बसल्या जागी करता येईल, कमीत कमी उंटावरून शेळ्या हाकून आणि जास्तीतजास्त स्वतःचं योगदान देऊन अशी रेसिपी हवी होती.
आधीची आयडिया आख्खा मसूर ज्वारी मोदक होती पण स्वयंपाकघरात चालत न जाता ते शक्य नव्हतं.
नमनाला जास्त तेल न घालता ही रेसिपी:
तूप 100 ग्रॅम
बेसन दिड मोठा कप
मीठ 1 छोटा चमचा
बेकिंग पावडर अर्धा छोटा चमचा
ओवा
जिरे
तूप चमच्याने थोडं फेसलं.
मग त्यात बेसन, मीठ, जिरे ,बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने बेसनाला तूप चोळलं.
नंतर त्यात 4 चमचे दूध घालून अगदी हलक्या हाताने मळलं आणि मोदकाकार दिला.
लोकांना हाका मारून मायक्रोव्हेव प्रि हिट करायच्या कामाला लावलं.
तोवर 4 मोदक आणि उरलेल्या मिश्रणाची कुकीज केली आणि मायक्रोव्हेव तव्यात(तव्याला) तूप लावून ठेवली.
लोकांना अजून थोड्या हाका मारून मायक्रोव्हेव ची तिवई स्वयंपाकघराच्या सर्वात उंच कपाटातून काढवली आणि बिस्किटे+मोदक 180 डिग्री वर 12 मिनिटे बेक करायला ठेवली.
घरात सँडविच ची पुदिना चटणी तयार होती.ती आणि सॉस वाढून फोटो काढला आणि आम्ही सगळ्यानी गरम मोदक आणि कुकीज गट्टम केले.पुदिना चटणी बरोबर मस्त लागले.
अधिक टीपा: जे लोक मायक्रोवेव्ह लावणार असतील त्यांना किंवा स्वतःला 'मायक्रोवेव्ह बंद केल्यावरही अंग च्या उष्णतेने पदार्थ बेक होत राहतो' ही कल्पना अतिशय मायाळूपणे आधीच समजावून सांगा.
चहाबरोबर पण मस्त लागतात.आता ही पोस्ट लगेच पूर्ण करून बसल्या बसल्या केटल मध्ये चहा करणार आहे.
फोटू किधर है? किधर है फोटू?
फोटू किधर है? किधर है फोटू?
(कमेंट पोस्ट व्हायच्या आत आला की :D)
आला आला, एक फोटो आला. पण
आला आला, एक फोटो आला. पण मोदकांचा फोटो कुठाय?
आला मोदकांचाही आला.
सिम्बा :-p
सिम्बा
हायला लास्ट फोटो - मोदक चाट
हायला लास्ट फोटो - मोदक चाट
गंमत अशी की मोबाईलवर क्रोम
गंमत अशी की मोबाईलवर क्रोम वरून फोटो इन्सर्ट होत नाहीत, आणि एम आय च्या बॅन झालेल्या ब्राऊजर वरून इन्सर्ट होतात पण फोटो च्या जागी फक्त प्लेसहोल्डर दिसतो. त्यामुळे क्रोम वर पोस्ट टाकून एम आय ब्राऊजर वरून इमेज टाकते आणि परत क्रोम वर येऊन बघते.
मला एम आय ब्राऊजर मोबाईलवर खूप आवडायचा.पण आणि मोबाईल क्रोम आणि मोबाईल फायरफॉक्स शी पटवून घ्यावं लागेलं
ती अमेरिकेचा पगार, जपानी बायको आणि ब्रिटिश घर अशी कायशी म्हण आहे.तसं डेव्हलपर म्हणून वेब ऍप क्रोम वर डेव्हलप, फायरफॉक्स वर टेस्ट आणि आपण एन्ड यूजर असल्यास मायक्रोसॉफ्ट एज वर उघडावं.काही इंटरनेट सेटिंग बदलायची असल्यास एज अजिबात वापरू नये. तेव्हा आय इ जुने वाले.त्यांची जोडी ही हडळीला नवरा नाही खविसाला बायको नाही अशी आहे.
तुमचे सायबर आयुष्य फार
तुमचे सायबर आयुष्य फार कॉम्प्लिकेटेड आहे
मोदक चाट ची कल्पना मस्त!
मोदक चाट ची कल्पना मस्त!
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
(बाय द वे लोकाना हाका बिका मारुन म्हणजे ? पायाला लागल वैगरे की काय? काळजी घे!)
मोदक चाट मस्त !!
मोदक चाट मस्त !!
(बाय द वे लोकाना हाका बिका मारुन म्हणजे ? पायाला लागल वैगरे की काय? काळजी घे!)>>+११
हो ना हे मला पण जाणून घ्यायचय काय झालं?
टाचेला फ्रॅक्चर
टाचेला फ्रॅक्चर
(दुखत नाही पण थेट टाचेवर असल्याने दाब देऊन चालयचं नाहीये.)
यावेळी हे मोदक बेक केल्यावर फुटले. चव चांगली असल्याने आम्ही संपवलेच. पण बिस्कीटं जास्त चांगली होतात असं दिसलं. नक्की करुन बघा. साधारण बेकड मठरी सारखे स्वरुप मिळते. एस पी डी पी मध्ये पण चांगले लागते.
तसेच गहू बेसन मिक्स केल्यास यु आय अजून सुधारता येईल.'
आयडिया मस्त! मोदक चाट वा वा!
आयडिया मस्त! मोदक चाट वा वा!
>>ती अमेरिकेचा पगार, जपानी बायको आणि ब्रिटिश घर अशी कायशी म्हण आहे.तसं डेव्हलपर म्हणून वेब ऍप क्रोम वर डेव्हलप, फायरफॉक्स वर टेस्ट आणि आपण एन्ड यूजर असल्यास मायक्रोसॉफ्ट एज वर उघडावं.काही इंटरनेट सेटिंग बदलायची असल्यास एज अजिबात वापरू नये. तेव्हा आय इ जुने वाले.त्यांची जोडी ही हडळीला नवरा नाही खविसाला बायको नाही अशी आहे.

_//\\_
वरचा पॅरा आणि गहू बेसन मिक्सने यू आय सुधारणे यामध्ये पूर्ण वेगळ्या लेखाची शिंक...आप्लंतेहे potential आहे तेव्हा मनावर घेच
अरे वा! भारी आहेस तू अनू.
अरे वा! भारी आहेस तू अनू.
ह्या मोदकांत खोबरं-कोथिंबीरीचं तिखट सारण मस्त लागेल.
हो मस्तच लागेल
हो मस्तच लागेल
छान प्रकार... टायटल मिसलीडिंग
छान प्रकार... टायटल मिसलीडिंग आहे...
बेसन घातलंय लो कारब कसे??
कणके/मैद्या पेक्षा लो कार्ब
कणके/मैद्या पेक्षा लो कार्ब
0 कार्ब नाहीये.