कोण तू भगवंत…

Submitted by Asu on 28 August, 2020 - 02:45

कोण तू भगवंत…

हृदय असे तान्हुले माझे
भार किती साहू
हृदयातून रुधिर नव्हे
दुःख लागले वाहू

शब्द सरले अश्रू विरले
राहिले नाही काही
माया ममता भाव भावना
अर्थ उरला नाही

दयामाया नाही तुजला
का म्हणावे दयावंत
उठताबसता दुःख जगतो
पाहशी किती अंत

माणसे रे आम्ही साधी
नाही कुणी साधुसंत
मणभर हे दुःख साहण्या
क्षणभर देई ‌उसंत

भाग्य आमचं कोरोनाहाती
कोण तू भगवंत?
देव म्हणून, तरी पूजितो
मनी वाटते खंत

ठेवण्या विश्वास तूजवर
धाव घेई अनंता
सुखकर्ता तू दुखहर्ता तू
नमितो एकदंता

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.28.08.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults