लहान मुलांना पुस्तकं वाचावीशी वाटण्यासाठी पुस्तकं छान रंगीत संगीत असतात. त्यांना अजून मजेशीर करण्यासाठी छानछान बुकमार्क वापरता येतील. घरात ठेवल्या जाणाऱ्या पुस्तकांसाठी हे 3D बुकमार्क छान दिसतात. बॅगेत घेऊन जायला तितकेसे जमणे कठीण.
सध्या क्रोशेकाम करत असल्याने क्रोशाचे प्रकार! मी Anchor Knitting Cotton वापरले. हा सध्या माझा आवडता धागा झालाय. बारीक नाक्षीकामासारखे काही करायचे असेल तर याचाच छोटा भाऊ वापरते, पण कॉटनच. बुकमार्कची जाडी कमी करायलाही बारीक धागा वापरता येईल.
चेन, स्लीपस्टीच, सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे आणि डबल क्रोशे या पाच बेसिक टाक्यांनी अमर्याद प्रकार करता येतात.
सिंगल क्रोशे ने एक बॉल बनवायचा, गोल, अंडाकृती किंवा अजून कसा हवा तसा आणि त्याला खाली लांब पट्टी करायची डबल क्रोशेने. मग त्या बॉलवर डोळे, जीभ, चोच, तोंड, केस, असे हवे ते प्रकार करून लावून आपल्याला हवे ते प्राणी, पक्षी, कार्टून करू शकता. हवे तर हात, पाय, पंख लावू शकता.
हा हात आणि पाय असलेला सरडा बघा कसा डोकावतोय पुस्तकातून तो!
हातांमुळे पुस्तक जास्त उघडं राहात आहे असे वाटत असेल तर ते न लावता ही करता येईल. मी बदक बनवले फक्त पाय लावून, ते ही अगदी खाली. जितका बारीक धागा तितकी बुकमार्कची जाडी कमी करता येईल. मला थोडा जाडसरच करायचा होता त्यामुळे मी ३ प्लाय धागाच वापरला.
2D करायचे असेल तर गोल डोक्याऐवजी वर्तुळाकृती वा इतर appliques करता येतील. फूलं, पानं, मोरपीस, मासे वगैरे काहीही करता येईल. लांब काठीवर बसलेली चेटकीण मस्त दिसेल हॅरी पॉटर पुस्तकांसाठी.
सुपर क्लास! तिन्ही बुक
सुपर क्लास! तिन्ही बुक मार्कस् अफलातून झालेत. बदक, सरडा कसला गोड दिसतोय. आणि ते मोरपिस पण . आयडिया च भन्नाट आहे. हॅरी पॉटर ची चेटकीण तयार झाली की आवडेल बघायला.
Awesome
Awesome
खूपच गोड आहेत
खूपच गोड आहेत
मस्त आयडिया, एकदम छान आहेत
मस्त आयडिया, एकदम छान आहेत तिन्ही.
मस्त
मस्त
वॉव एक नंबर मस्त एंट्री आली
वॉव एक नंबर
मस्त एंट्री आली
क्लासि! कसले मस्त दिसतायत
क्लासि! कसले मस्त दिसतायत तिन्ही
धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद धन्यवाद
भारी काम. मस्तच.
भारी काम. मस्तच.
मस्त
मस्त
मस्तचं
मस्तचं
मस्त आहेत बुकमार्क
मस्त आहेत बुकमार्क
लहानगेच कशाला मोठ्यांनाही आवडतील
वाह झकास!
वाह झकास!
बरेच दिवसांनंतर !
गणपती पावला म्हणायचा माबोला
मस्त आहेत बुकमार्क..
मस्त आहेत बुकमार्क..
मोरपीस वाला खूप आवडलं...
सुरेख झालेत तिन्ही बुकमार्क्स
सुरेख झालेत तिन्ही बुकमार्क्स!
एकदम भारी आहेत.. मोरपीस विशेष
एकदम भारी आहेत.. मोरपीस विशेष आवडल
खूपच छान!
खूपच छान!
खूप छान झालेत बुकमार्क.
खूप छान झालेत बुकमार्क. मोरपीस विशेष आवडले.
निव्वळ सुंदर!!
निव्वळ सुंदर!! मोरपिस खतरनाक!!
आभार आभार हर्पेन, कसचं कसचं
आभार आभार
हर्पेन, कसचं कसचं
भन्नाट बुकमार्क! कल्पना आणि
भन्नाट बुकमार्क! कल्पना आणि एक्झिक्युशन दोन्ही आवडलं.
>>बरेच दिवसांनंतर ! >> +१
सुरेख
सुरेख
भारी झालेत क्रोशेचे
भारी झालेत क्रोशेचे बुकमार्क्स.
मस्त झालेत बुक-मार्क्स
मस्त झालेत बुक-मार्क्स
प्रत्येक पुस्तकासाठी त्याच्या विषयाप्रमाणे वेगळा बुकमार्क ही कल्पना भन्नाट आहे:)
युगांधर- बासरी किंवा मोरपीस
हॅरी पॉटर- वॅन्ड किंवा घुबड , चेटकीण तुम्ही सांगितलेच आहे
ऐतिहासिक पुस्तक- तलवार किंवा भाला वगैरे
स्पर्धेसाठी कोणते एक बुकमार्क
स्पर्धेसाठी कोणते एक बुकमार्क घेण्यात यावे त्याचा उल्लेख करा.
कसले मस्त दिसतायत तिन्ही
कसले मस्त दिसतायत तिन्ही
स्पर्धेसाठी कोणते एक बुकमार्क
स्पर्धेसाठी कोणते एक बुकमार्क घेण्यात यावे त्याचा उल्लेख करा. >>
सरडा
छान कल्पकता.
छान कल्पकता.
सरड्याला बघून बाब्बो वाटलं. बदक क्युट आणि मोरपीस फार गोड. मोरपीस जास्त आवडलं कारण ते मला मोहात टाकते लहानपणापासून.
सर्वच रंगसंगती उत्तम.
फारच छान...मोरपीस खुप सुंदर
फारच छान...मोरपीस खुप सुंदर दिसतय. बाकीचे पण छान आहे.
फारच सुंदर...मोरपीस विशेष
फारच सुंदर...मोरपीस विशेष आवडलं
Pages