माबो आयडीधारकांचे वय किती वाटते?

Submitted by मानव पृथ्वीकर on 14 September, 2020 - 12:17

तुम्हास कुठल्या माबो आयडीधारकाचे वय किती आहे असे वाटते? गेस करा पाहू.

आपल्याला कल्पना येईल आपल्याला लोक किती तरुण किंवा किती वयस्क समजतात ते!

वय गेस करतान तेवढे वय का वाटते, हे लिहिणे ऑप्शनल आहे.

आणि हे सर्व खेळमेळीनेच घ्याल यात शंका नाही.

चला तर मग.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धाग्यावर आलेल्या प्रतिसादांचा सखोल अभ्यास करुन त्यावर चिंतन करुन मी_अस्मिता यांनी हा "वय धोरण अहवाल" सादर केला:

Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1

Light 1 दिवेलागणीचा अहवाल Wink

मायबोलीकर आयडींचा सही पकडे है का नक्कीच .... वय धोरण अहवाल
धोरणाचाच अहवाल कारण वयाबाबत अजूनही खात्री नाही ( काही प्रामाणिक लोकं सोडून)

कोणे ऐकेकाळी ( तीन दिवसांपूर्वी ) मानवकाका यांना स्वतःचे वय अवघे त्रेपण असूनही वय २२ ते ५२ मधले मायबोलीकर ताई दादा यांनी काका काका केल्याने मनाला अतिशय उद्विग्नता येऊन त्यांनी हा धागा काढून काय तो सोक्षमोक्ष करायचा ठरवला पण हे गुपित गुपितच राहू द्यायचे असल्याने वरवर ' विरंगुळा' नाव दिले. पण अंतस्थ हेतू मला कळलाच .... दिवे घ्या मानव दादा ..

१. सगळ्या मंडळींना सुशांत केस चा घोर कंटाळा व गणेशोत्सव नंतर आलेला रिकामपणा यामुळे आयते कोलीत मिळाले.

२. तायाबायांना तर हळदीकुंकू टाईप मजा आली तेही पार्लरचा खर्च वाचून म्हणून त्यांचा पाय निघता निघेना. ( मीही यातच Wink )

३. जेम्स बॉन्ड दादा केवळ आयडी प्रमाणे सत्यान्वेशी वाटले बाकी सगळ्यांना फक्त खेळून मजा घ्यायची होती. Light 1 घ्या आणि माझा राग राग करू नका.

४. मानव दादांनी सहजासहजी उत्तर सांगितले असते तर गुपित उघड झाले असते म्हणून आपणही खेळतच आहोत असेच दाखवत तिनशे प्रतिसादापर्यंत कळ काढली.

५. इथून पुढे वचपा म्हणून जे अध्यात्मिक लिहीत नाहीत त्यांच्या वयात मी +१० भर घालणारे.

६. बऱ्याच जणांनी मिळतंय तर पदरात पाडून घ्या या विचाराने त्यातल्या त्यात बरे वय माझे असे सांगितले.

७. उघड उघड भ्रष्टाचार झालेला म्या पाहिला यासाठी चोकलेट व पार्टी ट्रीट याची लालूच दाखवण्यात आली. व न जमल्यास चोकलेट परत घेतले, पार्टी आहे समजून आलेल्यांच्या तोंडावर दार बंद करण्यात आले.

८. काही तायाबायांना चिकणी चमेली ते 'दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ' हा जीवनप्रवास क्षणात पहायला मिळाला.

९. काही दादालोकांना कुणीकडून पोटच्या गोळ्या कडून बुकमार्क करून घेतला असे झाले कारण क्षणात त्यांचाही रणबीर कपूर चा जन्माचा अलोक नाथ झाला.
माझेही तसेच पोराने एवढे घाण हस्तलेखन केले आहे तिकडे तर नंबर येणारच नाही पण इकडे ही स्वेच्छा निव्रुत्ती घ्यावी लागली. किती ती लुज लुज सिच्युएशन ....

१०. इथे च माझे आणि अमितव यांचे एकाच वेळेस मैत्री/शत्रुत्व झाले . Proud त्यांना मी सदतीस वेळा अडतीस म्हणूनही माझ्या वयाबाबत ४५+ वर अडून बसले. वर घासाघीस करायला तयार होईनात दादा , मगं मी अन्जुताई आणि VB यांच्या रिक्षात बसले. त्यांनाही मंजुताई यांची सवारी मिळाली.
याचा बदला म्हणून मी त्यांना बावन केले तर 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ' म्हणू लागले ...पण नाही भजन वदवून घेतले तर नावाची .... नाही.

११. संशोधक अतिशय लहान निघाले. इतक्या लहानपणी संशोधन केल्याबद्दल अभिनंदन , पाहिलं नं कसं आहे जग ....

१२. बऱ्याच जणांनी खरीखुरी उत्तरे दिली त्यांचे ही कौतुक.

१३. बऱ्याच जणांनी विपू खणून जुने संदर्भ आठवून उणे दुणे काढले. हा भोचकपणा आहे की उत्तम स्मरणशक्ती मलाही कळत नाही.. मीही त्यातलीच.

१४. एकुणच मला आम्ही जातो डिस्कोला तुम्ही जा काठी घ्यायला ही व्रुत्ती दिसल्याने अत्यंत खेद वगैरे काही झाला नाही. एवढ्या तेवढ्यात खेद होणारे सशाचे काळीज घेऊन मायबोलीवर इतकी वर्ष जिवंत रहाता तरी येईल का Proud

१५. मी खरोखरच तरुण असूनही मी ज्यांना साथ दिली त्यांनी मला वार्धक्य दिले , हे लक्षात ठेवू का ? Wink Light 1

१६. काही लोकं आपल्या वयाचा अदांज इतरांना येतोय हे लक्षात यायला लागले की गायब होऊन इकडे तिकडे हिंडून परत येऊन कमी झाले आहे का याची वाट बघत , कळ सोसायचे मगं कमी झाले की आत्ताच तर आलो दाखवायचे. Light 1

१७. बऱ्याच जणांनी आपले वय मूळ वयाच्या जितके वजा तितके खूष होऊन दाखवले. पण हा आनंद निखळ निर्मळ वगैरे नसून विकृतीची छटा Light 1 असलेला 'मोगँबो खूष हुवा' सारखा होता हे मला लगेच लक्षात आले , पण नव्या मित्र मैत्रीणींसाठी कुठे अँसिडमध्ये उडी घ्या म्हणून मी त्यांच्या कलाकलाने घेतले. एकिकडे पार्टी व दुसरीकडे अँसिड असताना कुणीही गरीब व्यक्ती काय निवडणार !! (मी यातच पण दोन्हीबाजूने)

१८. जेम्स बॉन्ड Light 1 यांनी वारंवार सत्याची आठवण करून दिली त्यासाठी त्यांनी sarcasm असणारे बरेच प्रतिसाद दिले पण सत्य हवं होतं कुणाला उलट सत्याचे बिंग/बिंगो फुटू नये म्हणून तर कसरत चालली होती. Proud

१९. Light 1 संशोधक आणि इतर तान्ह्या आयडींना बघून मला " ये किसका बच्चा है भई झाले " पण बाळ"कडू" घेण्यासाठी मायबोलीही योग्य जागा आहे हे आठवून मी शांत झाले. मी त्यांना तेहतीस म्हणाले तर त्यांनी काळानिळा इमोजी पाठवला , या तेहतीस आकड्यावर इथे किती लोक पार्टी देत आहेत हा सकारात्मक दृष्टिकोण ठेव , बाळ संशोधका Wink Light 1

२०. Light 1 काही मित्र आयडींच्या अपेक्षेपेक्षा अधिक वयामुळे मला मानसिक धक्का पोचला आहे पण काही आयडी लहान निघाल्याने त्याही बाजूने धक्का बसल्याने मी कुठेही पडले नाही.

२१. Light 1 मानवदादा यांना 'काका काका' म्हणून ते खरंच कुणाचे काकबळी होते व त्यांना नक्की कुणी 'मामा' बनवले आहे हे कळले असेलच...
एकुणच 'काका मला वाचवा' नंतर 'काका (शब्दापासून) मला वाचवा ' याने इतिहासाची पुनरावृत्ती होते हे पुन्हा एकदा अधोरेखित केले.

धन्यवाद मानव , it was a killer !! Light 1

Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1
Submitted by मी_अस्मिता on 16 September, 2020 - 20:40
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@धनुडी तै
संशोधक चं अगं अगं म्हशी चाललय. मन में तो लड्डू ही फूट रहे है। काय खरं कि नाही?>>>> Lol
मी तरी काय करणार... 'दिवस माझे हे फुलायचे..झोपाळ्यावाचून झुलायचे' Rofl

@श्रवु तै
कुठेही लग्नाचा विषय निघाला .. कि संशोधक ची उपस्थिती महत्वाची..>>>> अहो कुठून तरी माहिती मिळवायला हवी ना.. अभ्यास करायला हवा, नाहीतर अभ्यास न करताच पुढे गेलो अन् दांडी उडाली तर...... Lol

@किल्ली तै
अजून संशोधन सुरू करायचंय...
ती पोरगी टीसीएस च्या apti ला होती, आता काय करतीये शोधायला पाहिजे Lol

@सोनाली तै, विरु दा
कल्पना भारी आहे , लक्षात ठेवतो , योग्यवेळी विचारतो माबोवर Lol

@अतुलदा
काल डोंगरावर गेल्यानंतर आलेले दिसले नाही मला तरी>>>> आलो आलो खाली Lol

@च्रप्स दा
बाटली घेऊन जातो (पाण्याची) Rofl

मस्त आहे धागा.. Lol

बोकलत 32-35
सामो 40+
अस्मिता 36
ऋन्मेष 35
मानव 52
च्रप्स >40
मी अनु 34

सर्वात पहिल्या अपत्याचे वय माहीत असले लोकांना की रेंज कळून जाते.
म्हणून मी ईथे गर्लफ्रेण्ड गर्लफ्रेण्ड करायचो. बाकी काही नाही...

वाढत्या वयानुसार प्रतिसाद टाकायची क्षमता आणि उत्साह कमी होतो
हजार करायची जबाबदारी तरुणांवरच आहे आता....

>> अजून ३५ प्रतिसाद टाकून १००० करायला मदत करा.

>> वाढत्या वयानुसार प्रतिसाद टाकायची क्षमता आणि उत्साह कमी होतो. हजार करायची जबाबदारी तरुणांवरच आहे आता....

both Lol

तरुणांना बरीच कामे असतात.. वाढत्या वयाची सिनिअय्यर लोक प्रतिसाद वाढवतात..
आता माझे वय गेस करा..

संशोधक कुठे आहेत ? तुमच्या त्या छत्रीवाल्या मुलीचे साधारण वय काय असेल..>>>
धाग्यावर उपस्थित नसलेल्यांचे वय विचारू अथवा सांगू नये असा संकेत आहे ना?

तरुणांना बरीच कामे असतात.
>>>>
तरुण ती बरीच कामे करता करताही बरेच प्रतिसाद टाकू शकतात. शरीराच्या तारुण्याचा हाच फायदा आहे. बाकी मनाचे तारुण्य वगैरे शब्द ऐकायला बरे वाटतात. म्हणून खा प्या स्वस्थ राहा

च्रप्स किती वेळा वय गेस करून हवय तुम्हाला? त्याने वय कमी होणार नाही Lol
मन्या यांचं वय ३२ असेल ( मन्या हि आयडी स्त्री आहे हे लक्षात ठेवावे लागतं, नावा वरून मुलगा वाटतो Happy )

च्रप्स किती वेळा वय गेस करून हवय तुम्हाला? त्याने वय कमी होणार नाही Lol

हो ना
मीच चार-पाच वेळा वेगवेगळे वय सांगितले असेल Lol

मन्या हि आयडी स्त्री आहे हे लक्षात ठेवावे लागतं, नावा वरून मुलगा वाटतो Happy
>>>>
हो, मी सुद्धा सुरुवातीला त्यांना तसेच प्रतिसाद दिलेले Happy

यावरून आठवले,
मायबोलीकरांचे लिंग ओळखायचा धागा काढूया का?

मला हा आयडी चं नाव वाचूनच कसंस होतं. वय ओळखणं दूरची बात, पण तू म्हणतच असशील तर घे माझा अंदाज एकदम ताजे असेल २१- २२ ( दिवस कि वर्षे)

आता माझे वय गेस करा..
Submitted by च्रप्स >> १८ वर्ष.
खुष..
जास्त वाटत असेल तर मनमोकळेपणे सांगा. Happy

Pages