चांगल्या सवयी दीर्घकाळ कशा टिकवाव्यात?

Submitted by केअशु on 20 October, 2020 - 09:03

बर्‍याचदा आपण आपल्या व्यक्तिमत्वात काही चांगला बदल घडवण्याच्या उद्देशाने काही नवीन सवयी लावू पाहतो.जसे की दररोज पहाटे उठून व्यायाम करणे किंवा दररोज किमान २० मिनिटे मेडीटेशन करणे किंवा दररोज ठराविक अंतरापर्यंत सायकल चालवणे इ. असे बरेचसे बदल उपक्रम असतील आणि बरेच लोक तो ठरवत असतील.पण हे उपक्रम दीर्घकाळ टिकवणे सोपे नसते.२-३ दिवसात त्याचा कंटाळा येतो आणि तो उपक्रम सोडून द्यावासा वाटतो; किंवा मधेच काही कारणांनी खंड पडतो आणि पुन्हा तो उपक्रम सुरु करणे टाळण्याकडे मनाचा कल असतो किंवा पुरेशी मानसिक ऊर्जा नसल्याने पुनश्च हरिअोम होत नाही.

असे का होते? या उपक्रमांमधे रंजकता नसल्याने असे होते का? प्रत्येक उपक्रम रंजक बनवणे शक्य आहे का? कशी आणावी रंजकता उपक्रमांमधे?

तुम्ही कधी या अशा प्रकाराला सामोरे गेला आहात का? एखादा चांगला पण तुमचे पेशन्स बघणारा उपक्रम तुम्ही मधेच सोडून दिलात किंवा बाह्य कारणांनी त्यात खंड पडला असेल तर तो परत सुरु करणे आणि दीर्घकाळ चालवणे तुम्हाला जमले का? तुम्ही हे कसे साध्य केलेत?
या विषयावर काही पुस्तके किंवा साईटस् ,अॅप्स असतील तरी सुचवाव्यात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगल्या सवयी दीर्घकाळ टिकवायला त्या दीर्घकाळ अमलात आणणे हा एकच मार्ग असतो.
त्याबरोबरच वाईट सवयी सोडायला दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतात . उदा - मला कॉलेजकाळात वासुगिरीचा छन्द जडला होता जो मोडायला बरेच प्रयत्न करावे लागले. आता तो छंद फार वाईट होता अशातला भाग नाही पण पण दुसऱ्या कंस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी जसे व्यायाम,रनिंग,बॉक्सिंग जोपासायला सुरुवात केल्यावर त्यात वेळ जायला लागला आणि हा मागे पडला.
NLP(Neuro-linguistic programming) हा प्रकार उपयोगी पडतो असे काही लोकांकडून ऐकलंय पण मला त्याचा वैयक्तिक अनुभव नाही.

वाचनासाठी : Grit : The power of passion and perseverance. - Angela Duckworth.
खुप उपयुक्त पुस्तक आहे.

व्यायाम न बुडण्यासाठी मी एक उपाय करतो. काय वाट्टेल ते झाल तरी एकही दिवस गॅप न पाडणे. कंटाळा आल्यास व्यायाम बदलून बघणे. हे सगळीकडेच वापरता येइल.

मला सकाळी लवकर उठायचा कंटाळा आहे
खूप प्रयत्न करून झाले काही दिवस नेमाने उठतो पण परत ढेपळतो
काही लोकं सवयीने सहा वाजता उठून बसतात कितीही उशीर झाला झोपायला तरी
मला एकदाही असे कधी झालं नाहीये
मुळात आता झोप बास असे कधी वाटतच नाही

करोनामुळे सात ते आठ महिन्यांपासून जीम बंद असल्याने खरतरं गेल्या चार वर्षापासून रोज सकाळी जीममध्ये व्यायाम करण्याच्या सवयीवर गदा आली. संचारबंदी शिथिल झाल्यावर आता रोज सकाळी एक तास चालायला जाते. आता जीम कधी चालू होतील ह्याची आतुरतेने वाट बघतेयं..
माझ्यासाठी मी एक नियम बनविला आहे दिवसातून कमीत-कमी एक तास आपल्या व्यायामासाठी राखून ठेवायचा. कधी- कधी काही कामांमुळे किंवा इतर कारणाने त्यात खंड पडला तरी दोन- तीन दिवसांनंतर मला परत माझ्या ह्या उपक्रमाची ओढ लागते. ज्या वेळेत चालणे किंवा जीमला जाणे असते त्या वेळेत मला घरात असताना दुसऱ्या कामात लक्ष लागत नाही. एवढा अंगवळणी पडलायं माझा चालण्याचा आणि जीमला जाण्याचा उपक्रम..
आपण काही ठरविलेल्या उपक्रमातून आनंद आणि मानसिक समाधान मिळत असेल तर त्यात आपण गुंतून जातो, हा माझा अनुभव आहे. त्यासाठी काही अभ्यास करण्याची गरज लागली नाही. ज्या सवयी म्हणा किंवा उपक्रम म्हणा, ज्याचे चांगले परिणाम आपल्या मनाला आणि शारिराला जाणवतात त्या चांगल्या गोष्टी करायला मेंदू आणि शरीर नेहमीच आज्ञा देत राहते.

२१ दिवस सतत।एखादी चांगली गोष्ट करा पण आयुष्यभर सवय राहते असं म्हणतात.
(Note: ह्याचा मला उपयोग झाला नाही, सकाळी उठणे, morn run etc मी २ महिने करून सोडून दिलं आहे.)

काही लोकं सवयीने सहा वाजता उठून बसतात कितीही उशीर झाला झोपायला तरी
मला एकदाही असे कधी झालं नाहीये
मुळात आता झोप बास असे कधी वाटतच नाही...
अगदी same here.. माझेच शब्द आहेत हे

आशुचँप, मला लवकर उठायची सवय आहे माहेरी गेल्यावर कितीही वेळाने उठायच ठरवलं तरी रोजच्या वेळी उठतेच...

उदा - मला कॉलेजकाळात वासुगिरीचा छन्द जडला होता जो मोडायला बरेच प्रयत्न करावे लागले.
>>>>

वासुगिरी म्हणजे मुलीच्या वा मुलींच्या मागे फिरणे का?
आमच्याकडे याच कारणासाठी माझ्यासह कित्येक जण थंडीतही सकाळी उठून डोंगरावर व्यायामाला जायचे Happy

पण येस्स, हे मोटीवेशन फार काळ टिकत नाही. आपल्याला कोणी गवत टाकत नाही हे लक्षात आल्यावर त्या जोडीने व्यायामाची लागलेली चांगली सवयही मागे पडते.

<< तुम्ही कधी या अशा प्रकाराला सामोरे गेला आहात का? >>
काय काय करायचे आहे, याची चेकलिस्ट बनवणे. आणि मग सगळ्यात कंटाळवाणे काम सुरुवातीला करून संपवून टाकणे. माझ्या बाबतीत बऱ्यापैकी उपयुक्त ठरले आहे.

ऋन्मेष, ती प्रवेशिका लेव्हल झाली फक्त. पुढे विशारद लेव्हलपर्यंत प्रवास असतो.....जाऊद्या आता गेलीये वेळ निघून.

मला कुठे जायचं असलं की म्हणजे नावडती कामं करायची असल्यास जसे की ऑफिसला जाणे, कामानिमित्त दुसऱ्या शहरात जाणे असल्यास सकाळी उठावसं वाटत नाही. असं वाटत मरू दे ते काम झोपू आपण. आणि त्या कंडिशनमध्ये झोपही अशी लागते की विचारू नका. उठल्यावर डोळे सारखे बंद होत असतात. पण तोच जर सुट्टीचा दिवस असेल तर पहाटे लवकर जाग येते आणि पुन्हा झोप नाही लागत.

काही लोकं सवयीने सहा वाजता उठून बसतात कितीही उशीर झाला झोपायला तरी
मला एकदाही असे कधी झालं नाहीये
मुळात आता झोप बास असे कधी वाटतच नाही..>>>> अगदी अगदी. पण काय करावं ते कळत नाही. मला काही करुन लवकर उठायची सवय लावायचीच आहे. तेच सूर्यनमस्कार च पण. काही दिवस करते परत खंड पडतो. लॉकडाउन इफेक्ट , Sad

जर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं असेल तर बेस्ट उपाय म्हणजे गजर आपल्यापासून दूर ठेवणे. गजर बंद करण्यासाठी 20-25 पावलं चालायला लागलं की आपोआपच झोप उडते. फक्त घरातल्यांना सांगून ठेवायचं मी कितीही काहीही बोललो तरी तुम्ही गजर बंद करायचा नाही.

तर बेस्ट उपाय म्हणजे गजर आपल्यापासून दूर ठेवणे.
>>>

मग आपण सोडून घर उठते आणि शिव्या खाव्या लागतात
स्वानुभव Happy

बोकलत अहो मी सकाळी उठतो
भुभु ला त्याच्या बाउल मध्ये फूड देतो आणि परत झोपतो
पावले अक्षरशः मंतरल्यासारखी गादीकडे ओढत नेतात

मला सकाळी लवकर उठायचा कंटाळा आहे
खूप प्रयत्न करून झाले काही दिवस नेमाने उठतो पण परत ढेपळतो
काही लोकं सवयीने सहा वाजता उठून बसतात कितीही उशीर झाला झोपायला तरी
मला एकदाही असे कधी झालं नाहीये
मुळात आता झोप बास असे कधी वाटतच नाही>>>>>>>>>>>>>>>> ओह सेम मी पण अज्जिब्बात लवकर उठू शकत नाही. १२ ला झोपून सवयीने ५-६ ला उठणार्‍यांना सलाम. रात्री हवं तितकं जागू शकते.

गेम थिअरी आणि चांगल्या-वाईट सवयी यावर हा छोटा लेख आहे.
https://www.psychologytoday.com/gb/blog/science-choice/201611/applying-g...
गेम थिअरीचा आपल्या जीवनात उपयोग कसा होऊ शकतो यावर "थिंक स्ट्रॅटेजिकली" हे फारच छान पुस्तक आहे. प्रिन्स्टन चे प्राध्यापक अविनाश दीक्षित यांनी लिहिलेले आहे. नोबेलच्या शर्यतीत यांचे नाव बऱ्याचदा येते.

पूर्वी मी पण असाच होतो. मग मुलं झाली. त्यांच्या शाळा चालू झाल्या. मग चाळिशी आली. आता रोज सकाळी सातला जाग येते. मग बाबा बंगालीकडे गेलो. त्यांनी मार्ग दाखवला. आता सातला जाग येणे बंद झाले. साडे सहाला येते. Wink

माझ्या सारखेच आहेत बघून बरं वाटलं
आमच्या सायकलिंग ग्रुप मध्ये सगळे असले पहाटे उठणारे राक्षस आहेत
ऊन वारा वादळ पाऊस काहीही असो
पहाटे उठतात सायकलिंग करतात रुपाली ला भेटतात
मला जाम हेवा वाटतो या लोकांचा
मी निशाचर आहे, मला रात्री कितीही काम असलं तरी चालतं पण पहाटे उठून आमरस खा म्हणलं तरी मी म्हणेन माझ्या वाटचा फ्रीज ला लावा उठल्यावर खाईन Happy

मी पहाटे उठणे अनिवार्य असेल तर रात्री झोपतच नाही
सायकल राईड किंवा अगदी हाफ मॅरेथॉन धावलो होतो तेव्हाही निवांत जागा राहून पहाटे गेलो
मग आल्यावर अनुशेष भरून काढला
हे योग्य नाही, तब्येतीच्या दृष्टीने माहिती आहे
पण कळतंय पण वळत नाही असा प्रकार
सगळे प्रकार करून झाले लवकर झोपणे, झोपताना दूध पिणे, झोपायचे संगीत ऐकत पडणे पण काहीही केलं तरी असं टक्क जाग आलीये असं होतच नाही
गजर वाजल्यावर एकच विचार मनात येतो
खरंच इतकं आवश्यक आहे का उठणे?

आशुचँप, माझा पण सेम प्रॉब्लेम आहे. तो मी एका उपायाने काही अंशी कमी केला आहे.
चहा किंवा कॉफी दुपारी 3 किंवा फार तर 4 नंतर न घेणे हा तो उपाय.
ज्या दिवशी नक्की लवकर उठायचे असते त्याच्या दोन दिवस आधीपासून मी दुपारचा चहा बंद करते किंवा 3 च्या आधी घेते. त्यामुळे पहाटे उठले तरी माझी झोप पूर्ण झाल्यासारखे वाटते.

ओह हे करून पाहिलं पाहिजे
मी संध्याकाळी रन/वॉक करून आलो की नाष्टा करतो आणि त्यावर स्ट्रॉंग कॉफ़ी पितो

हळद दूध घेऊन पाहिलं पाहिजे काही दिवस

ज्या दिवशी नक्की लवकर उठायचे असते त्याच्या दोन दिवस आधीपासून मी दुपारचा चहा बंद करते किंवा 3 च्या आधी घेते. त्यामुळे पहाटे उठले तरी माझी झोप पूर्ण झाल्यासारखे वाटते.>>>>>>>>>>>> ओहो पिनी माझं तर कंप्लिटली उलटं होतं . मी १-२ वेळा निरिक्षण केलेय. मी जेव्हा जेव्हा दुपारी ४ वाजता आणि परत ७--८ वाजता चहा घेतला त्या दिवशी हमखास ५-५.३० वाजता जाग आलीये आणि अगदी फ्रेश वाटलंय. पण शेवटी मानसिक आळशीपणा आड आल्याने परत ६.३० पर्यंत झोप येईल म्हणून लोळत होते. पण दुपारी ऑफिसमधे अस्से डोळे मिटायला लागले की ज्याचं नाव ते Proud सो आता जेव्हा लवकर ऊठायचे असेल तेव्हा असे करुन पाहावे Lol

आशु,
३ नंतर चहा कॉफी अवॉईड करण्याबरोबरच अजून एक थंब रूल.
प्रत्येक स्लीप सायकल साधारणतः ९० मिनिटांची असते. झोपेची वेळ आणि ऊठायची म्हणजे गजराची वेळ ह्यात
दीड, तीन, साडेचार, सहा, साडे सात किंवा नऊ तास असे ९० मिनिटांच्या ईंटरवल मध्ये अंतर हवे. जर गजर साताव्या किंवा आठाव्या तासाला स्लीप सायकलच्या मध्येच झाला तर ऊठणे फार अवघड होते आणि आपण स्नूझ करतो. ऊठले तरी पुरेशी झोप झाली नसल्याचे सतत वाटत रहाते.

लॉल. पहाटे उठले की माझे पण डोळे दुपारी मिटायला लागतात.
मग मी माबो वरच्या राजकारणाच्या चर्चा वाचते. आणि मग झोप हळूहळू उडते.

आशुचँप, हा सेम पहाटे उठण्याचाही माझा उपाय आहे. उठल्या उठल्या अशा चर्चा वाचल्या की डोळे छान उघडतात.
Proud Light 1

राजकारण बाफ वर लिहिणाऱ्या सर्वांनी हलके घ्या. पण तिथे इतक्या तावातावाने लिहिले असते की विनाकारण चेव चढतो. विशेष म्हणजे सगळ्यांच्या बऱ्याच गोष्टी पटल्याने आपले मत काय आहे यात कन्फ्युजन होऊन डोके चालायला लागून झोप पूर्ण उडते.
Lol

>>दीड, तीन, साडेचार, सहा, साडे सात किंवा नऊ तास असे ९० मिनिटांच्या ईंटरवल मध्ये अंतर हवे >> हे असं सायकल अ‍ॅपल वॉचचं मार्केटिंग करायला केलेलं तर नसेल??
डिश वॉशर लावून, पोरांना नाईट टाईम स्टोरी वाचुन दाखवुन, नेटफ्लिक्स सर्फ करुन, तात्याचे लेट नाईट कॉमेडी व्हिड्यू बघुन (बरं, काही आवडलं तर मग अजुन एक अजुन एक एपिसोड करत) झोपायची वेळ १० ते दीड अशी हिंदोळ्यावर असते. परत हे सायकल झोप लागल्यावर चालू होणार. पलंगावर पडल्यावर झोप लागत्येय असं वाटलं की पटदिशी नव्वदाचा पाढा म्हटला आणि त्यात झोप गेली की परत पंच्चावन्नंचा पाढा म्हणायला लागेल. Proud स्लीप टाईम प्रोग्रॅम शिवाय नव्वदीच्या समेवर येणं काही येरागबाळ्याचं काम दिसत नाही. Proud

हो ना झोप नक्की किती वाजता आली हे कसं कळणार
त्या आधीच कसा अलार्म सेट करणार
काही लोकं ठरवून झोपतात आणि दहाव्या मिनिटाला घोरायला पण लागतात
हेही अमाप सुखी गटात मोडतात Happy

Pages