हस्तकला स्पर्धा(मास्क बनवणे)-- तेजो

Submitted by तेजो on 29 August, 2020 - 13:10

इलॅस्टिक वापरलेला मास्क, सतत वापरून हळूहळू सैल होऊ लागतो, आणि नाडीवाला खाली घसरू नये म्हणून शिवताना जरा घट्ट शिवला, जास्त वेळ ठेवावा लागला तर नकोसा होतो म्हणून हा अजून एक प्रकार शिवून पहिला 'रुमाल मास्क'

साहित्य-
शिलाई मशीन, दोरा, कात्री, कापड

लेकीला नकोसा झालेला शर्ट वापरला आहे, मऊसूत कॉटन कापड आणि फिका रंग..अजून काय हवं!
IMG_20200829_165809.jpg

पाठिकडचा चौकोन कापून घेतला
18 इंच × 18 इंच
IMG_20200829_184456_218.jpg

त्याचा त्रिकोण करून,अजून एकदा त्रिकोणी दुमडून घेतला
पोळी जशी 2 दा घडी घालतो तशी(पोळी वर्तुळ असते, रुमाल चौकोनी आहे)
फोटोत दाखवलंय तसं, 3 इंच रेष काढून कात्रीने तेथे कट मारून घेतला
IMG_20200829_204339_508.jpg

रुमाल उघडून, आतील बाजूने अर्ध्या इंचावर, 2 ठिकाणी कट दिसतो,तिथे टीप मारून घेतली, आणि रुमलाच्या 4ही कडा आतील बाजूस दुमडून शिवून घेतल्या
IMG_20200829_191720_067.jpg

पुन्हा, अर्ध्यात दुमडून, त्रिकोणी आकारात, दोन्ही खाचा एकावर एक ठेवून टीप मारून घेतली
आणि 3 ही कडा शिवून घेतल्या
IMG_20200829_192500_372.jpg

नाक, तोंड व्यवस्थित झाकले गेले
IMG_20200829_192759_874.jpg

मागून हवी तशी गाठ मारून, घट्ट,सैल ऍडजस्ट करता येते
IMG_20200829_192830_897.jpg

टीप- मागे बांधलं आहे त्या ऐवजी वेलक्रो ही लावता येतं
( हेल्मेट घालताना जर 2 गाठी मारल्या असतील तर थोडं त्रासदायक होऊ शकतं)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वेगळी स्टाईल आहे
तुम्ही एकदम छान समजवलं आहे नीट.
(अवांतरः केसांच्या लेयर्स पण चांगल्या आहेत)

छान !