हॅपी हेलोवीन डे - कसा साजरा करतात?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2020 - 13:10

वॅलेण्टाईन डे पाठोपाठ आता हॅलोवीन डे ने भारतातील मुंबई पुणे अश्या प्रमुख शहरात शिरकाव केला आहे.
आजवर फक्त अमेरीकेतल्या वा तिथून रिटर्न आलेल्या फेसबूक मित्रांच्याच वॉलवर हेलोवीन साजरा केल्याचे फोटो बघत होतो. पण आता त्याने मुलीच्या शाळेद्वारे आमच्या घरातही प्रवेश केला आहे. कालच मुलीच्या शाळेत ऑनलाईन हॅलोवीन डे साजरा झाला. म्हणजे फार काही नाही तर भूताच्या वेशभूषेची स्पर्धा झाली. आता तिला जेव्हा समजले की खरा हॅलोवीन डे तर ३१ ऑक्टोबरला आहे तर तिला ख्रिसमस प्रमाणेच आता हे देखील सेलिब्रेट करायचे आहे.

हल्ली तर शिवसेनेनेही वॅलेंटाईन डे ला विरोध करणे सोडले आहे. तर हॅलोवीन डे सुद्धा भारतात भरभर रुजायला हरकत नाही. त्यामुळे आपण आपल्या घरी जमेल तसे सुरुवात करायला हरकत नाही असे वाटते. पण नेमके करायचे काय हे माहीत नाही. फोटोतून सारे कळत नाही. तर हा काय काय करत साजरा करता येतो याची माहिती मिळाल्यास आवडेल. धागा आयत्यावेळी काढला आहे याची कल्पना आहे. कारण गरजही तशीच आयत्यावेळी निर्माण झालीय. मात्र जितकी माहिती मिळेल, जितके अनुभव येतील तितके चांगलेच. माहितीचा फायदा येत्या वर्षांमध्येही होईल.

धन्यवाद ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके,असेय होय
डायनिंग टेबल आणि त्यावर पास्ता.

अरे हो, वर जो फोटो टाकलेला, मुलीच्या शाळेतील हॅलोवीन फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा, त्याचा काल निकाल लागला. पोरगी पहिली आली Happy
ईतरांनीही बरेच छान छान मेक अप, मुखवटे, हॉरर साऊंड आणि प्रकाशयोजना वगैरे करून उत्साहात भाग घेतलेला. पण पोरीने सोबत जे बोलीबच्चन दिले त्याने एक्स्ट्रा पॉईटस कमावले वाटते Happy

धन्यवाद हिरा Happy

आता जी संभ्रमात टाकणारी व्हॉटसप पोस्ट वाचनात आलेली ती टाकतो.

व्हॉटसपवर आलेली एक पोस्ट
काही मुद्दे पटले. काही बिलकुल नाही. तर काहींनी संभ्रमात टाकले.
आधी पोस्ट कॉपी पेस्ट करतो. मग माझे लिहितो.

>>>>>

लोकानो आपल्या संस्कृतीत भूत खेत या विषयापासून दूर रहायला शिकवले आहे, त्याविषयी विनाकारण चर्चा कोठेही होत नाही. या विषयाच्या बाबत कोणतीही fantacy आपल्या संस्कृतीत तरी अजिबात नाही. आपल्या च काय भारतात नांदणाऱ्या इतर संस्कृतीत देखील ही संकल्पना नाही. तरीही अचानक नवीन * festival फेस्टिव्हल बर का ! आपल्यावर थोपवला जात आहे. आणि हे कोणासोबत आपल्या घरात येत आहे माहीत आहे ? लहान मुलांमार्फत !

आजकाल शाळेत नवीन फॅड निघाली आहेत, आणि आज जरी ही फॅड आणि फॅशन वाटली तरी थोड्याच काळात भारतीय संस्कृतीचा भाग बनतील. कस ? कारण लहान मुलांना नर्सरी च्या वयापासून ही भुताटकी फेस्टिव्हल आपला वाटू लागेल,मग ते लहान भावंडाना या बाबत प्रोत्साहित करतील पुढे जाऊन त्यांच्या मुलांना सांगतील बाबांनो हीच आपली संस्कृती ! हे सगळं हवंय का तुम्हाला ????????????

माझ्या मोठ्या मुलीच्या नर्सरी च्या वयात यातील कोणतीही गोष्ट शाळेत नव्हती, 2018 पासून अचानक शाळेत याचे गोडवे गायले जात आहेत, पूर्ण आठवडा यात व्यतित होत आहे, हळूहळू महिनाभर याचे सेलिब्रेशन सुरू होईल. लोकानो तुमच्या लहान मुलांच्या शाळेत हे उसने फेस्टिव्हल सुरू झाले असतील तर त्याला विरोध करा, आपल्या संस्कृतीत असे असंख्य सण आहेत जे काही चांगला संदेश देतात.ज्याने मुलांवर चांगले संस्कार होऊ शकतात. परंतु हे कोणतेही आगा पिच्छा नसलेले बिन बुडाचे नवीन फेस्टिव्हल विनाकारण सुरू करू नका.

हा एक छानसा मार्केटिंग फंडा आहे, ज्यायोगे याविषयाशी निगडित भरपूर वस्तू विकल्या जाव्यात. . असाच तो व्हॅलेंटाईन दिवस भारतात आलेला नंतर तरूणाई ला भुरळ घालून करोडोंचा व्यवसाय केला, आता आणि हे एक नवीन भूत डोक्यावर बसवून घेऊ नका. शाळेत असले दिवस साजरे होत असतील तर त्यांना प्रश्न विचारा की यातून कोणते संस्कार होतात बर आमच्या मुलांवर ?? भुतासारखे वागू नयेत म्हणून आम्ही शाळेत घालतो न ? मग आता भूत ही संकल्पना आमच्या कोवळ्या मुलांना माहीत नाही तर त्यांना या निमित्ताने आम्ही का सांगावी ?? सगळे चांगले विषय लहान मुलांना शिकवून संपले का ? की सरते शेवटी हा विषय शिकवायची वेळ आली ??
कोवळ्या मुलांना धड देव ही संकल्पना ठाऊक नसते, नेमकं याच वयात त्यांना भूतखेत यांची संकल्पना शिकवायची ?? का कशासाठी ??

मला वाटतंय आपल्याकडे लहान मुलांना जो भुताचा कन्सेप्ट समजतो तो भीतीदायक असतो. त्यामुळे भूत म्हटलं की जी काय एक भीती मनात बसते ती शेवटपर्यंत तशीच राहते. जर हॅलोविन कन्सेप्टद्वारे हसत खेळत भूत ही संकल्पना मुलांसमोर आली तर त्या भीतीची तीव्रता कमी होण्यास फार मदत होईल.

Halloween साजरा करून actually काय होतं ते माहीत नाही. मागच्या वर्षी आम्ही halloween ला काही केलं नव्हतं.
त्याच्या मागाच्यावर्षी आम्ही मुलाला पमकीन ड्रेस घालून फोटो काढले फक्त. आमच्या तीर्थरूपांना अभारतीय/ अहिंदू सण साजरे केलेले आवडत नाहीत त्यामुळे त्याआधी आम्ही असलं काही करणं अगदीच impossible होतं. ते असो!

यावर्षी halloween साजरा करण्यामागे 2 कारणं आहेत. एक तर जे बोकलत यांनी लिहिलंय ते. मला लहानपणापासून भूत या कन्सेप्टची फार भीती आहे. मी आजही रात्री अपरात्री घरात अंधार करून राहू शकत नाही. घरात 100 लोकं असले तरी. तसं मुलाच्या बाबतीत होऊ नये म्हणून आतापासूनच हे भूत वगैरे is just for fun असं त्याच्या मनात भरण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही halloween साजरा करायला सुरुवात केली.

दुसरं कारण म्हणजे दीड दोन वर्षा आधी आम्ही सगळे friends /नातेवाईक जवळपास प्रत्येक वीकेंडला तासभर तरी का होईना एकत्र जमायचो.वयानुरूप या भेटी कमी होणार हे मान्य आहे पण दीड एक वर्ष त्या पूर्णच बंद झाल्या होत्या त्यामुळे आम्हाला सध्या काहीही कारण काढून एकत्र जमायचं असतं म्हणून आम्ही मिळेल ते सण साजरे करतो.

अगदी या वर्षी ईदच्या / कोजागिरीच्या दिवशी पण एकत्र जमून दूध, खीर, भेळ, फ्रँकी खाल्ली. आता या ईदला खीर करतात का नाही ते माहीत नाही. आम्ही आपलं कारण शोधलं एवढंच.

या वीकएंड ला match हे कारण झालं
त्याच्या पुढच्या वीकेंडला हळलोविन
त्याच्या पुढच्या विकेन्ड्स ला दिवाळी
नंतर माझा वादि पोस्ट सेलिब्रेशन
नंतर एका।मित्राकडे thanks giving चा टाईमपास
नंतर आमच्या घरी बोडण आहे
नंतर माझी नणंद येणार सुट्टीला मग 2-3 वीकेंड फॅमिली गेट अप्स
नंतर ख्रिसमस
नंतर new year
मग नेक्स्ट 2 वीकएंड ब्रेक
मग एका मैत्रिणीचा वादि
मग माझ्या मुलाचा वादि
अँड सो ऑन.....

हे लिहिताना मला लक्षात आलंय की मला पार्टी होस्टिंग जामच आवडतं.

मुलांसा ठी सेफ कँडीज

रीसेस पिन ट बटर कप्स
डेअरीमिल्क चे अगदी छो टे पॅकिन्ग येते ते
मेलनी
बारके किटकेट
कॅडबरीची चॉकोलेट्स
हर्शीज किसेस.

गंमत म्हणून साजरे करायचे. प्रत्येक बाबतीत असहिष्णुता दाखवून काहीही साध्य होणार नाही. जश्न ए रिवाज मनवाच.

टृविटर वर बेडशीट पांघरलेल्या कुत्र्या मांजरांचे फोटो यायला सुद्धा लागले आहेत गेले दहा दिवस. मस्त कॉस्चुम्स बनवले कि नाही?
की कॉस्ट्युम्स Wink

वर व्हॉटसपपोस्ट शेअर केली ज्यात हॅलोवीनला विरोध होता.
आमच्याघरी गेल्यावेळी शाळेतल्या हॅलीवीन स्पर्धेत हौसेने भाग घेऊन झालेला आणि यंदाही करायचा विचार आहे / होता (काही वैयक्तिक अडचणी आहेत)
तर एकीकडे हा स्वतः हे साजरे करणार आणि दुसर्‍यांना साजरे करू नका असे बोलणार अश्यातला भाग नाही. वाचनात काही मुद्दे आले जे चर्चेला घेतले ईतकेच !

भुतासारखे वागू नयेत म्हणून आम्ही शाळेत घालतो न ? >> good joke >>> हे मलाही जोकच वाटले च्रप्स, पोस्ट वाढवायला टाकलेय काहीतरी..

मार्केटींगचा मुद्दा योग्य आहे. गेले दोन तीन वर्षात जसे शाळांमध्ये हे साजरे केले जायचे प्रमाण वाढू लागलेय ते पाहता लवकरच वॅलेंटाईन डे सारखी बाजारपेठ तयार होईल वा नक्कीच त्या दिशेने प्रयत्न चालू आहेत. यात आपले नुकसान की फायदा हे अर्थशास्त्र मात्र मला कळत नाही. काही साजरे करायचे म्हटले की पैसा खर्च करावा लागणारच आणि तो कोणीतरी आपल्याकडून कमावणारच.

भूतांना गंमतीने घेतले की भूताची भिती मनातून निघून जाते हा हॅलोवीनच्या समर्थनार्थ मांडलेला मुद्दा मात्र गंडलेला वाटत आहे.
आमच्याकडे घर घर खेळावे तसे आम्ही भूतभूत राक्षसराक्षस खेळतो, पोरगी स्वतःच चेहरा रंगवून भूत बनते, चित्रविचित्र चाळे करून विडिओ बनवते, ते कसलेसे अ‍ॅप वापरून भूताचे सेल्फी काढणे चालू असते... एकंदरीत भूताला काही ईज्जत देत नाही.
पण तरीही रात्री तिला भूताची स्वप्ने पडायची ती पडतातच. अंधारात भूत येईल ही भिती वाटायची ती वाटतेच. ज जगात लोकांच्या मनातून असे देव नष्ट करणे सोपे नाही तसेच भूत काढणेही अशक्य आहे.
त्यामुळे साजरे करूया, पण यातून भूताची भिती राहत नाही वगैरे या अपेक्षा नको वा तसे उदात्तीकरण नको.

सहिष्णुता-असहिष्णुतेचा मुद्दा काय आपला नेहमीचाच आहे. पण तसेही लहानपणापासून मुंबईत ईद ख्रिसमस गणपती नवरात्र हंडी होळी दसरा दिवाळी महाप्रसाद भंडारा सगळेच सण सर्वधर्मीयांसोबत साजरा करतच लहानाचा मोठा झालोय. त्यामुळे मला या मुद्द्याचे कौतुक नाही. देव मानत नसलो तरी जी मजा सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद खायला येते तीच मजा ईदचा पोसलेला बोकड खायला येते. दोघांची चव स्पेशलच असते Happy

आज शाळेत पाठवला पोराला असे हॅलोवीन बनवून.
पहिलाच हॅलोवीन साजरा करत होता. लॉकडाऊनमध्ये शाळा हरवलेला पोरगा चारचौघात मिसळून मजा करत होता.
हे फोटो शाळेत जाण्यापूर्वी घरी काढलेले आहेत.

1635538932699.jpg

Cute photo . Hope baby has fun. Merge dragons has a game event with halloween theme. Playing that over the weekend.

फेसबूक मेमरीमध्ये आज गेल्यावेळचे हॅलोवीन आले.
या वर्षी मुलाच्या शाळेत पालकांनीही जायचे आहे.
त्याच्यासोबत रॅम्पवॉल्क करायचा आहे आणि मास्क बनवायची ॲक्टीव्हिटी आहे.
आमच्याकडे रॅम्पवॉल्क मी करू शकतो. पण मास्क बनवणे नॉट कप ऑफ माय टी म्हणून बायकोला म्हटलेय दोघे जाऊया. मी पोरासोबत वॉल्क करेन आणि तू मास्क बनव. पण बायकोने नकार दिल्याने आता मास्क बनवायला लेकीला घेऊन जायचे ठरलेय.
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पोस्ट सेलिब्रेशन आहे.

फेसबूक मेमरीमध्ये आज गेल्यावेळचे हॅलोवीन आले.
या वर्षी मुलाच्या शाळेत पालकांनीही जायचे आहे.
त्याच्यासोबत रॅम्पवॉल्क करायचा आहे आणि मास्क बनवायची ॲक्टीव्हिटी आहे.
आमच्याकडे रॅम्पवॉल्क मी करू शकतो. पण मास्क बनवणे नॉट कप ऑफ माय टी म्हणून बायकोला म्हटलेय दोघे जाऊया. मी पोरासोबत वॉल्क करेन आणि तू मास्क बनव. पण बायकोने नकार दिल्याने आता मास्क बनवायला लेकीला घेऊन जायचे ठरलेय.
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पोस्ट सेलिब्रेशन आहे.

आमच्याकडे हॅलोवीन असा साजरा झाला.
पोरांनी आपणच आपली तोंडे रंगवून घेतली.
सध्याच्या शाळेत हॅलोवीन फेलॉवींन काही नसते. सोसायटीत सुद्धा नसते. त्यामुळे ट्रिक ऑर ट्रीट वगैरे इच्छा असूनही करता आले नाही.
तरी सण साजरा करावा तो खाऊन पिऊन म्हणून थोडे खाण्यापिण्याचे पदार्थ ऑर्डर केले. आणि भूताच्या गेटअप मध्ये नाचून घेतले.

IMG_20231102_114334.jpgIMG_20231102_114358.jpg

धन्यवाद Happy

अजून येउद्या हॅलोविन चे फोटोज..!!
>>>
+७८६
स्टेटसवर दिसत होते बरेच लहान मुलांचे..
मजेशीर प्रकार आहे.. वाढायला हवा. असे घरच्याघरी किंवा मोजके जणात करायला मजा आली तरी मोठ्या ग्रूप ने करायला जास्त मजा येईल.

पटले म्हणून शेयर केले आहे. ही विकृतीच आहे, उत्तेजन अजिबात देवू नका. हिंदू मांगल्याचे उपासक आहेत.

आमच्या पुण्याच्या घरी सोसायटीतील काल‌ काही लहान मुलं हॅलोवीनचे भुतांचे चेहरे रंगवून "ट्रिक ऑर ट्रीट" असं म्हणत कँडीज मागायला आली‌ होती. त्यावर सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर त्यांच्यातल्या काही मातांनी, "अवर हॅलोवीन गँग, सो क्यूट!" असे‌ फोटो टाकले.

आज सकाळी त्याच ग्रूपवर त्याच फोटोंच्या खाली एका पुणेरी एकारान्त काकांनी हा मेसेज फॉरवर्ड केला. शेवटचे दोन परिच्छेद तर विशेष धमाल‌ आहेत.

असं मनोरंजन फक्त पुण्यातच मिळू शकतं!

"हल्ली गेल्या काही वर्षात हॅलोविन नावाचा विदेशी बिनडोकपणा हिंदूंच्या घराघरात शिरतो आहे...
हाडके, घुबडे, फ्रँकस्तीन, भुते, हडळ ह्यांचे चेहरे, जळमटे, कोळी घरात लावायचे आणि म्हणायचे happy haloween!!

हिंदूंचा आनंदमय दीपोत्सव साजरा करताना घरातले अमंगल, दारिद्र्य बाहेर जावो.. मंगलमय, लक्ष्मी सोनपावलांनी घरात येवो असे म्हणायचे आणि
दिवाळी नंतर हॅलोविनच्या मूर्खपणाच्या नावाने तीच घाण घरात परत घरात आणायची..??
आधी सर्वांगसुंदर सुख- समृद्धीचे प्रतीक नवीन कपडे घालून लक्ष्मी पूजन करायचे पाडव्याच्या दिवशी देवळात जाऊन
"अज्ञानत्व हरोनी बुद्धि मती दे आराध्य मोरेश्वरा
चिंता,क्लेश,दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी"
अशी प्रार्थना म्हणायची
नंतर थोड्या दिवसात भुतखेतांचे ड्रेस घालून हिंडायचे आणि त्यांना घरात घेऊन यायचं ही कसली अवदसा आहे??
मुलांना मुंज केल्यावर दोन घरी भिक्षेला जायला लाज वाटते आणि भुतांची चेहरे रंगवून घरोघरी चॉकलेट मागत फिरतात ..ही कसली विकृती साजरी करत आहोत??
आपली मुले हे प्रकार करत असतील त्याचं मूर्खासारखे कोडकौतुक न करता चांगले बदडून काढा.. आणि जे कोण हे करायला उद्युक्त करत असतील त्यांना चांगला दम द्या.. आणि आठवण करुन घ्या आपण थोड्या दिवसांपूर्वी हिंदू धर्मात होतो म्हणून मंगलमय दिवाळी साजरी केली..

परत जर हे प्रकार मुलांकडून करायला लावले तर तुमच्या दारात श्राद्धाचा स्वयंपाक, मिर्चीलिंबू, काळी बाहुली, पत्रावळीवर गुलाल घातलेला भात असं सगळं आणून ठेवू. हिंदूंमध्ये भुताखेतांची कमी नाही जी विदेशी भूत आयात करायची गरज पडते आहे"

लेखक अज्ञात
फेसबुकवरून साभार ....

वरील पोस्टमधील पहिले आणि शेवटचे वाक्य विरोधाभास दर्शवत आहेत.

१) ही विकृतीच आहे, उत्तेजन अजिबात देवू नका. हिंदू मांगल्याचे उपासक आहेत.

२) तर तुमच्या दारात श्राद्धाचा स्वयंपाक, मिर्चीलिंबू, काळी बाहुली, पत्रावळीवर गुलाल घातलेला भात असं सगळं आणून ठेवू. हिंदूंमध्ये भुताखेतांची कमी नाही
..

बाकी पोस्ट पटली.

Pages