झाडाचा वाढदिवस (बालकविता)

Submitted by Asu on 19 September, 2020 - 09:40

झाडाचा वाढदिवस
(बालकविता)

झाड आज सजले धजले
पक्षी फुलांनी फुलून आले
पानोपानी फुले बहरली
सुगंधात मन न्हावून गेले
चिवचिव चिव चिमणपाखरे
शुभेच्छांची गाणे गाती
या फांदीवून त्या फांदीवर
खेळ खेळती मस्ती करती
वाढदिवशी जमली सगळी
आनंदाला आली भरती
तुम्ही तर माझी प्राणपाखरे
काय ठेवू तुमच्या हाती
मेवामिठाई केक देऊ का
का देऊ चॉकलेट वेगळे
नको त्यापरि सर्वात भारी
झाडावरची मधुर फळे
फळे खाऊन ते तृप्त झाले
भुर्रकन सगळे उडून गेले
वाढदिवस असा मस्त झाला
झाडालाही गहिवरून आले

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults