नमस्कार मंडळी.
मायबोली गणेशोत्सव स्पर्धेची तयारी करताय ना? आणखी एका स्पर्धेची घोषणा करण्यास आम्हाला आनंद होत आहे.
✒️✒️✒️ सध्याच्या प्रगत आधुनिक युगात हाताने लिहायचे दिवस कालबाह्य झाले आहेत. एकमेकांना पत्र लिहिणारे, रोजनिशी लिहणारे हात थंडावले आहेत. अगदी लहान मुलांच्या हातात पण महागडे मोबाईल विसावले आहेत. मोबाईलच पाटी, वही, कागद, पेन्सिल, लेखणी झाली आहे. वळणदार अक्षर अभावानेच पहायला मिळते. या वर्षी मायबोलीकरांना जुन्या आठवणी जागृत करण्यासाठी तसेच आपल्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी घेऊन येत आहोत
*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा*
नियम :
१) स्पर्धेत भाग घेणारा मायबोलीचा सदस्य असावा अथवा सदस्याचा पाल्य असावा.
स्पर्धा दोन गटात खुली आहे.
अ गट- लहान मुले (13 व त्याखालील)
ब गट- मोठ्यांसाठी.
२) गणपती संबंधी कोणतेही लेखन असेल तरी चालेल (लेखनाचा स्रोत तुम्ही ठरवा, विषय तुम्ही ठरवा) , फक्त ते भाग घेणार्या व्यक्तीने स्वतःच्या
हाताने लिहिलेले असावे.
३) लेखन मराठी, संस्कृत भाषेतले व देवनागरी लिपी मधे लिहिलेले असावे.
४) लहान मुले गणपती स्त्रोत्र, आरती, गणपतीची नावे ई. स्वतःच्या हाताने लिहू शकतात (चित्र नको)
५) अक्षरलेखना व्यतिरिक्त ईतर सजावट नको.
६) कॅलिग्राफिची साधने वापरु नयेत जसे निब कापलेले पेन, बोरु किंवा क्रोक्युल ई.
७) लेखन साधा बॉलपेन, पेन्सिल, शाईपेनाने लिहिलेले असावे. पेन्सिल, बॉलपेन किंवा शाईपेन कोणत्याही एकाच रंगाचे वापरावेत.
८) कागदावर नाव, गट आणि मायबोली आयडी प्रथम लिहावे त्यानंतर स्वहस्ते मजकूर लिहुन त्याचे फक्त एक छायाचित्र प्रसिद्ध करावे.
९) स्पर्धेच्या प्रवेशिका २२ ऑगस्ट २०२० पासून पाठवू शकता (IST)
१०) एक id ब गटातून एकच प्रवेशिका सादर करू शकतो. अ गटासाठी एक id one per kid प्रवेशिका सादर करू शकतो.
१२) प्रकाशचित्रे कशी द्यायची याच्या माहितीसाठी येथे भेट द्या https://www.maayboli.com/node/1556
१३) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे - *श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* - (तुमचे नाव) (तुमचा मायबोली आयडी)
१४) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील.
तुमच्या शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.
|| गणपती बाप्पा मोरया ||
------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांच्या पूर्वतयारीला पुरेसा वाव मिळावा म्हणून स्पर्धा व नियम जाहीर करत आहोत. प्रवेशिका पाठवण्यासाठी गणपती प्रतिष्ठापनेनंतर धागे उघडले जातील.
२) गणपती संबंधी कोणतेही लेखन
२) गणपती संबंधी कोणतेही लेखन असेल तरी चालेल, फक्त ते स्वतः लिहिलेले असावे.>> म्हणजे लेख गणपती संबंधी कोणताही वा कोणाचाही असला तरी चालेल पण स्वत:च्या अक्षरात असावा असेच ना?
हस्तलेखन म्हणजे Hand writing
हस्तलेखन म्हणजे Hand writing चे शब्दशः भाषांतर झाले. अशा स्पर्धा पूर्वी मराठीत हस्ताक्षर स्पर्धा म्हणून व्हायच्या
गणपती संबंधी कोणतेही लेखन
गणपती संबंधी कोणतेही लेखन असेल तरी चालेल, फक्त ते स्वतः लिहिलेले असावे.>> म्हणजे लेख गणपती संबंधी कोणताही वा कोणाचाही असला तरी चालेल पण स्वत:च्या अक्षरात असावा असेच ना?>>>
वरती म्हटले आहे की 'लहान मुले गणपती स्त्रोत्र, आरती, गणपतीची नावे ई. स्वतःच्या हाताने लिहू शकतात ' म्हणजे लिखाण कोणाचेही असेल तरी चालेल असे वाटते.
पण तरीही दुसरे लिखाण मायबोलीवर डकवण्याआधी त्या लेखकाच्या नावाचा उल्लेख करावा असे वाटते.
सर्वात उत्तम म्हणजे जर संयोजकांनी एक उतारा अथवा मजकूर दिला आणि तो स्वहस्ताक्षरात लिहावयास सांगितला तर परीक्षण करणेही सोपे जाईल असे वाटते.
संयोजकमंडळास शुभेच्छा!
मराठीत हस्ताक्षर स्पर्धा
मराठीत हस्ताक्षर स्पर्धा म्हणून व्हायच्या ...+111
प्रतिस्थापना चे
प्रतिष्ठापना करणार का प्लीज...
हस्तलेखनाऐवजी हस्ताक्षर अथवा
हस्तलेखनाऐवजी हस्ताक्षर अथवा अक्षरलेखन जास्त उचित ठरेल असे वाटते
सरळ गणपती अथर्वशीर्ष द्या
सरळ गणपती अथर्वशीर्ष द्या संयोजक मंडळाद्वारे सर्वाना लिहायला
गणपतीबद्दल म्हणजे
गणपतीबद्दल म्हणजे गणेशोत्सवाबद्दलही चालेल का?
मी_अस्मिता बदल केला आहे.
मी_अस्मिता बदल केला आहे. धन्यवाद.
बक्षीस हस्ताक्षर चांगले
बक्षीस हस्ताक्षर चांगले असणारयाला मिळणार आहे की सर्वात वाईट असणारयाला हे क्लीअर कराल का?
तसेही मी या स्पर्धेत भाग घेणारच नाहीये कारण गणपतीला
मांसाहारी नैवैद्य नसतो हे मला दुसरया धाग्यावर कळलेय तर कोंबडीचे पायही चालणार नाहीत बहुधा
सर्वात उत्तम म्हणजे जर
सर्वात उत्तम म्हणजे जर संयोजकांनी एक उतारा अथवा मजकूर दिला आणि तो स्वहस्ताक्षरात लिहावयास सांगितला तर परीक्षण करणेही सोपे जाईल असे वाटते.>>>>> ++१११
स्वतःच्या मनाने लिहायचे तर ही हस्ताक्षराबरोबर निबंध स्पर्धा पण होईल
किती लिहिणे अपेक्षित आहे? वहीचे एक पान?
गणपतीबद्दल लिखाण असल्यामूळे
गणपतीबद्दल लिखाण असल्यामूळे गणेशोत्सवाबद्दलही चालेल. लिहिण्याला किमान किंवा कमाल मर्यादा नाही. तुम्ही दोन?/ चार ओळींचा एक श्लोक लिहू शकता किंवा 'माझ्या लहाणपणी पाहिलेले गणपती विसर्जन' असा चार पानी निबंध लिहू शकता. सुवाच्य हस्ताक्षरामधले मोठे लेख वाचायला कोणाला आवडणार नाहीत, नाही का !
सर्वात उत्तम म्हणजे जर
सर्वात उत्तम म्हणजे जर संयोजकांनी एक उतारा अथवा मजकूर दिला आणि तो स्वहस्ताक्षरात लिहावयास सांगितला तर परीक्षण करणेही सोपे जाईल असे वाटते.
>>>>>> खरच चांगली सुचना आहे, विचार करा यावर.
एखाद्या माबोसदस्याकडूनही लिहून घेऊ शकता एखादा परिच्छेद
'ह ','क्ष','ज्ञ ', जोडाक्षरं
'ह ','क्ष','ज्ञ ', जोडाक्षरं नीट लिहिणाऱ्यांना जास्त मार्क
एकाच रंगाच्या ग्लिटर पेन ने
एकाच रंगाच्या ग्लिटर पेन ने चालू शकेल का कृपया?
.
.
कृपया ग्रुप ऑडियन्स पब्लिक
कृपया ग्रुप ऑडियन्स पब्लिक करा आणि धागा गणेशोत्सव 2020 ग्रुप मध्ये हलवा.
स्पर्धेत भाग घेणारा मायबोलीचा
स्पर्धेत भाग घेणारा मायबोलीचा सदस्य असावा अथवा सदस्याचा पाल्य असावा.
स्पर्धा दोन गटात खुली आहे.
अ गट- लहान मुले (13 व त्याखालील)
ब गट- मोठ्यांसाठी.>>>
ब गटात 13 वर्षावरील पाल्याचे हस्तलिखित देता येईल ना?
साधना, देता येईल.
साधना, देता येईल.
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
माबोच्या सगळ्या उपक्रमांना खूप शुभेच्छा !
प्रकाशचित्र कसं अपलोड करायचं ?
वरील लिंक मध्ये ते सापडलं नाही .
कृपया सांगावे .
दुरुस्ती करण्यात आली आहे. आता
दुरुस्ती करण्यात आली आहे. आता होईल लिंक ओपन.
हल्ली डिजिटल झाल्याने हाताने
हल्ली डिजिटल झाल्याने हाताने लिहिण्याची वेळ ( शाळा कॉलेज सोडल्यावर) डायरीपुरती राहिली आहे. इलेक्ट्रोनिक डायऱ्या मिळतात म्हणा परंतू ज्या काही नववर्षाच्या डायऱ्या भेट म्हणून येतात त्यांच्या वह्या म्हणून उपयोग करून लिहितो तेव्हा ते गचाळ अक्षर मलाच नकोसे वाटते.
इतरांची हस्ताक्षरे पाहून वैफल्य येते.
समिती
समिती
क्षमा असावी
पण हे कळले नाही .
मजकूर अपलोड करताना गणेशोत्सवात विभागात कसं जायचं ? तिथे लेखन कसे द्यायचे ? कारण नवीन लेखन करायचे आहे , इथे स्पर्धा विभाग नाहीत .
इमेज देताना , SAVE TO टेक्स्ट हा पर्याय दिसत नाहीये .
कृपया कळावे
आभार
संयोजक , गणपतीविषयक इंग्रजी
..
मायबोलीवर कोणी
मायबोलीवर कोणी ग्रॅफॉलॉजिस्ट आहे का? भरपूर मटेरियल जमा झालंय.
मायबोलीवर कोणी ग्रॅफॉलॉजिस्ट
मायबोलीवर कोणी ग्रॅफॉलॉजिस्ट आहे का? भरपूर मटेरियल जमा झालंय.>>>+११११ अगदी मनातले बोललात.
स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे
.
हस्तलेखन स्पर्धा सुचल्याबद्दल
हस्तलेखन स्पर्धा सुचल्याबद्दल संयोजकांचे कौतुक.
मला भाग घेता येइल अशी काहीतरी स्पर्धा ठेवल्याबद्दल धन्यवाद.
मला भाग घेता येइल अशी काहीतरी
मला भाग घेता येइल अशी काहीतरी स्पर्धा ठेवल्याबद्दल धन्यवाद. >>>> +१
