके? त्याला म्हणतात का?
एलर्जीची टेस्ट निगेटिव्ह आली
एलर्जीची टेस्ट निगेटिव्ह आली याचा अर्थ ऍलर्जी नाहीच , असे होत नाही >> ह्म्म. अवघड आहे मग शोधणे.
तपासणीच्या बाटल्या >> हो, लहान असतात त्या.
I can’t type in marathi that
I can’t type in marathi that well, so the replay in english.
This could be due to Sinus as one of my friend is suffering from this as well and her dr has diagnosed with the Sinus infection which get spreaded around forehead, eyes and nose. Simple home remedies need to start in winter-If you are in very cold area still house temperature should not go above 65 degrees and in bedroom keep ceramic based small heater along with warm mist humidifier in the night and major is drink lots of water. Along with these remedies for now her dr has advised to take any allergy medicine for 7 days to get the swelling and itchiness in control. Please consult your dr in this direction too if you have any long term underlying cold or if you are prone to sinus infections.
धन्यवाद लवंगी. कळवेन तिला
धन्यवाद लवंगी. कळवेन तिला कारण डोळ्यामुळे ती हे वाचत नसायची शक्यता आहे.