तुम्हास कुठल्या माबो आयडीधारकाचे वय किती आहे असे वाटते? गेस करा पाहू.
आपल्याला कल्पना येईल आपल्याला लोक किती तरुण किंवा किती वयस्क समजतात ते!
वय गेस करतान तेवढे वय का वाटते, हे लिहिणे ऑप्शनल आहे.
आणि हे सर्व खेळमेळीनेच घ्याल यात शंका नाही.
चला तर मग.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धाग्यावर आलेल्या प्रतिसादांचा सखोल अभ्यास करुन त्यावर चिंतन करुन मी_अस्मिता यांनी हा "वय धोरण अहवाल" सादर केला:
दिवेलागणीचा अहवाल
मायबोलीकर आयडींचा सही पकडे है का नक्कीच .... वय धोरण अहवाल
धोरणाचाच अहवाल कारण वयाबाबत अजूनही खात्री नाही ( काही प्रामाणिक लोकं सोडून)
कोणे ऐकेकाळी ( तीन दिवसांपूर्वी ) मानवकाका यांना स्वतःचे वय अवघे त्रेपण असूनही वय २२ ते ५२ मधले मायबोलीकर ताई दादा यांनी काका काका केल्याने मनाला अतिशय उद्विग्नता येऊन त्यांनी हा धागा काढून काय तो सोक्षमोक्ष करायचा ठरवला पण हे गुपित गुपितच राहू द्यायचे असल्याने वरवर ' विरंगुळा' नाव दिले. पण अंतस्थ हेतू मला कळलाच .... दिवे घ्या मानव दादा ..
१. सगळ्या मंडळींना सुशांत केस चा घोर कंटाळा व गणेशोत्सव नंतर आलेला रिकामपणा यामुळे आयते कोलीत मिळाले.
२. तायाबायांना तर हळदीकुंकू टाईप मजा आली तेही पार्लरचा खर्च वाचून म्हणून त्यांचा पाय निघता निघेना. ( मीही यातच )
३. जेम्स बॉन्ड दादा केवळ आयडी प्रमाणे सत्यान्वेशी वाटले बाकी सगळ्यांना फक्त खेळून मजा घ्यायची होती. घ्या आणि माझा राग राग करू नका.
४. मानव दादांनी सहजासहजी उत्तर सांगितले असते तर गुपित उघड झाले असते म्हणून आपणही खेळतच आहोत असेच दाखवत तिनशे प्रतिसादापर्यंत कळ काढली.
५. इथून पुढे वचपा म्हणून जे अध्यात्मिक लिहीत नाहीत त्यांच्या वयात मी +१० भर घालणारे.
६. बऱ्याच जणांनी मिळतंय तर पदरात पाडून घ्या या विचाराने त्यातल्या त्यात बरे वय माझे असे सांगितले.
७. उघड उघड भ्रष्टाचार झालेला म्या पाहिला यासाठी चोकलेट व पार्टी ट्रीट याची लालूच दाखवण्यात आली. व न जमल्यास चोकलेट परत घेतले, पार्टी आहे समजून आलेल्यांच्या तोंडावर दार बंद करण्यात आले.
८. काही तायाबायांना चिकणी चमेली ते 'दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ' हा जीवनप्रवास क्षणात पहायला मिळाला.
९. काही दादालोकांना कुणीकडून पोटच्या गोळ्या कडून बुकमार्क करून घेतला असे झाले कारण क्षणात त्यांचाही रणबीर कपूर चा जन्माचा अलोक नाथ झाला.
माझेही तसेच पोराने एवढे घाण हस्तलेखन केले आहे तिकडे तर नंबर येणारच नाही पण इकडे ही स्वेच्छा निव्रुत्ती घ्यावी लागली. किती ती लुज लुज सिच्युएशन ....
१०. इथे च माझे आणि अमितव यांचे एकाच वेळेस मैत्री/शत्रुत्व झाले . त्यांना मी सदतीस वेळा अडतीस म्हणूनही माझ्या वयाबाबत ४५+ वर अडून बसले. वर घासाघीस करायला तयार होईनात दादा , मगं मी अन्जुताई आणि VB यांच्या रिक्षात बसले. त्यांनाही मंजुताई यांची सवारी मिळाली.
याचा बदला म्हणून मी त्यांना बावन केले तर 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ' म्हणू लागले ...पण नाही भजन वदवून घेतले तर नावाची .... नाही.
११. संशोधक अतिशय लहान निघाले. इतक्या लहानपणी संशोधन केल्याबद्दल अभिनंदन , पाहिलं नं कसं आहे जग ....
१२. बऱ्याच जणांनी खरीखुरी उत्तरे दिली त्यांचे ही कौतुक.
१३. बऱ्याच जणांनी विपू खणून जुने संदर्भ आठवून उणे दुणे काढले. हा भोचकपणा आहे की उत्तम स्मरणशक्ती मलाही कळत नाही.. मीही त्यातलीच.
१४. एकुणच मला आम्ही जातो डिस्कोला तुम्ही जा काठी घ्यायला ही व्रुत्ती दिसल्याने अत्यंत खेद वगैरे काही झाला नाही. एवढ्या तेवढ्यात खेद होणारे सशाचे काळीज घेऊन मायबोलीवर इतकी वर्ष जिवंत रहाता तरी येईल का
१५. मी खरोखरच तरुण असूनही मी ज्यांना साथ दिली त्यांनी मला वार्धक्य दिले , हे लक्षात ठेवू का ?
१६. काही लोकं आपल्या वयाचा अदांज इतरांना येतोय हे लक्षात यायला लागले की गायब होऊन इकडे तिकडे हिंडून परत येऊन कमी झाले आहे का याची वाट बघत , कळ सोसायचे मगं कमी झाले की आत्ताच तर आलो दाखवायचे.
१७. बऱ्याच जणांनी आपले वय मूळ वयाच्या जितके वजा तितके खूष होऊन दाखवले. पण हा आनंद निखळ निर्मळ वगैरे नसून विकृतीची छटा असलेला 'मोगँबो खूष हुवा' सारखा होता हे मला लगेच लक्षात आले , पण नव्या मित्र मैत्रीणींसाठी कुठे अँसिडमध्ये उडी घ्या म्हणून मी त्यांच्या कलाकलाने घेतले. एकिकडे पार्टी व दुसरीकडे अँसिड असताना कुणीही गरीब व्यक्ती काय निवडणार !! (मी यातच पण दोन्हीबाजूने)
१८. जेम्स बॉन्ड यांनी वारंवार सत्याची आठवण करून दिली त्यासाठी त्यांनी sarcasm असणारे बरेच प्रतिसाद दिले पण सत्य हवं होतं कुणाला उलट सत्याचे बिंग/बिंगो फुटू नये म्हणून तर कसरत चालली होती.
१९. संशोधक आणि इतर तान्ह्या आयडींना बघून मला " ये किसका बच्चा है भई झाले " पण बाळ"कडू" घेण्यासाठी मायबोलीही योग्य जागा आहे हे आठवून मी शांत झाले. मी त्यांना तेहतीस म्हणाले तर त्यांनी काळानिळा इमोजी पाठवला , या तेहतीस आकड्यावर इथे किती लोक पार्टी देत आहेत हा सकारात्मक दृष्टिकोण ठेव , बाळ संशोधका
२०. काही मित्र आयडींच्या अपेक्षेपेक्षा अधिक वयामुळे मला मानसिक धक्का पोचला आहे पण काही आयडी लहान निघाल्याने त्याही बाजूने धक्का बसल्याने मी कुठेही पडले नाही.
२१. मानवदादा यांना 'काका काका' म्हणून ते खरंच कुणाचे काकबळी होते व त्यांना नक्की कुणी 'मामा' बनवले आहे हे कळले असेलच...
एकुणच 'काका मला वाचवा' नंतर 'काका (शब्दापासून) मला वाचवा ' याने इतिहासाची पुनरावृत्ती होते हे पुन्हा एकदा अधोरेखित केले.
धन्यवाद मानव , it was a killer !!
Submitted by मी_अस्मिता on 16 September, 2020 - 20:40
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
देवकी - ३५ ते ४०
देवकी - ३५ ते ४०
हेडर पोस्ट भारी आलीय..
हेडर पोस्ट भारी आलीय.. अस्मिता यांचा अहवाल
मी_अस्मिता यांच्या अहवालाने
मी_अस्मिता यांच्या अहवालाने चार चांद लागलेत.
धन्यवाद ऋ आणि मानवदादा,
धन्यवाद ऋ आणि मानवदादा,
तुम्हाला योग्य वाटल्यास आणि संपादन करता येत असल्यास उर्वरित अहवाल( २७ पान शेवटी) वर डकवणार का ? एकत्र राहील आणि मीही निवडक दहा मध्ये टाकून नंतर करमणूक करून घ्यावी म्हणतेय.
सर्वांचे खूप खूप आभार.
त्यात भरत यांचा उल्लेख आहे,
त्यात भरत यांचा उल्लेख आहे, ते इथे आले तरी या खेळात सामील नव्हते. तेव्हा मजकुरात हे सामील करण्यापूर्वी त्यांना एकदा विचारलेले बरे.
काढू शकता की ते मगं , कसंही
धन्यवाद मानवदादा.
तुम्ही विचारुन बघा त्यांना,
तुम्ही विचारुन बघा त्यांना, त्याप्रमाणे करू.
त्यापेक्षा काही मित्र आयडी
त्यापेक्षा काही मित्र आयडी असा बदल केला तर, नाही तर जाऊदे. त्यांना त्रास कशाला....
राहू दे असंच.. नको काही बदल वगैरे.
त्यापेक्षा काही मित्र आयडी
त्यापेक्षा काही मित्र आयडी असा बदल केला तर,>
ठीक आहे, उद्या करेन.
मला हा प्रश्ण पडतो,
मला हा प्रश्ण पडतो,
लोकं दुसर्याचे वय काय असेल, ह्याबद्दल इतकं कुतुहल का बाळगतात? का?
ते पण , लिहा कोणीतरी...
भरत यांच्या दहावी पास आउटचा
भरत यांच्या दहावी पास आउटचा अंदाज मीही वर्तवला (कुठेतरी वाचल्यासारखं वाटत होतं), माझ्याकडूनही sorry. मी तो मजकूर काढून टाकणार होते पण राहून गेलं.
लोकं दुसर्याचे वय काय असेल,
लोकं दुसर्याचे वय काय असेल, ह्याबद्दल इतकं कुतुहल का बाळगतात? का?
ते पण , लिहा कोणीतरी...>>> इथे प्रतिसादामागे कोण व्यक्ती आहे हे दिसत नाही. शिवाय ज्यांच्याशी आपले बोलणे होते किंवा ज्यांचे प्रतिसाद नेहमी वाचले जातात त्यांची प्रतिमा मनात तयार झालेली असते. आता या धाग्यावर नक्की वयापेक्षा आपला अंदाज किती बरोबर आहे/होता याचे जास्त कुतूहल दिसले.
राहू दे.
राहू दे.
पाठ्यपुस्तकांच्या धाग्यावरून कोण आपल्या बरोबरचे ते कळलं होतंच.
आता हा धागा ग प्पांचा झालाच आहे तर इथेच लिहितो.
राजसी बरेच दिवसांत दिसलेल्या नाहीत. I hope त्यांच्याकडे सगळं ठीक असावं. (त्यांच्या वयाचा अंदाज मला बांधायचा नाही.)
>> लोकं दुसर्याचे वय काय
>> लोकं दुसर्याचे वय काय असेल, ह्याबद्दल इतकं कुतुहल का बाळगतात? का? ते पण , लिहा कोणीतरी...
>> Submitted by झंपी on 19 September, 2020 - 01:22
धाग्यापुरते बोलायचे तर मानव यांनी विरंगुळा मध्ये धागा टाकलाय यातच सगळे आले. गम्मत म्हणून गप्पा मारायला ठीक.
पण हो, खऱ्या आयुष्यात काही लोक याबाबत जजमेंटल होतात ते योग्य वाटत नाही. Age based discrimination बरेच आहे आपल्याकडे. माझ्या क्षेत्रातले उदाहरण द्यायचे तर, मी बाहेरच्या देशात साठीतले लोक डेव्हलपर म्हणून प्रोग्रामिंग करताना पाहिले आहेत. हेच आपल्याकडे मात्र, एक ठराविक वय झाले कि त्याने/तिने प्रोग्रामिंग सोडून म्यानेजर व्हायलाच हवे अशी इतरांची अपेक्षा असते. नाही तर "अजून कोडींगच करतोय/करतीये. काही तरी प्रोब्लेम आहे बहुतेक" अशा नजरेने पाहिले जाते
याउलट, कोणी वयाच्या मानाने लवकर म्यानेजर झाला/झाली तर त्याकडे प्रचंड कौतुकाने पाहिले जाते.
काही वर्षांपूर्वी एका नवीन ग्रुप मध्ये, मैत्री व्हायला सुरवात झाली होती तेंव्हा, गप्पा मारता मारता एकाने "प्रत्येकाने आपापले वय सांगावे" असे सुचवले. त्यातून आपण एकमेकाला अजून चांगले जाणून घेऊ शकतो अशी पुस्ती त्याने जोडली. मी सोडून इतर सर्वाना ते मान्य झाले. मी नकार दिला. मैत्रीमध्ये मला त्याची गरज वाटत नाही म्हणालो. त्यानंतर "वया"वरून त्या ग्रुप मध्ये अधूनमधून चर्चा होत असे. नंतर काही महिन्यांनी, त्यातल्या एका/दोघांनी आपली वये भलतीच खोटी सांगितल्याचे निष्पन्न झाले, तेंव्हा "कशाला नसते उपद्व्याप करायचे" असे विचार येऊन मी मनातल्या मनात प्रचंड हसलो होतो
हो बरोबर आहे, मी तरी अशीच
हो बरोबर आहे, मी तरी अशीच गंमत म्हणून घेतलं आणि लिहीलं हे सगळं. सोनाली आणि अतुल पाटलांच पण पटलं.
मानव पृथ्वीकर
मानव पृथ्वीकर
या नावावरूनच वय किमान एक लक्ष वर्षे वाटते आहे. म्हणजे जेव्हा जात धर्म प्रांत काहीच अस्तित्त्वात नव्हते. फक्त माणूस इतकीच ओळख आंणि पृथ्वी वर निवास इतका साधा पत्ता.
वा बिपीन चन्द्रजी!
वा बिपीन चन्द्रजी!
मी किती वयाचा वाटतो माझ्या
मी किती वयाचा वाटतो माझ्या भाषेवरून ?
अर्र्र्ररररर पशुपत, जरा
अर्र्र्ररररर पशुपत, जरा थांबायचं कि. लगोलग वय सांगून टाकलं!
बिपीन चंद्रजी
मस्त
बिपीन चंद्रजी >>>
बिपीन चंद्रजी >>>
भरत धन्यवाद.
पशूपत 38
पशूपत 38
((((अर्र्र्ररररर पशुपत, जरा
((((अर्र्र्ररररर पशुपत, जरा थांबायचं कि. लगोलग वय सांगून टाकलं!))
माझ्या पोस्ट मधे बदल केला आहे...
बघूया इतर मंडळी काय म्हणतात ते...
पशुपत ३०-३५
पशुपत ३०-३५
रच्याकने....
रच्याकने....
आधी असाच एक धागा होता,
कोण कोणाचा ड्यू आयडी म्हणून
<<< रच्याकने....
<<< रच्याकने....
आधी असाच एक धागा होता,
कोण कोणाचा ड्यू आयडी म्हणून>>> हे तर काहीच नाही. माबोवर काही पुरुष मंडळी स्त्री आयडी वापरतात कळले होते तेव्हा मी खालचा धागा काढला होता.
https://www.maayboli.com/node/65686
मानव - ३०
मानव - ३०
पशुपत ५० ते ५५ च्या दरम्यान
पशुपत ५० ते ५५ च्या दरम्यान असावेत (हा बेसलेस अंदाज नाही)
अतुल ३५
अतुल ३५
अतुल , तुम्हाला नंतर सांगतो..
अतुल , तुम्हाला नंतर सांगतो....
900
900
Pages