Submitted by पराग र. लोणकर on 13 August, 2020 - 04:15
मी अन् तू
हलकेच लाजणे तुझे
मोहवी मला सदा,
मोरपंखी हसणे तुझे गं
वेडावतोच मी पुन्हा...
बोलणे तुझे असे ते
सुरमयी गाणे जसे,
कधी क्रोधाचा नेत्रकटाक्ष
थेट हृदयी वार असे...
एकमेकांसाठीच बनलो
असे साऱ्या भासत असे,
एकच असण्याचा आपला
त्यांना मुळी ठाव नसे...
या मनीचे त्या मनी
विनाशब्द कळत असे,
गुपीत प्रेमाचे आपल्या
एक कोडे मज असे...
कोण कोठला मी अन्
कोण कोठली तू असे,
स्वर्गात गाठ जोडल्याने
धरणीवर या भेट घडे...
भाग्यवंत मी खरा
अर्धांगीनी तू असे,
सर्व जन्मा असेच घडावे
प्रार्थना दैवा असे...
*
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कोण कोठला मी अन्
कोण कोठला मी अन्
कोण कोठली तू असे,
स्वर्गात गाठ जोडल्याने
धरणीवर या भेट घडे>> अगदी खरं..
छान कविता..