बुकमार्क स्पर्धा - सोनू. - ब गट

Submitted by सोनू. on 28 August, 2020 - 01:11

लहान मुलांना पुस्तकं वाचावीशी वाटण्यासाठी पुस्तकं छान रंगीत संगीत असतात. त्यांना अजून मजेशीर करण्यासाठी छानछान बुकमार्क वापरता येतील. घरात ठेवल्या जाणाऱ्या पुस्तकांसाठी हे 3D बुकमार्क छान दिसतात. बॅगेत घेऊन जायला तितकेसे जमणे कठीण.

सध्या क्रोशेकाम करत असल्याने क्रोशाचे प्रकार! मी Anchor Knitting Cotton वापरले. हा सध्या माझा आवडता धागा झालाय. बारीक नाक्षीकामासारखे काही करायचे असेल तर याचाच छोटा भाऊ वापरते, पण कॉटनच. बुकमार्कची जाडी कमी करायलाही बारीक धागा वापरता येईल.
चेन, स्लीपस्टीच, सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे आणि डबल क्रोशे या पाच बेसिक टाक्यांनी अमर्याद प्रकार करता येतात.

सिंगल क्रोशे ने एक बॉल बनवायचा, गोल, अंडाकृती किंवा अजून कसा हवा तसा आणि त्याला खाली लांब पट्टी करायची डबल क्रोशेने. मग त्या बॉलवर डोळे, जीभ, चोच, तोंड, केस, असे हवे ते प्रकार करून लावून आपल्याला हवे ते प्राणी, पक्षी, कार्टून करू शकता. हवे तर हात, पाय, पंख लावू शकता.

हा हात आणि पाय असलेला सरडा बघा कसा डोकावतोय पुस्तकातून तो!

(B) Lizard - 3.JPG(B) Lizard - 2.JPG(B) Lizard - 1.JPG

हातांमुळे पुस्तक जास्त उघडं राहात आहे असे वाटत असेल तर ते न लावता ही करता येईल. मी बदक बनवले फक्त पाय लावून, ते ही अगदी खाली. जितका बारीक धागा तितकी बुकमार्कची जाडी कमी करता येईल. मला थोडा जाडसरच करायचा होता त्यामुळे मी ३ प्लाय धागाच वापरला.

(B) Duck - 3.JPG(B) Duck - 4.JPG(B) Duck - 2.JPG

2D करायचे असेल तर गोल डोक्याऐवजी वर्तुळाकृती वा इतर appliques करता येतील. फूलं, पानं, मोरपीस, मासे वगैरे काहीही करता येईल. लांब काठीवर बसलेली चेटकीण मस्त दिसेल हॅरी पॉटर पुस्तकांसाठी.

(B) Peacock feather - 2.JPG(B) Peacock feather - 1.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages