Submitted by मीसाक्षी on 30 August, 2020 - 14:24
खरंतर मायबोली गणेशोत्सवात मोदक स्पर्धेत भाग घेण्यासाठी मैत्रिणींनी सांगितलेले पण मला उकडीचे मोदक साच्यानेच जमतात त्यामुळे स्पर्धेच्या नियमात बसत नव्हते. मैत्रिणींना माझं क्रोशे वेड माहीत होतच मग त्यांनी तू क्रोशाचे मोदक कर म्हणून सांगितलं.. मग काय प्रयोग करायला घेतलाच आणि कुठेही पॅटर्न वगैरे न बघता स्वतःच करता करता जमला की.. मज्जा वाटली. मी ऑर्डरप्रमाणे क्रोशाच्या वस्तू करून देते, तर मग एका ऑर्डरसाठी हे अजून केशरवाले आंबा मोदक आणि कंठी हार केला. आणि बाप्पासाठी इतर सेटप म्हणजेच बाप्पा मागचा मखर, फुल, दुर्वा, दिवा ही क्रोशेने केले... कसं वाटतंय? मामीने इथे टाकण्यासाठी आठवण केल्याबद्दल थँक्स ग.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप सुबक दोन्ही हार व मोदक!
खूप सुबक दोन्ही हार व मोदक!
ए हो, दुर्वा दिवा मखर फुल खूप
ए हो, दुर्वा दिवा मखर फुल खूप छान
कित्ती सुबक काम, वाटतच नाही
कित्ती सुबक काम, वाटतच नाही क्रोशे नी बनवलंय
अप्रतिम बनवलंय सगळं.
अप्रतिम बनवलंय सगळं.
आवर्जुन केलेल्या कौतुकाबद्दल
आवर्जुन केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद सगळ्यांना. हो आशिका, हे पॅटर्न माझे मीच तयार केलेले आहेत. नवनवीन प्रयोग करायला आवडतं मला:)
Pages