Submitted by कविता१९७८ on 12 September, 2020 - 13:15
मन तुझे आणि माझे
कुठेतरी खोलवर तरंगतय
काय शोधतय कुणास ठाऊक
जीवनाचे उथळ झरे?
की श्वासांची खोल दरी?
प्रेमाचा आनंदी सहवास?
की वास्तवाची अनुभविक दोरी?
नक्की जीवन म्हणजे काय
फुलपाखरु की भुंगा
सावली की झळ
मलम की ओरखडा
कळतच नाही
काय दडलय या मनात
कुठली दिशा
कसला ठाव
अतरंग की मायाजाल
याची दोरी कुणाच्या हातात
तुझ्या की माझ्या
की कुणाच्याच नाही
हे फक्त तरंगतय
आयुष्य नेइल त्या दिशेला
नव्या पहाटेकडे
नव्या किनार्यावर
वार्याच्या डौलावर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप सुंदर शब्दरचना..
खूप सुंदर शब्दरचना..
छान आहे
छान आहे
वास्तवाची अनुभविक दोरी...
वास्तवाची अनुभविक दोरी... आवडली ही वेगळी कल्पना.
फार फार आवडली..!
फार फार आवडली..!
धन्यवाद
धन्यवाद