Submitted by abhishruti on 18 December, 2020 - 05:00

जवळपास पस्तीस वर्षांनी पेन्सिल हातात धरली.... सुरुवात घरातील लोकांवर प्रयोग करून मग सेल्फ पोर्ट्रेटनी केली. मी याविषयातील प्रोफेशनल किंवा ट्रेनिंग घेतलेली व्यक्ती नाही. केवळ छंद होता जो परत गवसला.... ज्यामुळे माझा वेळ छान गेला आणि मनाला उभारी आली. नाहीतर घरात बसून काय करायचं हा प्रश्नच होता. मायबोलीवरील मित्रमंडळींना सुचविल्यामुळे हा धागा काढून मी काढलेली चित्र शेअर करतेय. ब-याच वर्षांनी इथे लिहितेय. चुकभूल द्यावीघ्यावी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुरुवात अगदी एक पेन्सिल,
सुरुवात अगदी एक पेन्सिल, खोडरबर आणि प्रिंटरचे अर्धवट छापलेले पेपर्स यापासून झाली. मग एप्रिल नंतरच्या महिन्यात जाऊन थोडं साहित्य घेऊन आले आणि दर आठवड्याला एकदोन पोर्ट्रेट काढत गेले. मित्रमैत्रिणींच्या आणि घरच्यांच्या प्रोत्साहनामुळे हुरुप आला व पन्नास चित्र काढण्यात यशस्वी झाले. सुरूवातीची काही व आताची लेटेस्ट काही इथे शेअर करते म्हणजे माझा प्रवास व प्रगती समजेल.
(No subject)
माझा मुलगा
माझा मुलगा

माझी मावशी
माझी मावशी

माझी मैत्रीण
माझी मैत्रीण
सुंदर रेखाटन.
सुंदर रेखाटन.
Self portrait
Self portrait

(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
My brother
My brother

सुरेख आहे सगळी चित्रे
सुरेख आहे सगळी चित्रे
खूप सुरेख रेखाटलीत चित्रं .
खूप सुरेख रेखाटलीत चित्रं . कोणतंही ट्रेनिंग न घेता काढलीत ते ही बऱ्याच वर्षांनी . उपजतच छान कला आहे तुमच्या हातात. आता पेन्सिल खाली ठेऊ नका.
चित्रं प्रतिसादात न देता हेडर मध्ये देता येतात का बघा. प्रतिसाद वाढून दुसऱ्या पानावर गेले तर चित्र बघण्यासाठी वाचकांना पुन्हा पहिल्या पानावर यायला लागेल.
छान.
छान.
हेडर मधे इतकी चित्र देता
हेडर मधे इतकी चित्र देता येतील का? एक देऊन पाहते
मस्तच जमली आहेत चित्रं!
मस्तच जमली आहेत चित्रं!
न शिकता एवढी चांगली काढता!
शर्मिला टागोर, शबाना आझमी,
शर्मिला टागोर, शबाना आझमी, केट, सचिन तेंडुलकर, मधुबाला आणि बाकिची चित्रे,त्यांचे हावभाव खूप सुंदर रेखाटले आहेत !!
मस्तच!
मस्तच!
सेल्फ पोर्ट्रेटवरून तसं वाटलं.
तुम्ही नयना आपटेसारख्या दिसता का हो?
शर्मिला टागोर तर अगदी हुबेहूब
शर्मिला टागोर तर अगदी हुबेहूब काढलीत. सगळी चित्रे सुंदर काढलीत. माझ्या लेकीला सुद्धा चित्र काढायला आवडतात. काय ते 'गाचा लाइफ' म्हणून गेम आहे त्यामधील लोक. (खरेतर लोकांचे गाचा अवतार)
धन्यवाद सर्वांना! काही
धन्यवाद सर्वांना! काही टेकनिक्स माहिती नव्हती पण ऑनलाईन पाहिली काही YouTube वर आणि सुरुवातीला चुकत चुकत मग जमायला लागली. त्यात मला kneaded rubber/eraser हा प्रकार अगदी नवीन होता पण तो फार आवश्यक ही वाटला म्हणून DIY मधे दाखवल्याप्रमाणे घरी बनवला.... शेडिंग स्मज करण्यासाठी इयरबड वापरल्या( rather घरातल्या संपवल्या).
नंतर सचिन तेंडुलकर, मदर तेरेसा यांची चित्र त्यांच्या पर्यंत पोचवायचं काम एका दोस्ताने केलं आणि त्यांचा लगेच रिस्पॉन्स आला.... लगेच मूठभर मांस चढलं... Jokes apart पण हरवलेलं काहीतरी सापडलं की काय आनंद होतो ते आता कळलं
परत एकदा धन्यवाद!
नयना आपटे सारखी नाही दिसत पण
नयना आपटे सारखी नाही दिसत पण डोळे मोठे आहेत !! तो जरा अचानक काढलेला गंभीर फोटो आहे.... फारच क्वचित मी एवढा गंभीर चेहरा करत असेन.... पण वेगळा मूड/भाव म्हणून तोच सिलेक्ट केला पोर्ट्रेट साठी
मला कॉलेजला असताना व्यंगचित्र
मला कॉलेजला असताना व्यंगचित्र अचानक जमायला लागली. कसं शिकलो आठवत नाही बहुतेक टीव्हीवर एक प्रोग्रॅम बघितला असेल. पीव्ही नरसिंह राव, व्हीपी सिंग, शरद पवार, नेहरु, इंदिरा गांधी, अटल बिहारी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब, त्यावेळचे क्रिकेटपटू वगैरे यांची व्यंगचित्रे काढायचो फटाफट. ओळखीतील चेहऱ्यात काही विशेष असेल तर त्यांचेही काढायचो.
मग नोकरीच्या वणवणीत कधी वेळ मिळाला नाही.
मग दहा बारा वर्षांनी एकदा प्रयत्न केला जमले नाही. आता तर अजिबातच जमत नाही काही.
लगे रहो.... एकदम नाही जमत
लगे रहो.... एकदम नाही जमत म्हणूनच मी आधीची चित्रं पण पोस्ट केली. मदर तेरेसाचं तर कर्मकठीण वाटत होतं especially because of wrinkles n her calm n composed smile पण हळूहळू काढत गेले आणि जमलं

सुरेख आहेत सगळी चित्रे>>+१
सुरेख आहेत सगळी चित्रे>>+१
मदर टेरेसा एकदम सुरेख.
मदर टेरेसा एकदम सुरेख.
सगळी व्यक्तिचित्र अप्रतिम.
सगळी व्यक्तिचित्र अप्रतिम.
सगळी व्यक्तिचित्र अप्रतिम.
सगळी व्यक्तिचित्र अप्रतिम.
झकास, खूपच सुंदर.
झकास, खूपच सुंदर.
abhishruti मायबोलीवर अनेक
abhishruti मायबोलीवर अनेक वर्षांनी ? पुन्हा स्वागत. वेलकम बॅक.
Pages