माबो आयडी Athavanitle kahi यांच्या या https://www.maayboli.com/node/77182
धाग्यावरून एक कल्पना सुचली.
लहानपणी आपण घरी/ आवारात/ सोसायटीमधे/ शाळेत किंवा जिथे सोयीचे असेल तिथे दिवाळीत किल्ले बनवले आहे. आता आपल्या मुलां भाचरांसाठी तितक्याच उत्साहात परत एकदा ती मजा घेतली असेल तर इथे शेअर करुया.
यंदाच्या वर्षी केलेल्या किंवा मागील वर्षांच्या दिवाळी किल्ल्याचा फोटो इथे दाखवा. तसेच किल्ले बनवतानाच्या काही खास आठवणी असतील तर त्या पण सांगा.
लेकीला जरा समज आल्या नंतरची हि पहिलीच दिवाळी. म्हणून यावर्षी तिला सोबत घेऊन किल्ला बनवला. मग किल्लेबांधणी सुरु असताना शिवाजी महाराजांच्या, मावळ्यांच्या गोष्टी सांगितल्या. किल्ला पूर्ण झाल्यावर
गडाखाली पायथ्याशी गाव वसवलं, शेती केली. मोहरी, मेथी, गहू पेरले. एकन्दरीत मज्जा केली.
हा आमचा किल्ला
.
आता दिवेलागण झाली की परत फोटो काढणार आहे. आणि जुने लहानपणी केलेल्या किल्ल्यांचे फोटो मिळाले तर ते पण इथे अपलोड करते.
तुमचे पण गड किल्ले येऊ द्यात.
आमची आत्ताशी सुरूवात झाली आहे
आमची आत्ताशी सुरूवात झाली आहे
लेकींना आणि भाचे मंडळींना हाताशी घेऊन किल्ल्याचा सांगाडा बनवलाय .. उरलेला किल्ला उद्या बनवणार.. तयार झाला की फोटो टाकेन
आमचा चालू आहे. मध्येच माती
आमचा चालू आहे. मध्येच माती सम्पल्याने किल्ला बांधकाम स्थगित झालं आहे . उद्या होईल.
सुंदर किल्ले. नवीन पिढी कडून
सुंदर किल्ले. नवीन पिढी कडून महाराष्ट्रातील खऱ्या किल्ल्यांचे संवर्धन नक्कीच होईल.
>>नवीन पिढी कडून
>>नवीन पिढी कडून महाराष्ट्रातील खऱ्या किल्ल्यांचे संवर्धन नक्कीच होईल.<<
याबाबत शाशंक. कारण गेल्या ७३ वर्षांत जे झालं नाहि ते पुढे होण्याची शक्यता नगण्य. माझ्याकरता तरी एव्हढंच समाधान कि महाराष्ट्र इतर राज्य/संस्थानांसारखा मोगल/ब्रिटिश साम्राज्यांसमोर नांगी टाकण्या ऐवजी लढत राहिला, इतरांसारखा तडजोड/तह करत बसला नाहि, कातडि बचावासाठी. महाराजांनी बांधलेल्या गडांच्या नेस्तनाबुतीचं ते एक प्रमुख कारण आहे.
किल्ले बांधायची हौस अजुनहि आहे, हे वाचुन बरं वाटलं. कारण मुंबईत तरी माझ्या माहितीनुसार किल्ले बांधायची प्रथा मोडित निघाली होती. आणि त्याची जागा जायंट* आकाश कंदिल मिरवण्याने घेतली होती.
*जायंट म्हणजे, एखाद्या सोसायटिने एव्हढा मोठ्ठा आकाश कंदिल उभारावा कि तो इंटरनॅशन्ल स्पेस स्टेशन वरुनहि दिसेल...![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जवळपास पूर्ण होत आला आहे..
जवळपास पूर्ण होत आला आहे.. भाचे मंडळींचा उत्साह जास्त काळ नाही टिकला.. आता महाराजांचा फोटो लावणं बाकी आहे
दोघे किल्ले मस्तच!
दोघे किल्ले मस्तच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म्हाळसा तुम्हांला अजून जोमाने किल्ला लढवावा लागेल असं वाटतंय
म्हाळसा तुम्हांला अजून जोमाने
म्हाळसा तुम्हांला अजून जोमाने किल्ला लढवावा लागेल असं वाटतंय >> हो ना.. इथे आमचा सुरूवातीचा उत्साह बघून सोसायटीतल्या इतर बच्चा पार्टीने किल्ला बनवायला घेतला आहे.. आता आमच्या किल्ल्याला काॅम्पिटिशन आहे
All the best
All the best![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर किल्ले !
सुंदर किल्ले !
भाचवंडांचा किल्ला..दरवर्षी
भाचवंडांचा किल्ला..दरवर्षी असाच छान छान करतात. कुठल्याही मोठ्या माणसांची मदत न घेता.
Are va!
Are va!
फारच सुरेख किल्ले !!
फारच सुरेख किल्ले !!
मला किल्ला बनवता येत नाही आणि
मला किल्ला बनवता येत नाही आणि मुलगा खूप मागे लागला होता. (तो लहान आहे पाच वर्षांचा) त्याचे पप्पा बनवून देत नव्हते. मग शेवटी विकत आणते म्हटल्यावर मुकाट्याने त्याचे पप्पा कामाला लागले. ओळखीच्या दुकानदारांकडून पोती आणली. कामगाराला माती आणायला लावली. झेंडे तयार करण्यासाठी क्राफ्ट पेपर आणायला वेळ मिळाला नाही तेव्हा भगव्या कलरची प्रिंट आउट काढली. मावळे आणायला सुद्धा वेळ मिळाला नाही तेव्हा आमच्या शेजारी चुलत सासरे राहतात. त्यांनी त्यांच्या पोरांचे म्हणजे माझ्या दीरांचे लहानपणीचे मावळे जपून ठेवले होते ते दिले. त्यांनी गुलाबी कलरची छोटी घरं सुद्धा बनवून दिली. एकंदर सगळं मनासारखं जमून आलं.
![IMG-20201114-WA0005.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u66012/IMG-20201114-WA0005.jpg)
![IMG-20201114-WA0006.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u66012/IMG-20201114-WA0006.jpg)
![IMG-20201115-WA0000.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u66012/IMG-20201115-WA0000.jpg)
१.
२.
३.
या आणि अशा बालपणीच्या काही सुदंर गोष्टींचा मला असा आनंद नाही घेता आला. पण हे सगळं मुलगा भरभरून अनुभवतोय याचं खूप समाधान वाटते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे काय एकेक मस्त किल्ले
अरे काय एकेक मस्त किल्ले सर्वच.
डोंबिवलीत अजूनही किल्ले प्रथा टिकून आहे.
आमच्या सोसायटीत किल्ला नाही
आमच्या सोसायटीत किल्ला नाही बनवत.
हा मित्राच्या इथला आहे.
(प्रतापगड)
छान किल्ले आहेत सगळ्यांचे..
छान किल्ले आहेत सगळ्यांचे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नौटंकी...किल्ला मस्तच..मुलगा हैप्पी ना झालं तर मग
मस्त झालेत सर्वान्चे किल्ले..
मस्त झालेत सर्वान्चे किल्ले..
@नौटंकी - खूप जबरदस्त झालाय
@नौटंकी - खूप जबरदस्त झालाय किल्ला.... मस्तच एकदम...
@मी चिन्मयी - मस्तच किल्ला, एकदम भौगोलिक!
या आणि अशा बालपणीच्या काही
या आणि अशा बालपणीच्या काही सुदंर गोष्टींचा मला असा आनंद नाही घेता आला. पण हे सगळं मुलगा भरभरून अनुभवतोय याचं खूप समाधान वाटते. >>>>> हाच आनंद मुलांना मोठेपणी आठवत रहातो.कौतुक तुमच्या सासर्यांचे.मुलांच्या लहानपणातील मावळे इतकी वर्षे जपून ठेवल्याबाबत.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाच आनंद मुलांना मोठेपणी आठवत रहातो. >> खरंय देवकी. माझा हाच प्रयत्न असतो.
कौतुक तुमच्या सासर्यांचे
कौतुक तुमच्या सासर्यांचे.मुलांच्या लहानपणातील मावळे इतकी वर्षे जपून ठेवल्याबाबत. >> हो ना. आम्हाला पण खूप कौतुक वाटलं.
सर्वांचे किल्ले एकदम मस्त
सर्वांचे किल्ले एकदम मस्त झालेत.
मस्त आहेत किल्ले सगळे!
मस्त आहेत किल्ले सगळे!
हा आमचा नॉर्वेतला किल्ला, 2°C तापमान असताना केलेला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंदार फोटो दिसत नाहीये.
मस्तच किल्ला आहे.
सर्वच किल्ले आवडले.
सर्वच किल्ले आवडले.
मंदार एवढ्या थंडीत सुरेख किल्ला केल्याबद्दल कौतुक !!
killa indoor thevayacha asel
killa indoor thevayacha asel tar kasa karava? cardboard vaprun.. or any other ideas. Manimyau.. tumhi kasa kelat?
Manimyau.. tumhi kasa kelat..
Manimyau.. tumhi kasa kelat..>>
आमचा यंदाचा किल्ला म्हंटलं तर इनडोअर, म्हंटलं तर आऊटडोअर. जिन्याच्या landing वर बनविलेला आहे. आधी खाली जुने रेनकोटचे कापड अंथरून घेतले. त्यानन्तर रिकाम्या कुंड्या उलट ठेवून arrange करून घेतल्या. गेरू वापरून रंग दिला. त्यासमोर कार्डबोर्ड आडवा लावून त्यावर किल्याचा मुख्य दरवाजा रंगवला. त्यावर 'क्ले'नी डिझाईन बनवली. बाजूच्या कुंड्यावर mugs चे रिकामे खोके ठेवलेत. त्यावर क्राफ्ट पेपरची किल्ल्याची वरची महिरप (तटबंदी) कापून चिटकवल्री. रिकाम्या बाटल्या रंगवून बुरुज बनवलेत. सर्वात शेवटी बाहेरची कागदी भिन्त बनवून लावल्री. किल्ल्यासमोर रेती- माती पसरली. मोहरी गहू, मेथी पेरलीए. बाकीची सजावट जशी सुचेल तशी केली.
हा हळीव पेरलेला
हा हळीव पेरलेला
आणि हा हिरवळ आल्यावरचा
सुपर्ब किल्ला वर्णिता..
सुपर्ब किल्ला वर्णिता..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पणत्या लावल्यावर काढलेला फोटो तर खासच..
हिरवळीमुळे तर एकदम दाटलेले मीनी जंगल वाटतेय
धन्यवाद मृणाली, अस्मिता!
धन्यवाद मृणाली, अस्मिता!
वर्णिता - जबरदस्त झालाय किल्ला!
Pages