लहान मुलांना आस्तिक बनवावे की नास्तिक?

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 December, 2020 - 12:20

आमच्याकडे मी नास्तिक आहे.
आई वडिल बायको तिघेही आस्तिक आणि रीतसर देवधर्म सांभाळणारे आहेत.

पण एक गोष्ट चांगली आहे की जेव्हापासून मला कळायला लागले आहे माझ्या नास्तिकत्वात माझ्या आईवडिलांनी कधी लुडबूड केली नाही.
तसेच जेव्हा मलाही प्रगल्भता आली तेव्हापासून मी देखील त्यांच्या आस्तिकत्वाला काय तो मुर्खपणा अश्या नजरेने बघितले नाहीये.

लग्न झाल्यावर आम्ही दोघांनी देखील हेच धोरण अवलंबवले आहे. एकमेकांच्या विचाराचा आदर करणे.
प्रसाद आहे तर तो खाल्लाच पाहिजे, वा खाल्लास तर मला बरे वाटेल असे भावनिक आग्रह ती कधी करत नाही.
तसेच ज्याप्रकारे तिला सोबत द्यायला म्हणून मी शॉपिंगला जातो, तीच भावना मनात ठेऊन तिला केवळ सोबत द्यायला म्हणून नेहमी तिच्या बरोबर मंदिरातही जातो. भले मग तिथे जाऊन दर्शन न घेता तिच्या चपला सांभाळायचे काम का करत असेना. तिलाही यावर काही आक्षेप नसतो.

मग मुले झाली. त्यांना आपण नेहमीच देवाधर्माबाबत सकारात्मकच सांगतो. जगात देव असो वा नसो, तो त्यांच्या गोष्टीच्या पुस्तकात, कथांत, चित्रपटात, कार्टून कार्यक्रमातही ईत्र तित्र सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे देव हि संकल्पना लहानपणापासूनच त्यांच्या परीचयाची होते. घरातही त्यांचे फोटो, मुर्त्या असतात, ज्यांची रोज पूजा होते. मग तो देव असूही शकतो वा नसूही शकतो हा विचार लहान वयातच त्यांच्या डोक्यात घालण्यात काही अर्थ नाही. बिचारे गोंधळूनच जातील. त्यामुळे मी माझे नास्तिक विचार आजवर कधीच मुलांसमोर मस्करीतही उघड केले नाही. त्यांच्यासमोर कधी अशी चर्चा होऊ नये याचीच काळजी घेतली.
हो, पण उगाच त्यांना जास्तीचे देव देव करायला लावणेही मला पटत नाही. ते सुद्धा आजवर घरात कटाक्षाने पाळले गेलेय.

सध्या नवीन घरात नवीन देव्हार्‍याचे उद्घाटन झाल्यापासून बायकोने आधीच ठरवल्याप्रमाणे रोज संध्याकाळच्या दिवेलागणीच्या वेळी आरती सुरू केली. त्यानंतर मुलगी रोज शुभंकरोती कल्याणम सुद्धा म्हणते. माझ्या वर्क फ्रॉम होमचा त्यावेळेस महत्वाचा टाईम असतो. दिवसभराच्या कामाच्या मीटींग्ज असतात. त्यामुळे मी कामात बिजी असतो. माझे वर्क डेस्क अगदी देव्हाराच्या समोरच आहे. म्हणजे काय गंमत आहे बघा, मी रोज सतत देवाला बघतच त्यासमोर चार फूटांवर बसून काम करत असतो Happy
आणि तरीही मी त्यांच्या पूजा आणि आरतीपासून अलिप्त असतो. लेकीची शुभंकरोती आणि तिला लेकाने दिलेली साथ तेवढी कौतुकाने ऐकतो. प्रामाणिकपणे सांगायचे तर दिवसभर दंगा मस्ती करून घर उठवणारी मुले अचानक गुणी बाळासारखी वागताना बघून छानच वाटते. त्यानंतर आरती झाल्यावर आरतीचे ताट माझ्यासमोर बायको घेऊन आलीच तर स्टाईलमध्ये त्या दिव्यावरून हात फिरवून मग तो डोक्यावरून फिरवतो Happy

परवा मुलगी तिच्या आवडीचे काहीतरी हस्तकला शिल्पकला करत पसारा मांडून बसली होती. बरेच दिवस होमवर्क न केल्याने आधीच मायलेकींमध्ये तणतण झालेली. अश्यात तिच्या आईने आरतीची वेळ झाली म्हणून तिला हाक मारताच तिने नकार दिला. मी लेकीला म्हटले, "जा ग्ग, शुभंकरोती नाही म्हणायचीय का तुला आज.. हे नंतरही करता येईल.."

त्यावर तिचे ऊलट उत्तर आले, तू तर पप्पा रोज आरती चालू असताना आपले काम करत बसतोस. मग मलाच का सांगतो आहेस?

रोज एकूणच हे माझे वागणे मुलं ऑब्जर्व्ह करत असतील असे माझ्या डोक्यातही नव्हते. मला खरेच यावर काय उत्तर द्यावे समजले नाही. उगाच पटकन काही बोलून जायचे आणि मुले तेचा पकडून बसायचे असे नको होते.

मुले आपले बोललेले ऐकत नाही तर अनुकरण करतात याची कल्पना आहे. मग मलाही तिने हे करावे असे वाटत असेल तर माझा विश्वास असो वा नसो मला आरतीला उभे राहावे लागेल का? पण त्याचवेळी असाही प्रश्न पडतो की तिने हे करणे खरेच गरजेचेच आहे का ज्यासाठी मी सुद्धा ते करावे जेणेकरून ती अनुकरण करेल.

जिथे आईबाबा दोघे आस्तिकच वा नास्तिकच असतील तिथे हा प्रश्न कदाचित पडत नसेल असे वाटते. जिथे अशी स्थिती नसते तिथे तुमचे धोरण काय असते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता वर मी जी लिंक दिली आहे ते प्रा. य.ना.वालावलकर हे ठार नास्तिक आहेत. आता विषय निघालाच आहे म्हणून त्यांच्या लेखनाच्या लिंक्स देतो . त्यावरुन त्यांची भूमिका कळेल. लेख आणि चर्चा वाचून दमाल.
यनावालांचे लेखन
अंगारकी चतुर्थी
http://mr.upakram.org/node/3844

गॅस गणराज
http://mr.upakram.org/node/3941

गुरुविण कोण लावितो वाट
http://mr.upakram.org/node/3789

विवेकवाद अध्यात्म आणि आत्मघात
http://mr.upakram.org/node/3719

कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प
http://mr.upakram.org/node/3665

नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स १८९०)
http://mr.upakram.org/node/3645

त्या मोरयाची कृपा
http://mr.upakram.org/node/3597

महाकाव्याचा विषय
http://mr.upakram.org/node/3579

ज्ञानेश्वरील अकरा ओव्या
http://mr.upakram.org/node/3526

चालविली भिंती मृत्तिकेची
http://mr.upakram.org/node/3474

बुद्धीदाता
http://mr.upakram.org/node/3379

अध्यात्मिक प्रवचन
http://mr.upakram.org/node/3356

बिनडोकपणाचा कळस
http://mr.upakram.org/node/3362

देव धर्म आणि गाजरचित्रे
http://mr.upakram.org/node/3323

उदकी अभंग रक्षिले
http://mr.upakram.org/node/3313

अशी एक शक्यता केवळ तर्क
http://mr.upakram.org/node/3276

भयसूचक बातमी
http://mr.upakram.org/node/3216

चंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश
http://mr.upakram.org/node/3161

ईश्वरे तृणे करुन रक्षण केले
http://mr.upakram.org/node/2928

यात आश्चर्य ते काय?
http://mr.upakram.org/node/2883

हा खेळ बाहुल्यांचा
http://mr.upakram.org/node/2820

गूढ आश्चर्यकारक अनुभव
http://mr.upakram.org/node/2525

कार्यकारण भाव
http://mr.upakram.org/node/2503

विवेकवादी लेखनावर आक्षेप
http://mr.upakram.org/node/2580

भ्रमाचा भोपळा
http://mr.upakram.org/node/2388

सामान्य समज (कॉमनसेन्स)
http://mr.upakram.org/node/2450

सदसद्विवेक बुद्धी
http://www.misalpav.com/node/17008

दैव जाणिले कुणी |
http://www.misalpav.com/node/17364

अस्तंगत होणार्‍या अंधश्रद्धा
http://www.misalpav.com/node/21383

शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |
http://www.misalpav.com/node/24886

अध्यात्म-विज्ञान समन्वय ?
http://www.misalpav.com/node/33424

मंत्रसामर्थ्य
http://www.misalpav.com/node/33686

भावना दुखावणे
http://www.misalpav.com/node/33757

माझी भूमिका
http://www.misalpav.com/node/33826

आस्तिक वैज्ञानिक
http://www.misalpav.com/node/33950

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक
http://www.misalpav.com/node/34081

मरणकल्पना, आत्मा, पुनर्जन्म
http://www.misalpav.com/node/34344

श्री.जपे यांचा युक्तिवाद
http://www.misalpav.com/node/34727

विज्ञानदिनाच्या निमित्ताने
http://www.misalpav.com/node/35123

श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान
http://www.misalpav.com/node/41229

अठ्ठावीस लक्ष रुपये
http://www.misalpav.com/node/41400

आनंददायी इहलोक
http://www.misalpav.com/node/41497

श्रद्धेमुळे विकृती
http://www.misalpav.com/node/41567

भाव तेथे(च) देव:......यनावाला
http://www.misalpav.com/node/41667

मानवी ज्ञानभांडार
http://www.misalpav.com/node/41745

श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।.
http://www.misalpav.com/node/41821

विश्वास-श्रद्धा-निष्ठा: यनावाला
http://www.misalpav.com/node/41913

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...
http://www.misalpav.com/node/42032

मूलभूत नीतितत्त्वे
http://www.misalpav.com/node/42134

लहान मुलांना आस्तिक बनवावे की नास्तिक? > मला लहान मुले नाहीत पण झालीच कधी तर त्यांनी चांगला मनुष्यप्राणी बनावे यासाठी मी प्रयत्न करेल आणि त्या प्रक्रियेत ती आस्तिक बनोत की नास्तिक मला फरक पडणार नाही.

आपलं लहानपणापासूनच कंडिशनिंग आणि आपला स्वभाव ह्या दोन गोष्टींमुळे आपण आस्तिक किंवा नास्तिक बनतो. बर्‍याचदा स्वभावाने भित्रे असणारे लोक चटकन आस्तिक बनतात आणि देवाचा आधार शोधतात.
आता एखादा वरून तगडा/ धटिंगण दिसणारा आणि सतत भांडण आणि हाणामार्‍या करणारा माणूसही मनाने भित्रा असू शकतो. आणि कोणाशी तरी भांडण/ मारामारी करून आल्यावरही त्याला देवाचा आधार हवासा वाटू शकतो. समस्या आल्या की देवाचा आधार शोधणं हे जसं कंडिशनिंग तसच भांडण करणं हेही कंडिशनिंगच.
याऊलट मनाने खंबीर असणारे लोक एखाद्या समस्येच्या वेगवेगळ्या बाजू समजून घेतील आणि ती समस्या सोडवताना येणार्‍या भल्या-बुर्‍या अनुभवांना शांतपणे तोंड देतील. मन खंबीर असल्याने वाईट अनुभवांना तोंड देताना त्यांना देवाची गरज भासणार नाही.

लहान मुलांना आस्तिक बनवावे की नास्तिक?
आस्तिक किंवा नास्तिक नंतर बनवा पण त्या आधी त्यांना एक "चांगल माणुस" बनवा.
मायबोलीवरील काही आयडी पहाता त्यांना आधी "माणुस" बनणं किती आवश्यक आहे ते प्रकर्षाने लक्षात येतं.

नास्तिक म्हणजे कोणावर च श्रद्धा नसणार व्यक्ती असा मी अर्थ घेतो.
म्हणजे त्याचा कोणत्याच धर्मातील देवा वर श्रद्धा असता कामा नये.
त्या व्यक्तीचं कोणत्याच धर्मातील तत्व ज्ञान वर श्रद्धा असता कामा नये.
त्या व्यक्ती ची कोणत्याच महापुरुष वर श्रद्धा असता कामा नये.
त्या व्यक्ती नी कोणावर च आंधळी श्रद्धा ठेवता कामा नये अगदी राजकीय नेत्या वर सुद्धा.
नास्तिक व्यक्ती नी फक्त वर्तमान काळातच जगले पाहिजे.
भविष्यकाळ आणि भूतकाळ ह्यांचा विचार सुद्धा त्यांच्या मनात येता कामा नयेत कारण फक्त वर्तमान काळ हाच अस्तित्वात असतो भूतकाळ आणि भविष्य काळ अस्तित्वात च नसतो.
जे अस्तित्वात नाही त्याच्या वर विश्वास त्यांनी ठेवूच नये.
खरे नास्तिक तेच जे प्रतेक प्रसंगात स्वतःच्या बुध्दी चा वापर करतील ,खरे खोटे ठरवतील आणि निर्णय घेतील.

पण असे नास्तिक भारतात अस्तित्वात नाहीत ते एका धर्मातील तत्व ,ज्ञान वर अविश्वास दाखवतील आणि बाकी दुसऱ्या धर्मातील तत्व ज्ञान कसे खरे आहे हे सांगत सुटतील.
आपल्या कडे duplicate नास्तिक आहेत.

विषय निघालाच आहे तर विचारतो. सध्या यूट्यूबवर एक व्हिडिओ आला आहे, पाचा उत्तराची कहाणी नावाचा. ह्यात मुळातली कहाणी न घेता त्यांनी पंचमहाभूते , त्यांचा आपण करत असलेला नाश (प्रदूषण वगैरे) आणि मग त्यामुळे आपलाच विनाश असा विषय घेऊन लहान मुलांना छान समजेल अशी कहाणी सांगितली आहे. सादरीकरण आणि अभिव्यक्तीचा दर्जा उत्तमच आहे. मला प्रॉब्लेम आहे तो त्या कथेतील काही भागाशी. त्यात देवाने अमुक प्राणी निर्माण केले वगैरे सांगितले आहे. कथेत पुढे येणारा वैज्ञानिक मुद्दा हा आधीच्या ह्या भागामुळे अगदीच विसंगत वाटतो.

आता आमची चर्चा अशी झाली, की असं काही सांगणं हे चूकच आहे, की चालतंय? काहींच्या मते पुढे मोठं झाल्यावर मुलांना हे तसंही कळतं की इसपनीती, पंचतंत्र ह्या गोष्टी खऱ्या नसून फक्त लाक्षणिक अर्थाने घ्यायच्या असतात, तसंच ह्या कथेचंही होईल. काहींच्या मते 'देवाने अमुक करणे' हा विषय तितका सोपा नाही आणि तो मनात खोलवर बिंबवला जातो. विषय रंजक बनवण्याच्या नादात चुकीचे विचार पसरवले जातात.

तुम्हाला काय वाटतं?

काहींच्या मते पुढे मोठं झाल्यावर मुलांना हे तसंही कळतं की इसपनीती, पंचतंत्र ह्या गोष्टी खऱ्या नसून फक्त लाक्षणिक अर्थाने घ्यायच्या असतात, तसंच ह्या कथेचंही होईल. >>> कल्पनाशक्तीचा विकास होण्यासाठी या गोष्टी देखील आवश्यक आहेत असे मत मी वाचले आहे. नंतर असे वाघ सिंह काही बोलत नसतात. गोष्ट म्हणुन ठिक आहे. हत्तीचे डोक कस माणसाला बसेल? हत्तीच्या दोक्याचा साईज काय आपला साईज काय? आपले व हत्तीचे डीएनए सारखे असतात का? असे प्रश्न मुलांना पडतात.

अस्तिक नास्तिक ही सोयीसाठी केलेली बाळबोध बायनरी विभागणी आहे. खर तर हा मोठा पट्टा आहे

https://www.youtube.com/watch?v=f911UvxLKn8

या राजीव साने यांच्या इहवादी अध्यात्म या व्याख्यानमालेतील भागात

अस्तिक्य नास्तिक्य श्रद्धा अंधश्रद्धा याबाबत विवेचन

आहे. विशेषत: टाईम 22.57 नंतर. संपुर्ण व्याखानमालाच ऐकण्यासारखी आहे

अस्तिक नास्तिक ही सोयीसाठी केलेली बाळबोध बायनरी विभागणी आहे. >>>>>>सहमत

सर, पहिली लिंक वाचली..बाकीच्या लिंक्स पण वाचतेय.

ते राजीव साने वैचारिक बोलताना बरे आहेत, पण त्यांचं विज्ञानाबाबत ज्ञान थँक्यू आहे! शिवाय स्वतःबद्दल गैरसमज देखील. ज्ञान कमी असण्यात गैर नाही, पण ते कमी आहे हे मान्य न करता जणू आपल्याएवढा कुणी विचारच करत नाही ह्या गोष्टींचा अशा थाटात ते बोलतात. (त्यांनी प्रकाश परिवर्तन वगैरे बद्दल विचारलेले प्रश्न पहा) हे सगळं असूनही त्यांचे काही मुद्दे खरंच विचार करण्यासारखे असतात हे मान्य करायलाच हवं.

ज्ञान कमी असण्यात गैर नाही, पण ते कमी आहे हे मान्य न करता जणू आपल्याएवढा कुणी विचारच करत नाही ह्या गोष्टींचा अशा थाटात ते बोलतात > +१
माझा स्पर्धापरीक्षेत तत्वज्ञान वैकल्पिक विषय होता तेव्हा त्यांना काही पाश्चात्य तत्वज्ञानावर शन्का विचारल्या होत्या ज्यांची असमाधानकारक उत्तरे मिळाली होती पण तरी मी त्यांना फेसबुकवर फॉलो करतो कारण ओकेजनली चांगले पॉईंटर मिळतात ब्रेनस्टोर्मिंगला. त्यांचे एक नवीन पुस्तक आलंय ते वाचायचा विचार करतोय.

असे बनवावे लागत नाही. शिंगं फुटली की आपोआप मुलं रिबेल करतात व पालकांच्या विरुद्ध मार्ग स्वीकारतात. माझे आई-बाबा अजिबात देव देव करत नसत त्यांना तिटकारा होता तीर्थक्षेत्रांचा. मला देवेदेव पुरत नाही.
माझी मुलगी कट्टर नास्तिक आहे.
मी ऐकलेले की आल्टरनेट पीढ्यांत ते बदलत रहाते. जे की आमच्या ३ पीढ्यात सत्य आहे.

@ सामोताई,मी पण देवधर्म न करणारा आहे बराचसा पण अलिकडे आलेल्या काही अनुभवांवरुन असे वाटत आहे की आस्तिक असतो तर आयुष्यात खुप काही करता आले असते.
आस्तिक असणे फायद्याचे आहे इन द लाँग रन.

केशवजी उलट मला वाटते, आस्तिकतेच्या मी घेतलेल्या कुबड्या, अजुनही मला झुगारता येत नाहीत. नास्तिक असते तर माझे आयुष्य अधिक प्रॉडक्टिव्ह झाले असते का? माझा वेळ पुस्तके वाचण्यात निदान अधिक सत्कारणी लागला असता का असे वाटते कारण रोज १ तास तर स्तोत्रे म्हणण्यात जातो Sad
पण मनाला मात्र खूप आधार मिळतो. पण तो आधार आतून आला असता माझ्या आत्मविश्वासातून निर्माण झाला असता तर ... असे वाटते.
______________
राजीव साने यांचे विचार ऐकते आहे. प्रघा या लिंकेबद्दल धन्यवाद.

देवाधर्माबद्दल जर मिनीमल चर्चा आणि श्रम होत असेल, तर मुलं आपोआपच नास्तिक होतात, असे वाटते. आमच्यात तसेच आहे. वडील नास्तिक आहेत, हे आजतागायत त्यांनी बोलून कधीही सांगितले नाही आहे. किंवा त्याअर्थाच मला कधी काही सांगितलं नाही. मात्र डे टू डे जीवनात पण आता पाया पड वैगेरे कधी सांगितले नाही. देवाची कृपा, त्याची करणी अगाध टाइप डायलॉग कधी मारले नाहीत. थोडक्यात,देवाला अनुल्लेखाने मारले. गणपतीच्या पाच दिवसांनी त्यात इतका काही फरक पडत नाही.
आईचा देवावर विश्वास नसूनही ती पूजा अर्चा करते.
पुढच्या पिढयांत अधिकाधिक नास्तिक असणार आहेत.

परिवर्तन हे वर्तुळ सारखे असते.
पहिली लोक नागडी फिरायची,नंतर कमी कपड्यात फिरायला लागली त्या नंतर परिपूर्ण कपडे घालणे हे मॉडर्न समजायला लागले आता परत कमीत कमी कपडे परिधान करणे हे आधुनिक समजले जाते काही वर्ष पूर्वी त्याला मागास समजले जात होते.
भाताचा कोंडा,ज्वारीचा कोंडा पाहिले लोक जेवणात वापरायची मग चपाती, पुऱ्या आल्या आता परत भाताचा कोंडा,ज्वारीचा कोंडा,सडलेले( हातानी) तांदूळ जेवणात वापरणे हे आधुनिक समजले जाते.
ते एक चक्र च आहे.
पाहिले देव देव करायचे काही वर्षांनी देव नाकारला जाईल आणि परत देवाचे अस्तित्व मान्य केले जाईल असे वर्तुळ पूर्ण होईल.

गणितात साइन वेव हे वर्तुळाचेच एक ट्रान्सफॉर्मेशन म्हणून बघता येऊ शकते, त्यामुळे तुम्ही दोघे एकच बोलत आहात. फक्त तुम्ही मांडलेले फलन हे केवळ ३ बिंदूंवर आधारित आहे, जे पुरेसे नाही. कशावरून ते वर्तुळ/साइन वेव आहे? तो स्पायरल (चकली) असू शकतो, ग्रोइंग साइन वेव असू शकते, parabola असू शकतो, एलिप्स किंवा हायपरबोलाही असू शकतो. ह्या सर्वांची फलिते वेगवेगळी होतात.
आता पूर्वीचे लोक नागडे राहायचे आणि आताचेही राहतात - हे उदाहरण घ्या. आताचे लोक ढोबळमानाने नागडे म्हटले तरी ते पूर्वीच्या लोकांसारखेच कपडे घालतात का? दोन्हीची कारणे सारखी आहेत का? आताचे लोक सर्वच प्रसंगी एकच प्रकारचे कपडे घालतात का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं 'नाही' अशीच आहेत. त्यामुळे वर्तुळ पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही किंवा ते होईलच असेही म्हणता येणार नाही. शिवाय इथे एक फलन लागू होते तेच आस्तिकता-नास्तिकतेला लागू होईल हे म्हणणे पण चूक आहे. विश्वाची फलने फारच कॉम्प्लिकेटेड असतात, इतकी सरळसोट कधीच नसतात.

य ना वालावलकर यांचे दोन तीन लेख उघडून वाचले. त्यातून ते आस्तिक आहेत असा माझा निष्कर्ष आहे.
आपण सगळे आस्तिकच आहोत असे माझे मत आहे. नास्तिकता ही देखील देवाच्या अस्तित्वाची संकल्पना नाकारणे या गृहितकावर अवलंबून असते.
हा एक किस्सा मला आवडतो.
ओशोंना (बहुतेक!) एकदा कोणीतरी विचारलं why are you addicted to smoking? त्यावर ओशो म्हणाले "why are you so addicted to non-smoking?" नास्तिकांचे असे होते बरेचदा!
मुले काही वस्तू/पदार्थ नाहीत बनवायला. आस्तिक नास्तिक यात न पडता त्यांना विवेक शिकवा आणि निसर्गाची ओळख करून द्या. They will figure out the rest.

ऋन्मेऽऽष, मला अस वाटत की आत्ता तुम्ही तिला कसलाच फोर्स करू नका. कारण लहान असताना आपल्यावर दुसरे काय सांगतात ह्याचा खूप प्रभाव पडतो पण जसे जसे आपण मोठे होतो आणि तुम्ही म्हणाल्या प्रमाणे प्रगल्भता येते, तेव्हा खरे कळते कि आपण आस्तिक आहोत कि नास्तिक. घरी जर आई बाबा आणि बायको आस्तिक असतील तर मुलगी त्यांचं सुद्धा अनुकरण करेलच. तुम्ही तिला तिचा वेळ द्या. लहान मुल म्हणजे मातीचा गोळा असतो आकार द्याल तसा घडतो. त्यामुळे तुम्ही तिला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी तयार करा. देवासमोर बसून शुभम करोति किंवा बाकीची स्तोत्र म्हणत असेल तर चांगलंच आहे त्यामुळे एकाग्रता वाढते आणि भाषा शुद्ध होते असा विचार करा.

दुसऱ्या धाग्यावर विषय निघाला म्हणून तिथे लिंक द्यायला हा धागा शोधला आणि वाचला... हे बरे झाले.. कारण का माहीत कसे इथले शेवटचे बरेच प्रतिसाद मी वाचलेच नव्हते. काहीतरी कारणास्तव मायबोलीवर नव्हतो वाटते.

Pages