इलॅस्टिक वापरलेला मास्क, सतत वापरून हळूहळू सैल होऊ लागतो, आणि नाडीवाला खाली घसरू नये म्हणून शिवताना जरा घट्ट शिवला, जास्त वेळ ठेवावा लागला तर नकोसा होतो म्हणून हा अजून एक प्रकार शिवून पहिला 'रुमाल मास्क'
साहित्य-
शिलाई मशीन, दोरा, कात्री, कापड
लेकीला नकोसा झालेला शर्ट वापरला आहे, मऊसूत कॉटन कापड आणि फिका रंग..अजून काय हवं!
पाठिकडचा चौकोन कापून घेतला
18 इंच × 18 इंच
त्याचा त्रिकोण करून,अजून एकदा त्रिकोणी दुमडून घेतला
पोळी जशी 2 दा घडी घालतो तशी(पोळी वर्तुळ असते, रुमाल चौकोनी आहे)
फोटोत दाखवलंय तसं, 3 इंच रेष काढून कात्रीने तेथे कट मारून घेतला
रुमाल उघडून, आतील बाजूने अर्ध्या इंचावर, 2 ठिकाणी कट दिसतो,तिथे टीप मारून घेतली, आणि रुमलाच्या 4ही कडा आतील बाजूस दुमडून शिवून घेतल्या
पुन्हा, अर्ध्यात दुमडून, त्रिकोणी आकारात, दोन्ही खाचा एकावर एक ठेवून टीप मारून घेतली
आणि 3 ही कडा शिवून घेतल्या
नाक, तोंड व्यवस्थित झाकले गेले
मागून हवी तशी गाठ मारून, घट्ट,सैल ऍडजस्ट करता येते
टीप- मागे बांधलं आहे त्या ऐवजी वेलक्रो ही लावता येतं
( हेल्मेट घालताना जर 2 गाठी मारल्या असतील तर थोडं त्रासदायक होऊ शकतं)
वेगळी स्टाईल आहे
वेगळी स्टाईल आहे
तुम्ही एकदम छान समजवलं आहे नीट.
(अवांतरः केसांच्या लेयर्स पण चांगल्या आहेत)
दोन्ही कौतुकाबद्दल धन्यवाद, @
दोन्ही कौतुकाबद्दल धन्यवाद, @ मी-अनुजी
(अवांतर- डोळ्याची भीती नाही वाटली हे नशीब)
मस्त आहे ही आयडीया
मस्त आहे ही आयडीया
मस्त
मस्त
वेगळ्या स्टाईल चा मास्क! छान
वेगळ्या स्टाईल चा मास्क! छान
अनू माझंपण केसांच्या लेयर्स कडे लक्ष गेलं
यु नो बायका आपण ...
यु नो बायका आपण ...
मनापासून आभार सर्वांचे
मनापासून आभार सर्वांचे
छान !
छान !
मस्त कल्पना
मस्त कल्पना
मस्त
मस्त
हे पाहिलं होतं एकीने लावलेल..
हे पाहिलं होतं एकीने लावलेल.. मस्त आयडीया आहे. उपयुक्त.
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार
एकही फोटो दिसत नाहीये.
एकही फोटो दिसत नाहीये.
हो, नाही दिसत आहेत फोटो,
हो, नाही दिसत आहेत फोटो, टाकते पुन्हा एकदा, sorry
फोटो दिसत नाहीयेत
फोटो दिसत नाहीयेत
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)