उत्सव

Submitted by दिलफ on 16 August, 2020 - 06:15

बोटात जेव्हा येते तान्हे तुझे बोट
भान हरपते सारे मृदुल तुझा स्पर्श
व्यर्थ झाली मनातील अनेक ती द्वंद्व
अर्थहीन ते सारे अहंकार आणि गर्व

निरागस त्या हास्याने मोहून मी जातो
क्लेश सगळे तनाचे विसरून मग जातो
त्रास जीवनातील सुसह्य चांगले ते बघतो
क्षणात एकाच मी नैराश्य झटकून टाकतो

आशेवर, अनुकंपेवर जे चांगले त्या साऱ्यावर
परत एकदा विश्वास वाटतो करावा त्यावर
पुन्हा मग माणुसकीचा अभिमान मला वाटतो
माणूस मी असण्याचा साजरा उत्सव करतो

दिलीप फडके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults