कुत्रा नैसर्गिकरीत्या शाकाहारी. मांसाहारी की मिश्राहारी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 September, 2020 - 11:32

शाकाहारी मांसाहारी जोडप्यांच्या धाग्यावर विषय निघाला. कुत्रे हे नैसर्गिकरीत्या मांसाहारी असतात तर माणसे नैसर्गिकरीत्या शाकाहारी. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेने तो धागा भरकटू नये शाकाहार-मांसाहार एकाच घरात करत सुखाने नांदत असलेल्या जोडप्यांमध्ये वादाची ठिणगी पडू नये म्हणून हा स्वतंत्र धागा.

सिंह हा शुद्ध मांसाहारी समजला जातो कारण तो फक्त आणि फक्त मांस खातो. घासफूस खात नाही.

गाय बकरी या शुद्ध शाकाहारी समजल्या जातात कारण त्या फक्त चरतात. मांसाहार कुठल्याही स्वरुपातला करत नाहीत.

माणूस हा शाकाहार मांसाहार दोन्ही करतो म्हणून मिश्राहारी समजला जातो. अर्थात काही लोकांच्या मते माणूस मांस शिजवून खातो म्हणून तो नकली मांसाहारी असल्याने त्याला मिश्राहारी म्हणू शकत नाही.
आता माणूस भाज्याही शिजवूनच खातो ती गोष्ट वेगळी. आणि काही लोकं अंडे कच्चेही खातात ती गोष्ट वेगळी.
पण एकूणातच माणूस नैसर्गिकरीत्या शाकाहारी, मांसाहारी की मिश्राहारी हा वाद आजही कायम आहे. सायन्स आजही याचे उत्तर शोधतेय.

कुत्र्याबाबत देखील तो नैसर्गिकरीत्या शाकाहारी, मांसाहारी की मिश्राहारी हा नवीन प्रश्न उद्भवलाय. वर्षानुवर्षे त्याला माणसांनी पाळलेलाच पाहिले आहे. बरेचदा जे मालक खातो तेच त्याला दिले जाते. मग मालक शाकाहारी तर कुत्रा शाकाहारी, मालक मांसाहारी वा मिश्राहारी तर कुत्र्याच्या नशिबी तेच खाणे. अगदी कुत्र्याला बिस्कीटेही खाऊ घालतो आपण. आमचे जुने शेजारी टमाटर कुस्करून खाऊ घालायचे.

निसर्गाने मूलत: कुत्र्याला काय खायला बनवले आहे हा प्रश्न पडावा ईतका गोंधळ आज लोकांमध्ये बघायला मिळतो.

म्हणजे समजा माणसे कुत्र्यांना पाळतच नसते तर त्यांनी आपले अन्न कसे मिळवले असते आणि काय खाल्ले असते? कधी केलाय असा विचार?
आज करून बघा....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl
आतड्याची लांबी मोजायला फिजिक्स वापरता येईल हे अजिबात लक्षात आलं न्हवतं.
आता यात इनपुट आणि आउटपुट बफर साईझ कमी जास्त करुन ती कशी मॅटर करते ही अ‍ॅडीशन मी कंप्युटर इंजि./ नेटवर्किंग कोणाला समजावुन सांगायचं असेल तर करणारे. Biggrin

माझी ऊंची जवळपास सहा फूट आहे तिथे आतडे २० फूट कसे असेल? फिरकीला मांजा गुंडाळावे तसे बरगड्यांभोवती गुंडाळलेले असते की लालबागच्या राजाला झिगझॅग लाईन लागते तसे रचलेले असते?>>>

तुमच्या शाळेत नक्की काय शिकवायचे याबद्दल जबरदस्त कुतूहल आहे
नक्की गेला होता ना शाळेत?

शाळेत कोण पोरांना आतडे फेफडे शिकवतात? ते कॉलेजात बाईयोलॉजीमध्ये शिकवायचे. पण कॉलेज मी कधी केलेच नाही. शेजारीच चौपाटी होती तिथेच रमायचो. मला आठवतेय पहिल्याच परीक्षेत मला ४० पैकी शून्य गुण पडले होते. झूओलॉजीमध्ये वीसात शून्य आणि बॉटनीशास्त्रात विसात शून्य. टोटल शून्य.
दोन्हीत पेपर कोरा कसा द्यायचा म्हणून एकेक डायग्राम काढला होता. झूओलॉजीमध्ये हार्ट ज्यात बदाम बदाम बदाम आणि वनस्पतीशास्त्रात पाने फुले फळे आणि डिजाईन वगैरे. परीक्षेला शेजारी कॉमर्स की आर्टसची मुलगी बसलेली. तिला आधी माझी पानाफुलाण्ची डिजाईन आवडली. मग मी ते हार्ट काढताच तिला वाटले मी लाईन मारतोय. तसे माझी कम्प्लेंट केली. मी तडक स्वाभिमानाने पेपर देऊन सटकलो होतो. नॉस्टेल्जिक केलेत राव Happy

शाळेत कोण पोरांना आतडे फेफडे शिकवतात? ते कॉलेजात बाईयोलॉजीमध्ये शिकवायचे. पण कॉलेज मी कधी केलेच नाही. शेजारीच चौपाटी होती तिथेच रमायचो. >>>>>
शाळाही केली नाही हे कधी मान्य करणार?
कोणाच्या वर्षी दहावी झालास रे?

आणि जर आतडे लांब असेल तर मांसाहार खायला काय प्रॉब्लेम आहे. लांब आतड्याचा आणि शाकाहाराचा काय संबंध? >> तुम्ही सहा फूट की २० फूट त्याचे टेंशन नका घेऊ हो.. माणसाला लहान आणि मोठे अशी दोन्ही साईझची आतडी असतात...नाणी चाळायची चाळणी असते ना ज्यातून मोठ्या साईझचे आठाणे वेगळ्या भोकातून आणि लहान साईझचे चाराणे वेगळ्या भोकातून गाळली जातात, तसे मांसाहार बरोबर मोठ्या आतड्यातून जातो (जे लहान असते) आणि शाकाहार बरोबर लहान आतड्यातून जातो (जे मोठे असते).
तुम्ही बिनधास्त हवे ते खा, दोन्हींची सोय करून ठेवलेली आहे.

ओके हायझेनबर्ग
थोडक्यात जे मिश्राहारी असतात त्यांच्या सोयीसाठी देवाने उप्स निसर्गाने छोट्या मोठ्या भोकाची दोन आतडी बनवली आहेत.
मग जे लोकं शुद्ध शाकाहारी असतात ते लोकं एका आतड्याचा वापरच करत नाहीत का?
मग ते काही पिढ्यांनी शेपटीसारखे डिस्सॅपीअर तर नाही ना होणार?

आणि जर आतडे लांब असेल तर मांसाहार खायला काय प्रॉब्लेम आहे. >> अरे लांब आतडे असेल तर जास्त खाल्ले जाईल अशाने सगळे प्राणी खाऊन संपतील ना ? प्रॉब्लेम नाही का हा ?
लांब आतड्याचा आणि शाकाहाराचा काय संबंध? >> वरचे उत्तर पाहा.
आणि एखाद्याची आतड्याची लांबी किती असल्यास तो शाकाहारी वा मांसाहारी ठरतो? >> प्रश्न अर्धवट आहे रे. आतडे सरळ करून लांबी मोजायची कि फिरकीला मांजा गुंडाळून मोजायची कि झिगझॅग लाईन मधे ठेवून मोजायची हे स्पष्ट केल्याशिवाय उत्तर नाही देता येणार.
मग जे लोकं शुद्ध शाकाहारी असतात ते लोकं एका आतड्याचा वापरच करत नाहीत का? >> अरे ते बॅकप मधे ठेवलेले आहे रे. समजा एक सांपले तर दुसरे वापरता येईल.
मग ते काही पिढ्यांनी शेपटीसारखे डिस्सॅपीअर तर नाही ना होणार? >> वरचे उत्तर पाहा.

मला एक प्रश्न पडला आहे
कुत्रा मांसाहारी का शाकाहारी या धाग्यावर आपण अभिषेक च्या आतड्याची का चर्चा करत आहोत

हायला.. कुत्र्याच्या खाण्यावरचा धागा
ते म्हणतात ना “हर कुत्ते का दिन आता है“ ते खरंय का ?

@ म्हाळसा,
दिन = दिवस
दीन = कंगाल
नवीन व्याकरणाचा धागा काढायची संधी नका देऊ.

पाफा.. सांगितल्या प्रमाणे चेंजेस केलेत.. लवकरच मी शुद्ध मराठी लिहू शकेन .. माबो ने बरच काही शिकवलंय
आता ऋ “माबो ने तुम्हाला आज पर्यंत काय काय दिलं?“ असा धागा काढायला मोकळा Happy

शाकाहार आणि मांसाहार हे मानवनिर्मित वर्गीकरण आहे...
सुपर क्लास एकच - अन्न...
दिसलं की ओरबाड....

दीन च बरोबर होता
अभिषेक ने कुत्र्यावरचा फोकस आपल्या आतड्याकडे वळवल्या मुळे बिचारी म्हणत असतील निदान एक धागा तरी सोडून द्यायचा होता आमच्यासाठी
सगळीकडे काय ही पिळगावकरी Happy

मांस पचायला कमी वेळ लागतो , कारण शेवटी तेही एका प्राण्यांचेच असल्याने खाणार्या प्राण्यांच्या शरीराला ते नवीन नसते

शाकाहार उशिरा पचतो कारण वनस्पतीच्या पार्टपासून प्राण्यांशी सिमीलर प्रोटीन तयार करावे लागतात , म्हणून आतडे मोठे असते

जुन्या गाडीपासून गाडी तयार करा म्हटले तर लवकर होईल , पण जुनी गाडी वितळवून त्याचे वोशिंग मशीन करा म्हटले तर जास्त वेळ लागेल

माझी स्मरणशक्ती धोका देत नसेल तर अभिषेक ला पोटाचा काही त्रास होता, त्यामुळे या विषयावर त्याची नक्कीच PhD असेल.

{{{ माझी ऊंची जवळपास सहा फूट आहे तिथे आतडे २० फूट कसे असेल? }}}

चित्रात दिसणारा डोक्यावरचा अर्धा फुटाचा केसांचा बुचडा धरुन की त्याशिवाय?

चित्रात दिसणारा डोक्यावरचा अर्धा फुटाचा केसांचा बुचडा धरुन की त्याशिवाय? >>>> हा हा मस्त जोक Happy पण त्याशिवाय ..

पण धाग्याचा विषय कुत्रा मांस खातो का हा आहे...
>>>

धागा लाईनीत आणतो.

कुत्रा मांसाहारी आहे. आतापर्यंत पोस्टवरून त्याची शरीररचना मांसाहारींशी मेळ खाते यावरून हे मान्य करायला हरकत नाही.

१)/प्रश्न आता असा उरलाय की तो नैसर्गिक मिश्राहारी आहे का?
की माणसांनी आपल्या सोयीसाठी त्याला शाकाहार करायला भाग पाडलाय.

अर्थात जे स्वत: मांसाहारप्रेमी असतील त्यांनाही आपल्या घरच्या कुत्र्याला रोज मांसाहार घालणे परवडत नसावे. त्यामुळे कुत्र्याला शाकाहारी वा मिश्राहारी बनवणेच माणसाच्या सोयीचे होते.

२)/अजून एक प्रश्न पडलाय, कुत्र्यांना वरचेवर मांसाहार दिल्याने ते हिंसक आणि तामसी स्वभावाचे बनतात का? किंवा मांसाची चटक लागल्याने ते कोणावरही हल्ला करू शकतात का? यासाठी त्यांना प्रमाणातच मांसाहार तो देखील शिजवून देणे योग्य का?

लहान मुलांचे मानसशास्त्र तुम्ही वाचले नाहीत का? त्यांना पडतील ते प्रश्न विचारु द्यावे. त्यांची उत्सुकता दाबू नये. चि. ऋ. यांनी आपले वय वर्षे १२ च्या आत (हाल्फ टिकिट) जाहीर करावे म्हणजे त्यांच्या कितीही आणि कोणत्याही (अ‍ॅडल्ट विषयावरील सोडून) प्रश्नांवर आशूचॅम्प यांनी आक्षेप घ्यायचे कारण राहणार नाही.

य जगात ईतके ज्ञान आहे की ते शंभरेक वर्षांच्या आयुष्यात कोणीही मिळवू शकत नाही
तर प्रश्न लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही पडतात.
फरक ईतकाच की लहान मुले बिनधास्त विचारतात आणि मोठी माणसे संकोच करत बसतात.

असो
प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. उत्तर मिळाल्यास आवडेल. धागा पुन्हा तुम्हीच माझ्यावर नेत आहात आणि उद्या येऊन पुन्हा धागा माझ्यावर गेलाच कसे स्वत:च म्हणाल Happy

अजून एक प्रश्न पडलाय, कुत्र्यांना वरचेवर मांसाहार दिल्याने ते हिंसक आणि तामसी स्वभावाचे बनतात का? किंवा मांसाची चटक लागल्याने ते कोणावरही हल्ला करू शकतात का? >> लहानपणी रास्त्यातून बऱ्याचदा कुत्री-मांजरी घरी आणल्याचा अनुभव आहे.. एकदा असाच रस्त्यात एक कुत्रा दिसला..मैत्रिण म्हणाली “लावारिस है शायद” मग तीथेच त्याचे हिरा असं नामकरण करून “हिरा यू यू “ म्हणत घरात आणलं ..मग वाण्याच्या दुकानातून मारी ची छोट्या साईजची बिस्कीटं घेतली ..त्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ ती दुधातून खाऊ घातली .. हा कार्यक्रम दोन तीन दिवस चालला.. त्यानंतर त्याने बाबांच्या हिशोबाच्या वहीची पाने फाडून खाल्ली, एक बेडशीट फाडून वाट लावली , शेजारच्या काकूंवर धाऊन गेला .. त्यानंतर त्याच काकूंनी आणुन दिलेल्या फिश करी विथ राईसवर ताव मारून शांत झाला..
उगाचच मांसाहाराला का दोष द्यायचा..
येऊदेत पुढचा प्रश्न Happy

मोठी माणसे संकोच करत बसतात.>>>>
मोठी माणसं कॉमन सेन्स पण बाळगतात आणि शाळेत शिकवताना शिक्षकांकडे लक्ष पण देतात किमान आपल्याला शाळेत काय शिकवलं हे थोडाफार का होईना लक्षात ठेवतात

ह्या फालतू धाग्यावर एवढ्या कमेंट आल्या
ऋन्मेश
ग्रेट आहे.

त्याला चांगले माहीत आहे.
दुनिया झुकती है सिर्फ झुकाने वाला चाहिए

Pages