बाप्पाच्या सजावटीसाठी क्रोशे मोदक आणि कंठी हार

Submitted by मीसाक्षी on 30 August, 2020 - 14:24

खरंतर मायबोली गणेशोत्सवात मोदक स्पर्धेत भाग घेण्यासाठी मैत्रिणींनी सांगितलेले पण मला उकडीचे मोदक साच्यानेच जमतात त्यामुळे स्पर्धेच्या नियमात बसत नव्हते. मैत्रिणींना माझं क्रोशे वेड माहीत होतच मग त्यांनी तू क्रोशाचे मोदक कर म्हणून सांगितलं.. मग काय प्रयोग करायला घेतलाच आणि कुठेही पॅटर्न वगैरे न बघता स्वतःच करता करता जमला की.. मज्जा वाटली. मी ऑर्डरप्रमाणे क्रोशाच्या वस्तू करून देते, तर मग एका ऑर्डरसाठी हे अजून केशरवाले आंबा मोदक आणि कंठी हार केला. आणि बाप्पासाठी इतर सेटप म्हणजेच बाप्पा मागचा मखर, फुल, दुर्वा, दिवा ही क्रोशेने केले... कसं वाटतंय? मामीने इथे टाकण्यासाठी आठवण केल्याबद्दल थँक्स ग.

PicsArt_08-22-12.35.27.jpgPicsArt_08-22-12.36.36.jpgPicsArt_08-24-11.05.28.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय भारी आहे हे! ती केशराची काडीपण खूप छान दिसतेय मोदकावर. मोदक इतके खरे वाटताय की पटकन उचलावा!
हार तर खास आहेच. मुळात क्रोशाने केलंय हे खरंच वाटत नाहीये.

सुंदर.
साक्षीचं क्रोशे काम मी इन्टरनेट वर नेहमी बघत असते आणी ते अक्षरशः श्वास रोखून बघावं इतकं समान, सफाईदार आणि सुंदर असतं.
मोदक आणि हार सुंदरच. हार जास्त आवडला.

मस्त च ! किती सुबक आणि रेखीव !!
मोदकांच्या आत काही भरलंय कि पोकळ च आहेत ?
कंठी चं तर विशेष कौतुक आहे.. !!

साक्षीचं क्रोशे काम मी इन्टरनेट वर नेहमी बघत असते >> म्हणजे कुठे ग? इथेच कि ब्लॉग आहे ?

मी अनु खुप खुप थॅंक्यु ग Happy
अश्विनी11...थॅंक्यु
Anjali_kool.. थॅंक्यु
https://www.facebook.com/saarascrafts/
हे माझं फेसबुक पेज, इथे सगळं कलेक्शन आहे मी बनवलेल्या क्रोशे वस्तूंचं.

मस्त झालाय क्रोशे मोदक. केशर काडी पण एक नंबर दिसतीय.

फुल, दुर्वा, दिवा सुद्धा एकदम झकास..

हार पण खूप छान झालाय. याचा पॅटर्न कुठे मिळेल?

खूप सुंदर दिसत आहेत मोदक. मला पण क्रोशे विणकाम खूप आवडते. मी गणपती बनवला आहे क्रोशेचा. पण मोदक मी पहिल्यांदा पाहतेय. खूप सुंदर दिसत आहेत, अगदी सुबक. हार पण नाजूक झालाय. खूप खूप कौतुक.

फार सुरेख आणि सुबक झालंय सगळंच.
तुझ्या हातात कला आहेच आणि पॅटर्नसुद्धा तू कॉपी न करता स्वतः विचार करुन कल्पकतेने बनवतेस ते तर खासच !!

Pages