सध्या कोरोनाप्रतापामुळे अनेकांच्या नोकर्या जात आहेत.कंत्राटी कामे मिळेनात.कधीतरी कोरोना अगदी नगण्य उरेलच; किंवा संपुष्टातसुद्धा येईल. त्यावेळी पुन्हा नोकरी संशोधन किंवा नवे कंत्राटी काम मिळवायला लोक बाहेर पडतीलच.
खाजगी नोकरी शोधताना किंवा नोकरी करत असताना किंवा कंत्राटी कामे मिळवताना काही वेळा असे निदर्शनास येईल की आपण पात्र असूनही आपल्याला संधी मिळालेली नाही किंवा प्रमोशन मिळालेले नाही.उलट आपल्याला डावलून ज्याला संधी दिली गेलीय त्याला नक्की काय पाहून त्या पदावर काम करण्याची संधी दिली गेली असावी किंवा नक्की काय तपासून कंत्राट दिले गेले असावे अशी शंका येते.
तर काही वेळा याच्या उलट प्रकारसुद्धा घडतो म्हणजे आपल्याला फारशी अपेक्षा नसताना एखादी चांगली नोकरी किंवा कंत्राट मिळते किंवा अपेक्षेपेक्षाही बरेच जास्त रकमेचे पॅकेज मिळते.
हे असे घडण्याची काही ठराविक कारणे असू शकतात का? ती शोधता येतील का? की हा केवळ रँडमनेस आहे? चांगली नोकरी किंवा कंत्राटी काम मिळणे यात एखाद्याच्या नशीबाचा भाग कितपत वाटतो तुम्हाला? कष्ट , प्रामाणिकपणा याला नेहमीच न्याय मिळतो असे वाटते का? चांगली नोकरी किंवा कंत्राट मिळणे या मागे कोणत्या गोष्टींचा संबंध असावा असे वाटते?
छान
छान
आता सगळ्याच नोकर्या कंत्राटी आहेत
कंत्राट मिळणे: सगळ्या
कंत्राट मिळणे: सगळ्या तांत्रिकी अपेक्षा पूर्ण करून L1 असणे.
नोकरीसाठी नातेवाईक , वशिला
नोकरीसाठी नातेवाईक , वशिला ,जात, प्रादेशिकता ( बंगाली , तमिळ , कन्नड इत्यादी ) बघितले जाते. पात्रता , कष्टाळूपणा गेला तेल लावत.
कंत्राट मिळवताना अजून "बरेच" काही लागते. ते इथे उघडपणे कोणी कसे सांगणार ?