आक्रोश

Submitted by छायाचित्रकार on 16 September, 2020 - 10:32

आक्रोश करायचा आहे...
कधीचा.. थांबून ठेवलेला.
कित्येक जुन्या वर्षांचा..
कित्येक दिवसांचा..
मागचा.
कालचा.
आत्ता या क्षणाचा.. आक्रोश करायचा आहे..मला
पार बेंबीच्या देठापासून..
अगदी मेंदूतील रक्त
गोठवणारा आक्रोश.
किंवा अख्खे शरीर ही..
त्या समुद्र मंथनाच्या गोष्टी सारखे..
समुद्र घुसळून टाकणारा आक्रोश...
पण मला काहीच नकोय...
मी दानवही नाही आणि देव तर मुळीच नाही.
लोचट लेकाचे.

... भिंती थरारल्या पाहिजेत असा.
एखाद्याच काळीज उडवून लावेल असा...
डोळे मिटायचे थांबले पाहिजेत असा.
आणि कसा माहितेय..??
एखादा गर्भ.. जन्मायचा थांबेल असा
....
खोल आत..दूर.. कुठेतरी भिजत घातलेला आक्रोश...
हळू हळू मला गिळून टाकेल..
त्याच्या आत..
आक्रोश करायचाय...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults