साहित्य :
सारणासाठी -
आळीव/ हाळीव - ५० ग्रॅम
ओलं खोवलेलं खोबरं - २ वाट्या
गुळ - १.५ वाटी
वेलची पावडर
उपवास मोदक पारीसाठी -
वरई पीठ - १ वाटी
पाणी - १ वाटी
लोणी/ तेल - १ चमचा
चवीपुरते मीठ
उपवास शाही मोदक पारीसाठी -
काजू - १ वाटी
साखर - अर्धी वाटी
पाणी - पाव वाटी
कृती :
सारण -
१) आळीव २ तास दुधात किंवा नारळाच्या पाण्यात भिजत घालावे. किंवा नारळाच्या चव घेऊन त्यात मिसळून ठेवले तरी चालतील.
२) आळीव भिजले की गुळ मिसळून गॅस वर शिजवायला ठेवा. अंदाजे ८-१० मिनिटांत व्यवस्थित शिजेल. सारण आधी पातळ असेल नंतर घट्ट होत जाईल.
३) सारण शिजलं की गॅस बंद करून वेलची पावडर मिसळा.
४) हे सारण दोन्ही प्रकारच्या मोदकांसाठी कॉमन असणारे.
तयारी
उपवास मोदक
१) जाड बुडाच्या पातेल्यात पाणी घ्या. त्यात लोणी/ तेल आणि चवीपुरतं मीठ घाला. पाणी चांगले रटरट उकळले की वरईचे पीठ घाला आणि भराभर हलवा. सगळं नीट मिक्स होऊ द्या. झाकण ठेऊन एक दणदणीत वाफ येऊ द्या आणि आच बंद करा.
२) उकड गरम असतानाच चांगली मळून घ्या. छोटा गोळा घेऊन तो परत छान मळून घ्या. हाताला किंचित तेल लावून वाटी चा आकार द्या. पातळ पारी झाली की एक चमचा सारण भरा. बोटांनी पारीच्या कडेवर निऱ्या घाला आणि मोदक वळून पूर्ण करा. असे सगळे मोदक वळून घेऊन नेहेमीच्या मोदकांसारखे १५ मिनिटे वाफवून घ्या.
उपवास शाही मोदक
१) मिक्सरमधून काजूची पूड करुन घ्या.
२) जाड पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर ठेवा. पाणी उकळलं की लगेच काजू पावडर घालून सतत ढवळा. मिश्रण थोडं घट्ट झालं की लगेच गॅस बंस करा.
३) जरा गार झालं की ह्याचा गोळा मळून घ्या.
४) एक छोटा गोळा घेऊन त्याला वाटीचा आकार द्या. उकडिच्या मोदकाइतकी पातळ पारी नको. जाड ठेवा.
५) ह्यात एक चमचा सारण भरून वाटी बंद करून मोदकाचा आकार द्या. मग चमच्याच्या मागच्या बाजूने हळुवार हाताने निर्या काढा. याच पद्धतीने सगळे मोदक वळून घ्या. तुमच्याकडे मोदकाचा साचा असेल तर हे मोदक साच्यात करायला जास्त सोपे जातील. माझ्याकडे साचा नाहिये आणि स्पर्धेला साचा नको असा नियम होता म्हणून मी असे केले.
शाही मोदक कसे करायचे ते इथे बघून कळेल
तयार शाही मोदक
अजुन एक
हे उकडीचे आणि काजूचे सगळे एकत्र
फारच सुंदर, सुबक
फारच सुंदर, सुबक
अळीव मोदक. मस्तच लागतील.
तुमच्या हाताला जबरदस्त सीमेट्री आहे.चमच्याने इतक्या समान अंतरावर रेषा म्हणजे..मोदकाच्या भरपूर आणि सुबक कळ्या बघून पण नतमस्तक वगैरे व्हावंसं वाटलं.
अरे बापरे आताच तुमच्या
अरे बापरे आताच तुमच्या आधीच्या एन्ट्री वर प्रतिसाद देऊन आले आणि आता हे. साष्टांग दंडवत घ्याच.
सहीच, इनोव्हेटिव्ह.
सहीच, इनोव्हेटिव्ह.
भारीच! पिवळ्या - पांढऱ्या
भारीच! पिवळ्या - पांढऱ्या ट्रेमधली गजमुखाचा आभास निर्माण करणारी मोदकांची मांडणी आवडली.
काय कला आहे ग तुझ्या हातात
काय कला आहे ग तुझ्या हातात,फारच सुबक झालेत हे मोदक,फार आवडले हे शाही मोदक
दोन्ही सुंदर आहेत
दोन्ही सुंदर आहेत
भारीच सा. इनोव्हेटीव्ह.
भारीच सा. इनोव्हेटीव्ह.
दोन्ही भारी
दोन्ही भारी
बापरे,काजूची पारी! कसं सुचते
बापरे,काजूची पारी! कसं सुचते बाई
भारीच इनोव्हेटिव्ह.
जबरदस्त!!!
जबरदस्त!!!
काय ग्रेट आहेस ग
काय ग्रेट आहेस ग
उपासाचे मोदक कल्पनाच कसली भारी। बरं त्यातही दोन ऑप्शन्स
वरईच्या मोदकाच्या कळ्या किती सुंदर
अन काजु मोदक तर अफलातून। चमच्याची कल्पना आणि तो वापरण्याचं कौशल्य!पुन्हा दंडवत ___/\___
रेसिपी, फोटो दोन्हीही सुंदर
बापरे,काजूची पारी! कसं सुचते
बापरे,काजूची पारी! कसं सुचते बाई
भारीच इनोव्हेटिव्ह>>अगदी खरंय. इथल्या सगळ्या प्रवेशिका बघून रोजच्या स्वयंपाकाचाही न्यूनगंड येऊ म्हणतोय
कलाकार आहेस बाई
कलाकार आहेस बाई
फारच सुरेख दोन्ही मोदक !
फारच सुरेख दोन्ही मोदक !
मोदक, कल्पना आणि त्यांचं
मोदक, कल्पना आणि त्यांचं execution भारी आहे.
फारच सुंदर साक्षी!
फारच सुंदर साक्षी!
अळीवाच्या सारणाची कल्पना मस्त आहे. आणि काजूच्या पारीचीही! काजूचे मोदक उकडायचे नाहीत ना? मस्तच लागतील ते नुसतेच.
मस्त! दोन्ही मोदक सुंदर दिसत
मस्त! दोन्ही मोदक सुंदर दिसत आहेत.
सगळ्यांना प्रतिसाद दिल्याबददल
सगळ्यांना प्रतिसाद दिल्याबददल धन्यवाद.
वावे, काजू मोदक उकडावे लागत नाहीत. सारण आणि पारी दोन्ही शिजलेले असते. ह्याची चव काजू कतली च्या जवळची येते
Only one word जबरदस्त. खुप
Only one word जबरदस्त. खुप मेहनती आहात साक्शी
येस, मी नक्की करून बघणार हे
येस, मी नक्की करून बघणार हे काजू आणि अळीवाचे मोदक! काजू कतली आवडते आणि अळीवाचे लाडूही.
मोदकाच्या भरपूर आणि सुबक
मोदकाच्या भरपूर आणि सुबक कळ्या बघून पण नतमस्तक वगैरे व्हावंसं वाटलं. +111
सुबक आहेत अगदी.. चित्रातल्यासारख्या
भारीच मोदक हे सुद्धा.
भारीच मोदक हे सुद्धा.
भारीच आहे आयडिया !! मला पण
भारीच आहे आयडिया !! मला पण करून बघायला आवडेल.
वरई च्या पिठा ऐवजी दुसर काय घेता येईल ? माझ्याकडे एकही उपवासाच पीठ नाहीये . अळीव आहेत .. बटाटा उकडून त्याच बघायला हवं ..
साबुदाणा अगदी थोडा भाजून
साबुदाणा अगदी थोडा भाजून त्याचं मिक्सर मध्ये पीठ बनवून चाळून ते आणि उकडलेला बटाटा असं मिळून वापरता येईल.
उकडलेलं रताळं आणि बाईंड म्हणून किंचीत राजगीरा किंवा साबुदाणा पीठ पण>
(पूर्ण दिवस उपास आणि भिजवलेला साबुदाणा संपला की अशी थालिपिठं करतो आम्ही.)
फारच सुरेख
फारच सुरेख
व्वा! मस्त!
व्वा! मस्त!
मस्त दिसताहेत मोदक. मी
मस्त दिसताहेत मोदक. मी अळिवाचे लाडू बनवते. काजूचे मोदक पण बनवते. पण काजूमध्ये हे अळिवाचे सारण कसले सुंदर दिसतेय. अगदी एकसारखे -सुबक बनलेत मोदक.
सुबक आणि सुंदर!
सुबक आणि सुंदर!
मोदक, कल्पना आणि त्यांचं
मोदक, कल्पना आणि त्यांचं execution भारी आहे.>>+१११११
Innovative व सुंदर ..दोन्ही
Innovative व सुंदर ..दोन्ही प्रकार
Pages