बीट टोमॉटो चकली

Submitted by ShitalKrishna on 27 September, 2020 - 10:55
beet tomato chakli

काल नवीन जाड बुडाची स्टिलची कढई घेऊन आले.. खास तळण्यासाठी, 1.5 लिटरची, खोलगट, त्या निमित्ताने.. आज चकली..

साहित्य:
चकली भाजणी २ वाटी,
तेलाचे मोहन पाव वाटी,
बीट १, टोमॉटो २,
मीठ १ चमचा, हिंग पाव चमचा, लालतिखट १ चमचा, हळद पाव चमचा, ओवा अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, पांढरे तीळ १-२ चमचे,
लागले तर पाणी,
तळणी साठी तेल.

कृती:

१. बीट तुकडे थोडंसं पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक करून घेणे आणि गाळून रस काढून घेणे.
२. याप्रकारे टोमॉटोचा (पाणी न घालत) रस काढून गाळून घेणे.
३. भाजणी मध्ये मीठ, हिंग, हळद, लालतिखट, जिरे, ओवा, पांढरे तीळ घालून एकसारखे करा.
४. कडकडीत मोहन घाला आणि एकसारखे करा
५. बीट टोमटो रस घालून घट्टसर मळून घ्या.
६. थोडे थोडे मळलेले पीठ घेऊन, जरासा पाण्याचा हात लावून चकल्या करा.
७. मध्यम आचेवर तळून घ्या.

हे घ्या फोटू..

IMG_20200927_194918 (1) (1).jpg

संयोजकांनी पाककला स्पर्धेसाठी नियम ठेवलेले स्टेपवईस फोटो हवेत, त्यामुळे आता काही नवीन करताना फोटो काढायचा प्रयत्न करते..

IMG20200927194736_0.jpg

शेवगा, साच्यात राहिलेल्या पिठाच्या.. शेंगोळे टाइप बेबी चकली

IMG20200927195456 (1).jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Disclaimer..
१. चकली भाजणी चांगली असेल तरच चकली खुसखुशीत होईल, तुमच्या भाजणीच्या चकल्या खुसखुशीत होतं नसतील तर... Proud Proud Proud

२. पोरांच्या अपेक्षा वाढतात.. माझ्या मुलीला आता रेनबो चकली पाहिजे.. Uhoh