बिल्डर आणि NOC

Submitted by कोब्रा on 25 December, 2020 - 23:16

पुण्यात एके ठिकाणी रिसेल फ्लॅट बघायला गेलो. थोडेफार काम बाकी आहे. पण सर्व फ्लॅट मध्ये रहिवासी राहत आहेत.

प्रोसेस दरम्यान समजले की बिल्डरने प्रोजेक्ट फायनान्स SBI कडून घेतलेले आहे.

बिल्डरच्या NOC मध्ये SBI च्या कर्जाबाबत तसा उल्लेख आहे.

पण SBI NOC देत नाही. कारण बिल्डरच्या एका पार्टनरने back out केले आहे.

अशा ठिकाणी फ्लॅट घेणे सेफ राहिल का?
दुसरे,
समजा बिल्डर कर्ज भरू शकला नाही. तर तेथे अगोदरच फ्लॅट घेतलेल्या लोकांवर याचा काय परिणाम होईव?
याबाबत नक्की कसे कायदे आहेत.

फ्लॅट ची किंमत बरीच स्वस्त असल्याने द्विधा मनस्थिती आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोवर एनओसी मिळत नाही, तोवर फ्लॅट घेऊ नका. टायटल क्लियर नाही एनओसी शिवाय.

आधी ज्यांनी फ्लॅट घेतला असेल, त्यांना एनओसी मिळाली असेल. ज्यांना मिळालेली आहे, त्यांना काहीच अडचण नाही. नसेल, तर त्यावरही एस.बी.आय. हक्क सांगू शकेल.