सावित्री

Submitted by अनाहुत on 2 January, 2021 - 23:41

गोष्ट तशी फार जूनी ... तिची सुरुवात होते आजपासून १९० वर्षांपूर्वी ... कसा असेल तो काळ ...

प्रस्थापितांविरुद्ध जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा अटळ असतो तो संघर्ष ... कोणत्याही कालखंडात कुणालाही चुकला नाही तो संघर्ष ... आजही आपण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करतो ... संघर्ष करतो . पण त्या काळी कुणीतरी फक्त स्वतःसाठी नाही तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी संघर्ष करत होत . कसा होता तो संघर्ष ..

ज्ञान कुणालाही मिळू नये, ते फक्त आणि फक्त काही मूठभर लोकांची मालमत्ता बनून राहावी या मानसिकतेविरुद्धचा संघर्ष होता तो ... आणि या मानसिकतेने तिची खूप परीक्षा पाहिली . परीक्षाच ती पण कागद पेन किंवा कीबोर्ड माऊस घेऊन नाही तर दगड , शेण , अत्यंत वाईट शब्दात होणारी अवहेलना यांचा सामना करून द्यावी लागलेली . या सर्वांचा सामना करत तिने आपलं ज्ञानदानाचं पवित्र काम सुरूच ठेवलं . पण हेच काम तेव्हा त्या मानसिकतेसाठी पाप होत . आणि त्यामुळे तिला स्वतःच घरही सोडायला भाग पडलं होत . घर सोडलं पण आपलं हे काम मात्र निष्टेनं चालू ठेवलं . जवळपास अर्ध्या लोकसंख्येला - मुलींना आज उपलब्ध असलेलं शिक्षण हे सहज साध्य झालेलं नाही . ते फक्त पुरुषांपुरतच मर्यादित राहील असत . पण ते तसं मर्यादित राहिलं नाही . त्यासाठी जो मोठा संघर्ष करावा लागला त्या संघर्षाची सुरुवातीची शिलेदार म्हणून धडपडणाऱ्या या गोष्टीच नाव आहे सावित्री .

स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या , विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन .

Group content visibility: 
Public - accessible to all site users